मिळवा कमी व्याजदरात एग्री गोल्ड लोन एसबीआयची शेतकऱ्यांना हाक!

मिळवा कमी व्याजदरात एग्री गोल्ड लोन एसबीआयची शेतकऱ्यांना हाक !

देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. स्टेट बँक कमी व्याजदरात शेतकऱ्यांना अर्थ साहाय्य करत आहे. स्टेट बँकेच्या १० हजार ५०५ शहरी आणि ग्रामिण शाखा आहेत, ज्या शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा नेहमी पुर्ण करत असतात.

कोरोनासारख्या संकटात शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे स्टेट बँक शेतकऱ्यांसाठी एग्री गोल्ड लोन ही योजना सुरू केली आहे. आतापर्यंत ५ लाख शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. जर आपल्याही कर्ज घ्यायचे असेल तर आपण आपल्या शेतीचे कागदपत्र बँकेला दाखावे लागतील. कागदपत्र दाखवल्यानंतर बँक आपल्याला कर्ज देईल. विशेष म्हणजे या एग्री गोल्ड लोन साठी बँकेने अत्यंत कमी व्याजदर आकारले आहे.

एसबीआयच्या या योजनेंतर्गत शेतकऱ्याला सोन्याचे दागिने बँकेत जमा करावे लागतील. त्यानंतर शेतकरी आपल्या अपेक्षेप्रमाणे कर्ज घेऊ शकतो. पण यात एक अट आहे, ती म्हणजे शेतकऱ्याच्या नावावर शेतजमीन असणे आवश्यक आहे. कारण जमिनीचे कागदपत्र बँकेत जमा करावी लागतात.

यात दोन प्रकारची कर्ज आहेत एग्री गोल्ड लोन हे पीक उत्पन्न आणि मल्टी पर्पस गोल्ड लोन आहे. एग्री गोल्ड लोन हे पीक उत्पन्नासाठी असून याची मर्यादा ही ३ लाख ते त्यापेक्षा अधिकची आहे. तीन लाखाच्या कर्जावर ७ टक्के व्याजदर तर त्यापेक्षा अधिकच्या कर्जासाठी ९.९५ टक्के व्याजदर आहे. मल्टी पर्पज गोल्ड कर्जासाठी ९.९५ टक्के व्याजदर आहे.

Agri Gold Loan SBI चे वैशिष्टये

सोन्याचे दागिने गहाण ठेवून कर्ज घेतले जाऊ शकते.
कर्जाची प्रक्रिया सोपी आणि सोयीस्कर आहे.
कमी व्याज दर.
कोणतेही छुपे शुल्क नाही
परतफेडचे वेळापत्रक लवचिक आहे.
एसबीआय गोल्ड लोन एसबीआयसाठी आवश्यक कागदपत्रे

शेतकऱ्यांचे दोन पासपोर्ट आकाराचे फोटो.
ओळखपत्र- आधार कार्ड, पॅनकार्ड, वाहनचालक परवाना.
राहण्याचा पत्ता
मतदान कार्ड
जमिनीचा उतारा सात बारा उतारा

कर्ज घेण्यासाठी काय कराल
जर आपल्याला एग्री गोल्ड लोन घ्यायचे असेल तर आपण थेट बँकेत जाऊ शकतात.
किंवा योनो अॅप द्वारे तुम्ही अर्ज करु शकता.
याशिवाय तुम्ही ऑनलाईनही कर्जासाठी अर्ज करु शकता.मिळवा कमी
https://sbi.co.in


https://sbi.co.in/web/agri-rural/agriculture-banking/gold-loan

2 thoughts on “मिळवा कमी व्याजदरात एग्री गोल्ड लोन एसबीआयची शेतकऱ्यांना हाक!”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *