टरबूज लागवड

टरबूज लागवड

पिकाची माहिती
टरबूज / कलिंगड हे अत्यंत कमी कालावधीत, कमी खर्चात, जास्तीत जास्त नफा मिळवून देणारे वेलवर्गातले पीक आहे. त्याला उन्हाळ्यात भरपूर मागणी असते. आरोग्यवर्धक, व्याधीशामक, स्वदिष्ट असून जाम-जेली निर्मितीत उपयुक्त. सुकवलेल्या बिया आयुर्वेदिकदृष्ट्या गुणकारी आणि पौष्टिक असतात. त्यामुळे शेतकरी आता उच्च तंत्राद्यानच्या आधारे बाराही महिने हे पीक घेऊ लागलेत.

जमिनीचा प्रकार
मध्यम काळी पाण्याची निचरा होणारी जमीन.

हवामान
तापमान : २४ अंश सेल्सिअस ते २७ अंश सेल्सिअस

पिकाची जात
शुगर बेबी, अर्का ज्योती, अर्का माणिक, आशियाई यामाटो आणि न्यू हँम्प शायर

लागवड
आळे पद्धत – ठराविक अंतरावर आळेकरून त्यात शेणखत मिसळून मध्यभागी ३-४ बिया टोकाव्यात .सरी वरंबा पद्धत – २ X ०.५ मीटर अंतरावर ३ ते ४ बिया टोकून लावाव्यात. रुंद गादी वाफ्यावर लागवड – या पद्धतीतलागवड रुंद गादीवाफ्याच्या दोन्ही बाजूंना करतात. त्यामुळे वेल गादी वाफ्यावर पसरतो व फळे पाण्याच्या संपर्कात न येता खराब होत नाहीत. यासाठी ३ ते ४ मी. अंतरावर सरी पडून सरीच्या बगलेत दोन्ही बाजूंना १ ते १.५ मी. अंतरावर ३ ते ४ बिया टाकाव्यात.

खत व्यवस्थापन
लागणीच्या वेळी खत दिल्यानंतर १५-२० दिवसांनी पुन्हा १०-१५ ग्राम युरिया, १५ ते २० ग्राम सुफला द्यावा ३ मिली बोरॉन, ३मिलि कॅलसीयम, ३ मिली मोलीनम या सूक्ष्म अन्नाद्रावाची १ लिटर पाण्यातून फवारणी करावी. एकरी ७५० ते ८०० लिटर ग्राम बुटाक्लोर हे तणनाशक १०० लिटर पाण्यातून लागवडीच्या दुसर्या दिवशी फवारावे. त्यानंतर काही तन उगवलेच तर खुरपणी करावी. महिन्यांनी वेलीचे शेंडे खुडावेत. वेळ दान्डांच्या मधल्या भागात वळवावेत. ओलाव्याशी संपर्क येऊ देऊ नये. फळाखाली पाचट अंथरावे. फळे २-३ वेळा हलकेपणाने फिरवावीत. २-३ फळे वाढू द्यावीत. बाकीची काढून टाकावीत.

पाणी व्यवस्थापन
जमिनीच्या मगदुराप्रमाणे पिकास पाणी द्यावे वेलीच्या वाढीच्या काळात ५ ते ७ दिवसांच्या अंतराने व फळधारणा होऊन फळ वाढू लागल्यावर ८ ते १० दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. उन्हाळी हंगामात कलिंगडाला साधारणपणे १५-१७ पाळ्या द्याव्या लागतात.

रोग नियंत्रण
कलिंगडावर काळा करपा, पानावरचे ठिपके, भुरी, केवडा हे रोग येतात यांच्या नियंत्रणासाठी मन्कोझेब २५ ग्राम, १० ग्राम कार्बेन्डॅझिम, मतेलक्ज़िउम २५ ग्राम ३० लिटर पाण्यातून फवारावे. फुलकिडे, मावा, पांढरी माशी, नागअळी, फळमाशी या किडीच्या नियंत्रणासाठी १० मि.ली. कार्बोसल्फान १० लिटर पाण्यातून फवारावे. ४ टक्के निंबोळी अर्क फवारावा.

उत्पादन
फळाच्या देठजवळचे केस वाळणे,डबडब असा आवाज,कर्रकर्र असा आवाज, रंग बदलणे हि फळ तयार झाल्याची लक्षणे असतात. जातीनिहाय १८ ते २५ टनपर्यंत उत्पादन मिळते.

santsahitya.in

Post Views: 1,869 views

कृषी क्रांती चे जिल्हा निहाय WhatsApp Groups

आपल्याच जिल्ह्यालाच जोडले जा.

खात्रीशीर जाहिराती

नवीन जाहिराती

1 thought on “टरबूज लागवड”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *