महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी झाला; हवामान विभाग

हवामान अंदाज

महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी झाला; हवामान विभाग

 

राज्यात गेल्या काही दिवस जोरदार पाऊस पडल्यानंतर पावसाचा प्रभाव कमी झाला आहे. येत्या २ दिवसानंतर पावसाचा जोर आणखी कमी होणार असून तुरळक ठिकाणी हलक्या पाऊस पडेल. मराठवाडा व विदर्भातील अनेक भागात पावसाने काहीशी उघडीप राहणार आहे. कोकण व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाच्या खात्याने वर्तविला आहे.

हे वाचा :- PM किसान योजना:आता फक्त ‘या’ शेतकऱ्यांनाच मिळेल सातवा हप्ता

बंगाल उपसागराच्या परिसरात चक्रिय वाऱ्यांची स्थिती आहे. ही स्थिती उत्तरेकडे पश्चिम भागाकडे सरकण्याची शक्यता आहे. मात्र, त्याची तिव्रता अधिक नसल्याने दोन दिवसात ते विरून जाण्याची शक्यता आहे. तसेच अरबी समुद्राच्या पश्चिममध्य भागात व परिसरात कमी दाबाचे क्षेत्र अजूनही काही प्रमाणात सक्रिय आहे. त्यामुळे राज्यातील कोकण व मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान असून तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे.

हे वाचा:- राज्य सरकार कृषी यांत्रिकीकरणावर देणार अनुदान; ऑनलाईन करा अर्ज

येत्या दोन दिवसात राज्यातील पावसाचे प्रमाण कमी होऊन कडाक्याचे ऊन पडेल. त्यामुळे कमाल तापमानाचा पारा काहीसा वाढणार असून उन्हाचा चटका वाढेल.

राज्यात कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग या भागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. खानदेशातील धुळे, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्हयात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. इतर भागात काही अंशी ढगाळ हवामान राहणार असून तुरळक ठिकाणी शिडकावा होईल.

महत्त्वाची बातमी रब्बीसाठी पंतप्रधान पिक विमा योजना लागू

शुक्रवारी (२३ ऑक्टो) रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. तर शनिवारपासून राज्यातील सर्वच भागात पावसाची उघडीपीसह काही भागात ढगाळ वातावरण राहणार आहे.

https://www.santsahitya.in/

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व