सर्व हवामानात टोमॅटोची लागवड

सर्व हवामानात टोमॅटोची यशस्वी लागवड

 

मानवाला टोमॅटोची ओळख इ.स. १५५४ च्या सुमारास झाल्याची नोंद इतिहासात झालेली आहे. पेरू देशातील मुळची वनस्पती आहे. १५५० च्या सुमारास युरोपियन साम्राज्यातील इटली या देशाने प्रथम टोमॅटोचे लागवड करण्यास सुरुवात केली. त्यानंतर ब्रिटन, स्पेन, मध्य युरोपियन देशांनी चिकित्सा म्हणून या वनस्पतीची लागवड केली. अमेरिकेत थॉमस जेकर्सनने १७८१ च्या सुमारास व्हर्जिनियामध्ये प्रथम टोमॅटोची लागवड केली. तेथून फ्रेंच अश्रिताने फिलाडेल्फिया येथे १७८९ साली ही वनस्पती नेली. मात्र इ. स. १८०० सालापासून टोमॅटोचा अन्नात समावेश झाला. भारतात टोमॅटोची माहिती १०० वर्षापासून असावी. तथापि १९५० च्या सुमारास पुसा इन्स्टिट्यूटने पुसा रूबी (मोठे फळ ) व पुसा अर्ली ड्वॉर्फ (छोटे, चविष्ट, टिकाऊ फळ ) हे टोमॅटोचे प्रकार शोधून काढले. पारंपारिक पद्धतीने दक्षिणेतील राज्ये व उत्तरेकडील काही राज्यात टोमॅटोची लागवड सुरू झाली. मात्र मर्यादित काळात कमी उत्पन्न यामुळे या जातींनी पुढील काळात तग धरला नाही. गेल्या चाळीस वर्षामध्ये लोकसंख्येची वाढ ज्या वेगाने झाली व टोमॅटोचा समावेश आहारात जसा विविध तऱ्हेने वाढू लागला तशा संकरित टोमॅटोच्या जाती उदयाला आल्या.

संकरित टोमॅटोचे लाभ व तोटे :                                             

संकरित बियाणाचा शोध मेक्सिकन शास्त्रज्ञ नोबेल विजेते डॉ. नॉर्मन बोलॉग यांनी १९६० च्या सुमारास तिसऱ्या जगाला दिला. त्यांनी अनेकविध अधिक उत्पन्न देणाऱ्या बुटक्या जातीचा शोध लावला. भूकबळी ठरू नयेत म्हणून केवळ उदरभरणासाठी म्हणून या जाती ठीक आहेत. संकरित जातीचे ते धान्यपीक असो, तेलबिया असोत, फळझाडे असोत, मसाला पिके व टोमॅटो – वांग्यासारखे फळझाड असो. यातील मादी वाण अधिक उत्पादन देणारा परंतु रोग व किडीस झटकन बळी पडणारा डावा (निकृष्ट ) असतो. नर वाण कमी उत्पन्न देणारा पण जंगली जातीचा असल्याने रोग व किडीस सहसा बळी पडता नाही. म्हणजे त्यात रोगविरूद्ध झगडण्याची प्रतिकार शक्ती जास्त असते. दोन्ही वाणातील चांगल्या गुणांचा संकर करून नवीन जाती निर्माण होतात. मात्र यासाठी अथक संशोधन, चिकाटी, दिर्धकाळ परिश्रमाची गरज असते. अशी एखादी सर्वगुणसंपन्न जात निर्माण करायला ५० वर्षापर्यंतचा काळही अपूर पडतो. एवढे प्रयत्न करतांना अचानकही चांगले शोध लागल्याचे आढळून आले आहे.सुधारित जातींविषयी संशोधनाची नवीन दिशा :जगाच्या लोकसंख्येबरोबरच भारताची लोकसंख्या दिवसेंदिवस वेगाने वाढतच असून ती सध्या १२५ कोटीपर्यंत गेली आहे. ह्या वाढत्या लोकसंख्येची अन्नधान्याची गरज भागविण्यासाठी अधिक उत्पादन घेण्यासाठी जंगली जातींपासून अधिक उत्पादन देणाऱ्या नवीन जाती निर्माण करण्याकडे मानवाचा कल वाढू लागला आहे. नवीन तंत्रज्ञान विकसित करून बहुतांशी एक जात पडद्याआड होईपर्यंत दुसरी जात निर्माण होऊ लागली. शेतकरी हा प्रगतीशिल असतो. त्याने कालानुपरत्वे बदलत राहावे. परंतु ह्या सर्व मानवनिर्मित संकरित जाती अधिक उत्पादन देणाऱ्या परंतु रोग व किडीस बळी पडणाऱ्या असतात. जंगली जाती मात्र रोगांस व किडींना सहसा बळी पडत नाहीत. ही बाब सर्वच पिकांना लागू पडते. अशा रोग व किडीस लवकर बळी पडणाऱ्या संकरित जातीची पिके वाचविण्यासाठी रासायनिक खते, औषधे निर्माण होऊ लागली. तात्पुरती कीड व रोग आटोक्यात येऊ लागली. परंतु त्याचा परिणाम पुढील पिकांवर होऊ लागता, औषधाचा खर्च वाढू लागला, त्याचबरोबर जमिनीची सुपिकता (Soil Fertility) व उत्पादन क्षमता (Soil productivity) घटू लागली. त्यामुळे रोग प्रतिकारक शक्ती कमी झाल्याने लगेच कीड व रोगांचे प्रमाण वाढू लागले. हे टाळण्यासाठी पुन्हा नवीन प्रतिबंधक पाश्चात्य जातींचे आगमन होऊ लागले. हे चक्र थाबाविण्यासाठी नेमका उलटा विचार करणे आवश्यक आहे.

साधारणत : जंगली जाती कीड व रोगास बळी पडत नाहीत. तेव्हा काम उत्पादन देणारी तरीही महत्त्वाचे कीड व रोगास बळी न पडणारी भारतीय मादी (Female) व जादा गुणवत्ता, स्वाद टिकून राहण्याची क्षमता (Shelf Life) processing value (poor man’s cash drop with added value) असणारा नर यांचा संकर करून नवीन जात निर्माण केल्यास वरील सर्व बाबी टाळता येऊन अधिक व दर्जेदार उत्पादन घेता येते आणि राष्ट्रप्रेम जोपासण्याचे आद्य कर्तव्य पाळता येते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे इस्राईल व जपान या देशांचे आहे.टोमॅटोच्या सुधारित जाती :सर्वसाधारण शेतकऱ्यांसाठी कमी खर्चिक :१)

पंजाब केसरी : ही जात ‘रूपाली’ ह्या टोमॅटोच्या जातीसारखी चालते, बिगर तारेची, गर भरपूर असलेली, कमी पाण्यामध्ये जिद्दीने वाढणारी असल्यामुळे उन्हाळ्यात लागवड करतात. खेडेगावात भरपूर मागणी असते.२) पंजाब छुआरा : ह्या टोमॅटोच्या जातीची फळे गुच्छाने येतात. सर्वसाधारण भागातील शेतकऱ्यांसाठी परवडणारी, कमी खर्चिक जात असून लागवड उन्हाळ्यात करतात.३) पुसा अर्ली ड्वॉर्फ : झुडूपासारखी बुटकी असून लवकर व तिन्ही हंगामात येणारी जात आहे. फळे मध्यम आकाराची गोल व पूर्ण लाल रंगाची असतात. इकरी १४ टन उत्पादन देते.४) पुसा रूबी : तिन्ही हंगामात चांगले उत्पन्न देणारी ही जात असून लवकर येणारी आहे. फळे मध्यम चपट्या आकाराची गर्द लाल रंगाची असतात. तसेच विषाणूजन्य रोगांना कमी प्रमाणात बळी पडते. एकरी १२ ते १३ टन उत्पादन देते.५) पुसा १२०: ही जात निमॅटोडला प्रतिकारक आहे. झुडूपासारखी वाढणारी असून फळे मध्यम गोल आणि आकर्षक लाल रंगाची असतात.६) मार्ग्लोब : या जातीची फळे मध्यम त मोठ्या आकाराची गोल व तांबडी रसरशीत असतात. कॅनिंगसाठी उत्तम आहे.७) रोमा : या जातीची फळे लांबट, जाड कातडीची असतात. त्यामुळे वाहतुकीत नुकसान होत नाही. टोमॅटो पेस्टसाठी उत्तम आहे.महत्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी

विकसीत केलेल्या जाती :१) भाग्यश्री : ही जात मध्यम वाढणारी असून फळे मध्यम ते मोठ्या आकाराची, गोल लांबट पूर्ण लाल रंगाची असून गराचे प्रमाण जास्त असते. सरासरी उत्पादन एकरी २५ ते २६ टन येते.२) धनश्री : ही जात तिन्ही हंगामात येणारी असून मध्यम वाढणारी, फळे नारंगी रंगाची मध्यम आकाराची असतात. सरासरी एकरी ३० ते ३२ टन उत्पादन येते.टोमॅटोच्या

सुधारित खर्चिक जाती:१) शिवाजी : वर्षभर लागवडीस योग्य. उन्हाळी हंगामासाठी उत्कृष्ठ लागवडीनंतर ६० -६५ दिवसात फळे. फळ लंबगोलाकार, गर्द लाल रंगाचे, कडक व ८५ ते ९० ग्रॅमचे.२) नामधारी ८१५,८१२ : मे, जून व सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये लागवडीस योग्य लागवडीनंतर ७५ ते ८० दिवसात फळे, फळ कडक, चौकोनी गोल, गर्द लाल रंगाचे एकरी ३० ते ३२ टन

उत्पन्न.३) नामधारी २५३५ : खरीप व रब्बी दोन्ही हंगामासाठी योग्य वाण लागवडीपासून ७५ ते ८० दिवसात फळ तयार होते. फळ कडक अंडाकृती लांबट गोल व ८० ते ९० ग्रॅमचे असते.

४) उत्सव : खरीप व रब्बी होनही हंगामात येणारे वाण लागवडीनंतर ८० दिवसात पहिली तोडणी होते. फल ८० ते ९० ग्रॅमचे, आकर्षक लाल भडक, बहर एकाच वेळी एकरी ३० ते ३२ टन उत्पादन.

५) शक्तीमान : नामधारी कंपनीच्या ह्या जातीला भरपूर पाने असतात. एकाच वेळी फुलोऱ्यात येऊन फळे ९० ते १०० ग्रॅम वजनाची अंडाकृती घट्ट, टणक, गुळगुळीत सालीची असतात. उत्तम साठवणुकीमुळे लांब वाहतूकीस सोईस्कर शेवटच्या काढणीपर्यंत फळे एकसारख्या आकारची असून ही जात उन्हाळी व थंडीच्या हंगामासाठी योग्य व भरपूर उत्पादनक्षम आहे.६)

वैभव : नामधारी कंपनीची ही जात उंच वाढणारी एकावेळी फुलोऱ्यात येणारी आहे. फळे लांबट अंडाकृती सरासरी ९० ग्रॅम वजनाची व आकर्षक रंगाची असून पहले घट्ट व उत्तम साठवण क्षमता असणारी आहे. उन्हाळी व थंडीच्या हंगामात येऊन शेवटच्या तोड्यापर्यंत एकाच आकाराची फळे मिळतात.७) अविनाश -२ : ही सिंजेंटा कंपनीची जात उन्हाळ्यात चालणारी, एका तारेवर येणारी विकसित जात असून फळे ८ -१० दिवस खराब होत नाहीत. मात्र पाऊस सुरू झाला की, फळे गळून पडतात. असा काही शेतकऱ्यांचा अनुभव आहे.८) अभिनव : सिंजेंटा कंपनीच्या ह्या जातीचे झाड जोमदार वाढणारे, मध्यम उंचीचे असते. पहले अंडाकृती जाड सालीची आकर्षक असून पिकल्यानंतर चमकदार गर्द लाल रंगाची दिसतात. फळाचे वजन ८० ते १०० ग्रॅम असून फळे टणक असतात. लागवडीपासून ६५ ते ७० दिवसात फळे तोडणीस येतात.तैवानची ‘चेरी’ नावाची टोमॅटो पंचतारांकित / हॉटेल्स मध्ये चेरी फ्रुटच्या ऐवजी ठेवण्याची प्रथा आहे. आशियाई संशोधन विकास केंद्र, तैवान (Asian Research Development Center, Taiwan) यांची ही जात निर्माण केली असून तिचा जगभर प्रसार होते आहे. ही जात साधारण जंगली प्रकारची असून फळांचा आकार गोलाकार टुटी – फ्रुटीसारखा असतो. पाण्याची कमतरता असल्यास रंग फिकट तांबूस तर थंडीमध्ये लागवड केल्यास गर्द लाल असतो.हवामान : टोमॅटो हे समशितोष्ण सावमानात येणारे नाजूक पील असल्याने बदलत्या हवामानातले कडक ऊन, ढगाळ हवा, झिमझिम वा मुसळधार पाऊस, धुई, धुके सुरकी, कडाक्याची थंडी अथवा ढगाळ हवेतील गरम व दमटपणा या पिकास मानवत नाही. टोमॅटोच्या बाहुतेक संकरित जातींना महाराष्ट्रातील सुरुवातीचे दोन महिने पावसाळी हवामान व १५ जानेवारी ते मार्च अखेरचे हवामान अनुकूल असते. उरलेल्या काळात हे पीक करपा, मर, भुरी, कॉलररॉट , करकोचा, खोडाच्यावर गळ पडणे, फुलगळ, फळगळ, फळावरील ब्राऊन रॉट (फळ सडणे) अशा विविध रोगांना व फळ अळीस बळी पडल्याने हे पीक शेतकऱ्यांना जुगार ठरू लागले आहे.जेव्हा हवामान अनुकूल असते त्यावेळी भरपूर उत्पन्न येते आणि भरपूर उत्पन्न आले कि भाव गडगडतात. भाव कमालीचे खाली येतात आणि शेतकरी निराश होतात. खोक्याचेही पैसे येत नाहीत. प्रतिकूल परिस्थितीत ज्यांचे पीक येते ते कमी प्रमाणत असले तरी तेव्हा मार्केटला एकूण आवक कमी असल्याने भाव अधिक असतात. अशा वेळी जाणीवपूर्वक दक्षता व औषधे, खतांच्या योग्य मात्रांचे प्रमाण सांभाळले तर पीक बऱ्यापैकी येऊन अधिक फायदेशीर ठरू शकते. ज्यांचा टोमॅटो जुलै – ऑगस्टला मार्केटला आला, त्यांच्या लक्षात असेल की त्या काळात १५० रू. ते ३०० रू. १० किलोचा भाव दोन महिने टिकून होता. शेतकऱ्यांनी टोमॅटोचे लागवड केल्यापासून आजपर्यंत इतके विक्रमी व स्थिर दर अनुभवलेले नव्हते. म्हणून डिसेंबर व मार्चंमधील लागवड प्रचलित (इतरवेळेच्या) लागवडीपेक्षा चाणाक्षपणे करावी.जमिन : टोमॅटोचे मुळ हे सोटमुळ असल्याने कापूस, भेंडी, वांगी अशा पिकांना जी मध्यम खोलीची सुपीक जमीन मानवते ती टोमॅटोस योग्य व शास्त्रीय दृष्ट्याही योग्य आहे. परंतु टोमॅटोच्या केशमुळ्या ह्या जमिनीच्या वरील १ फुट थरात पसरत असल्याने हलक्या जमिनीत हे पीक घेतले जाऊ लागले. हे पीक हलक्या ते मध्यम, तांबूस, करड्या भरपूर निचरा होणाऱ्या जमिनीत येऊ शकते.बियाणे लागवड : पावसाळी हंगामामध्ये लागवड केल्यास १० ग्रॅमची ४ पाकिटे हिवाळी लागवडीस ५ पाकिटे तर उन्हाळी लागवडीस ६ पाकिटे लागतात. कारण बदलत्या हवामानामुळे मर होण्याची शक्यता असते. बियाणे जर्मिनेटरच्या द्रावणात बुडवून लावल्यास संभाव्य मर व नंतर होणार कॉलर रॉट यासारखे रोग टाळता येतात.

रोप कसे तयार करावे : रोपासाठी तयार करावयाच्या वाफ्यासाठी लागणारी जमीन भाजलेली असावी. म्हणजे पहिल्या पिकाच्या अवशेषात राहिलेली कीड व अंडी नाहीशी होतात. वाफ्यात रोप लावताना रोपांच्या सर्व बाजूंनी समप्रमाणात व समपातळीवर पाणी बसेल या मापाचे जमिनीचा मगदूर व उतार लक्षात घेऊन वाफ्यांचा आकार ठरवावा. जर्मिनेटर व प्रोटेक्टंटच्या द्रावणात बी भिजवून घेतल्याने वाळवी अथवा काळ्या किडीचा प्रादुर्भाव होणार नाही. प्रोटेक्टंट हे आयुर्वेदिक औषध असल्याने ते थायमेट सारख्या बिषारी औषधाला पर्यात ठरत आहे. रोपातील दोन ओळीतील अंतर १ इंच असावे. रोप सर्वसाधारणपणे ५ व्या ते ६ व्या दिवशी उगवून येईल . वरील द्रावणाने हे शक्य होईल. दोन पानावर आल्यावर त्याला दर दोन – तीन दिवसांनी सप्तामृत २ -३ मिलीची प्रती लिटर पाण्यातून ३ -४ वेळा फवारणी केली असता रोप २० -२९ दिवसांत लागवडीस येते.लागवड : ज्या जमिनीत टोमॅटो, भेंडी, वांगी, बटाटा, वेलवर्गीय भाज्या व फळे आधीच्या हंगामात केली असतील तिथे टोमॅटोचे पीक काढण्याचे टाळावे. तेथे पहिल्या पिकावरील राहिलेल्या रोगांचे जंतू / कीड पटकन या पिकांचा आश्रय घेते व त्यामुळे रोग व

कीड आटोक्याबाहेर जाते.पणी केव्हाव कसे द्यावे : आंबवणी व चिंबवणीचे पाणी हलकेच द्यावे. नंतर उन्हाळ्यात ४ थ्या व ५ व्या दिवशी पाणी द्यावे. झाडावर भरपूर फळे येऊन आठवड्यातून दोनदा माल निघत असेल तिथे पाणी दोनदा द्यावे. हिवाळ्यात पाणी आठवड्याने द्यावे. उन्हाळ्यात सकाळी ९ च्या आत पाणी द्यावे. हिवाळ्यात मात्र सकाळी १० ते ४ वाजेपर्यंत पाणी द्यावे. राहिलेले शेत दुसऱ्या दिवशी याच पद्धतीने भिजवावे.

सेंद्रिय खते : ‘कल्पतरू; हे जैविक व सेंद्रिय खत असून पाऊस पडत असताना झाडाच्या जवळ रींग पद्धतीने टाकल्यावर हवेतील ओलावा शोषून जावव वाढतो. बुंध्याजवळ गारवा राहतो. हे सेंद्रिय खत एकरी ७० ते ८० किलो या प्रमाणात वाफश्यावर टाकावे. बागायती जमिनीस शेणखत, कंपोस्ट खत वरदान आहेच. तथापि, शहराजवळ राहणाऱ्या शेतकऱ्यांनी, नगरपालिका / महानगरपालिका विकत असलेले ‘कचरा डेपोखत ‘ फुकट मिळाले तरी वापरू नये. कारण त्यामुळे आपणच शहरातील सर्व रोगराई त्या रूपाने शेतात ‘नेऊन टाकून जमीन व पिकांचे अनेक प्रश्न निर्माण करतो. तसेच साखर कारखान्याची उसाची मळी (प्रेस मड ) स्वस्त असली तरी पूर्ण वाळवून एकरी अर्धा ते एक टन शेणखताबरोबर वापरावी. त्यामुळे क्षांरयुक्त जमिनीतील पीक बऱ्यापैकी घेण्यास मदत होईल. शेणखत टाकताना एकरी १।। ते २ टन पुरेसे आहे. उसाच्या पिकावर टोमॅटोचे पीक घ्यावयाचे असेल तर सेंद्रिय खत व इतर खातात बऱ्याच प्रमाणत बचत होते. नव्या लागवडीच्या शेतात २ फूट अंतराने सरी वाफे करून वरंब्याच्या बागलेत १ ते १.५ फूट अंतरावर टोमॅटो लागवड करावी. लागवड करताना वाफे भिजवून रोप हलकेशे उपटून जर्मिनेटर व प्रोटेक्टंटच्या द्रावणात संपूर्ण बुडवून काढून लावावे. अंगठ्याने रोपे लावू नये. अंगठ्याने रोप लावल्यास मुळी. वाकडी होऊन पिकास अन्नपुरवठ्यास अडचण होते. त्यामुळे एक महिन्याने झाडाच्या शेंड्यावर गोजी होऊन झाड रोगट बनते. तसेच फळ न लागण्याचीही शक्यता निर्माण होते. तेव्हा एका हाताने लागवड करावयाच्या जागेचा चिखल व माती काढून रोपाची मुळी अलगद सरळ बसेल अशा पद्धतीने वरंब्याच्या बगलेत १ ते १।। फूट अंतरावर लावावी. लावलेल्या रोपाभोवातीची माती चांगली दाबून घ्यावी.टोमॅटोला आधार देणे : टोमॅटोचे झाड संकरित जातीचे असेल तर वाढ लवकर होते. अशा वेळेस झाड सुतळीने बांधून त्याला काठीचा आधार द्यावा. टोमॅटोच्या फांद्या सुतळीने व्यवस्थित बांधल्या तर पहिली तार २ ते २।। फुटावर ओढता येते. दर ५ -६ झादानंतर एक मक्याचे झाड फायदेशीर ठरते. विशेष करून उन्हाळ्यात लावल्यास उन्हाची झळ मक्यावर येऊन टोमॅटोच्या झाडास त्रास होत नाही. सुटळी, लाकडे व तारांचा खर्च एकरी ८ ते १२ हजार, करावी काठी ४ – ६ हजार, डंब २ ते ३ हजार असा असून १५ ते २० हजार खर्च येतो.फुल व फलधारणा : साधारणपणे ३० ते ३५ दिवसात फूल लागते. पिवळी गर्द फुले असतात. ती फळधारणेस योग्य असतात. फिकट पिवळ्या रंगाची फुले नाजूक असून ती गळतात व फळधारणा होते नाही. साधारणपणे ५० -६० दिवसांत फळ लागण्यास सुरुवात होते. ६० ते ७० दिवसात फळांची तोड करता येते.

उत्पादन : संकरित ४० ते ४५ टन एकरी.कीड, रोग व उपाय :

कीड१) मावा, तुडतुडे, फुलकिडे अन्नरस शोषतात, पान पिवळे पडते. पुढे विषाणूजन्य रोगाचा प्रसार करतात.२) पाने खाणारी अळी – पानाचा आतील भाग नागमोडी आकाराचा पोखरते, खाल्लेला भाग पांढरा होतो. पान वाळते, फळे व शेंडा खाल्ल्याने उत्पादन घसरते.३) कटवर्म – रोपांचे कोवळे खोडे जमिनीलगत कापते, (Cut) दिवसा लपून राहिल्याने दिसत नाही.

रोग : रोप बाल्यावस्थेत असताना उन्हाळ्यामध्ये मर होते. लागवड केल्यावरही हीच परिस्थिती कायम असते. त्याकरिता जर्मिनेटर व प्रोटेक्टंटचा वापर करावा. सुरूवातीपासून डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरल्यास रोगांचे प्रमाण कमी आढळते व इतर औषध फवारणीच्या खर्चात हमखास बचत होते. प्रतिकूल परिस्थितीत करपा या रोगाला बळी पडते. प्रत्यक्ष ही एक प्रकारची बुरशी असते. त्याची लक्षणे अशी.१) रोपे लहान असताना पहिल्या अवस्थेत पाने जाड हिरव्या रंगाची होतात.२) दुसऱ्या अवस्थेत पाने त्रिकोणी आकाराची होउन वाळतात.३) तिसऱ्या अवस्थेत जून पानाच्या खालील भागावर पिवळे ठिपके पडून करड्या रंगाची अनियमित छटा चमकल्यासारखी दिसते. पानाचा तो भाग जळाल्यासारखा दिसतो.अशा डागांचे प्रमाण वाढत जाउन गंभीर अवस्थेत संपूर्ण झाड शेंड्याकडून करदळासारखे होते. काही वेळा रोगाची लागण रोपाच्या बाल्यावस्थेतच झपाट्याने झाल्यास शेंडा संपूर्ण पिवळसर होतो व खालच्या बाजूने पांढऱ्या रंगाची बुरशी दिसू लागते.रोगाची संपूर्ण अवस्था २० ते २२ दिवसांनी दिसते. या व अन्य रोगांवर व आली नियंत्रणासाठी खालील औषधांचा आळीपाळीने, पिकांची स्थानिक परिस्थिती, अवस्था हवामानाचा अंदाज घेऊन प्रमाण ठरवून फवारणी करावी. म्हणजे रोग व कीड आटोक्यात येऊन एकरी ४० ते ६० टनापर्यंत दर्जेदार उत्पन्न घेत येईल. त्याकरिता -१) जर्मिनेटर, २) थ्राईवर, ३) क्रॉंपशाईनर, ४) राईपनर,५) प्रोटेक्टंट, ६) प्रिझम ७) न्युट्राटोन या सप्तामृताचा आणि हार्मोनी व कल्पतरू सेंद्रिय खताचा वापर करावा. रोगाची तिव्रता अधिक असल्यास बिराशीनाशकाचा वापर करावा. ब्राऊन रॉट ज्याला शेतकरी मर, देवी म्हणतात. त्यासाठी सप्तामृतातील प्रोटेक्टंटची मात्र प्रथमपासून घ्यावी, महणजे हा त्रास कमी होतो. तरी जुलै, ऑगस्ट महिन्याभरात त्याला आधार द्यावा लागतो. ४० ते ४५ दिवसात फुल चमकू लागले की, झाड फोफावण्यास सुरुवात होते. ऑक्टोबर, नोव्हेंबर व मे महिन्यात कॅलिफ्झिन हे औषध २० ते ३० मिली १०० लि. पाण्यात वरील औषधांबरोबर फवारावे.

टीप : टोमॅटोचे बी जर्मिनेटरच्या द्रावणामध्ये (१ लि. पाण्यात २५ ते ३० मिली या प्रमाणता ) ३ ते ४ तास भिजवून सावलीत सुकवून लावल्यास बियांची उगवण उत्तम प्रकारे व लवकर होऊन रोप नंतर वरीलप्रमाणे द्रावणात बुडवून लावल्यास रोपे जीमदार वाढतात, मर होत नाही. सडलेल्या अजाणतेने फेकून दिलेल्या संकरित टोमॅटोच्या बियाणांची बीजप्रक्रिया करून सप्तामृत औषधे वापरून प्रगतीशील शेतकऱ्यांनी टोमॅटोचे उत्तम प्रकारे उत्पादन घेतल्याचे प्रत्यक्ष अनुभव आहेत.टोमॅटोचे

महत्त्व व प्रक्रिया उद्योग : टोमॅटोचे आहारात विशेष औषधी महत्त्व नसले तरी सुधारीत जातींचा लालभडक आकर्षक रंग, आकार व चवीमुळे सर्व प्रकारच्या हॉटेल्समध्ये, शहरी वातावरणातील घरांमध्ये टोमॅटोचा सॅलड (तोंडी लावण्यासाठी ) तसेच कोशिंबीरीममध्ये सर्रास वापर केला जातो. शहरातील हॉटेलमध्ये फ्रेंच फ्राईड, बटाटा चीप्सू बरोबर टोमॅटो केचप वापरण्याची फॅशन वाढते आहे. टोमॅटोमध्ये ‘अ’ (०.६४%) व ‘क’ (२.८२%) जीवनसत्त्व असते. ‘लायकोपीन’ या घटकामुळे टोमॅटोस लाल रंग येतो. टोमॅटोपासून निरनिराळे प्रक्रिया पदार्थ उदा. टोमॅटोच्या पेस्टपासून टोमॅटो सूप, केचप, ज्यूस टोमॅटोपुरी लोणचे इ. प्रक्रिया पदार्थ तयार करतात. युरोपियन राष्ट्रांमध्ये व इतर देशांमध्ये अशा प्रक्रिया पदार्थांच्य निर्यातीस भरपूर वाव आहे. आपल्या देशामध्ये देखील टोमॅटोपासून तयार केलेल्या वरील प्रक्रिया पदार्थांस वाढती मागणी असल्याने सुशिक्षित बेरोजगारांनी थोडेसे भांडवल गुंतवून असे प्रकीया उद्योग निर्माण करून देशांतर्गत मार्केट हाताळल्यास एक सुलभ फायदेशीर उद्योग करता येतो. कारण भारतामध्ये असे प्रक्रिया उद्योग अगदी बोटावर मोजण्याइतकेच असल्याने वरील प्रकिया उद्योगास भरपूर वाव आहे.टोमॅटोची यशस्वी लागवड केल्यास लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या उत्पान्नात वाढ होतेच. त्याचप्रमाणे टोमॅटोसाठी मजुरांची संख्या मोठ्या प्रमाणात लागत असल्यामुळे शेतमजुरांच्या किंवा शेतकऱ्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना हंगामी काम मिळून रोजगाराचा प्रश्न सोयीस्कर असल्याने वरील प्रकारचे प्रक्रिया उद्योग सहजासहजी उभारता येतात. प्रक्रिया पदार्थ तयार करण्यासाठीचे टोमॅटो हे मोठ्या आकाराचे असावेत. पूर्ण पक्क अवस्थेमध्येच काढणी करावी. जेथे टोमॅटोचे क्षेत्र मोठ्या प्रमाणत आहे अशा ग्रामीण व शहरापासून जवळ ठिकठिकाणी असलेले प्रकिया उद्योग उभारल्यास ग्रामीण भागातील अशिक्षित, सुशिक्षित बेरोजगारांचा शहरी भागाकडे स्थलांतराचा दिवसेंदिवस वाढणाऱ्या समस्येचा प्रश्न काही अंशी सोडविता येऊन ग्रामीण भागामध्येच रोजगाराची संधी अशा प्रक्रिया उद्योगांद्वारे उपलब्ध करता येईल.टोमॅटोचा खोडवा कसा धरावा व खोडवा का घ्यावा ?थंडीच्या काळातील तापमानातील तफावत, घुके, (धुई, सुरकी) यांचा पिकांवर होणारा विपरीत परिणाम, फुलगळ, फळगळ झपाट्याने होते, तसेच मावा तुडतुडे अशा किडींचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे उत्पन्न कमालीचे घटते. पावसाळयामध्ये, खरीप हंगामामध्ये विविध भाज्यांची, पालेभाज्या व फळभाज्यांची लागवड केल्यामुळे या पिकांचा हंगाम (तोडणी ) एकाच वेळी आल्याने मार्केटची रेलचेल होते. (आवक मोठ्या प्रमाणत होते.) त्यामुळे बाजारभाव कमालीचे घसरून शेतकर्‍याला पुरेसा दर न मिळाल्यामुळे मालाच्या वाहतुकीसाठी, खोक्यासाठी पदरचे पैसे भरावे लागतात. अशावेळी कमालीची निराशा येत हे टाळण्यासाठी काळजीपुर्वक अभ्यास करून ‘डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी’ चा वापर करून टोमॅटोचा यशस्वी खोडवा घरता येतो.खोडवा का घ्यावा ?पहिल्या फळपिकाची अवस्था संपत आली असताना किंवा फळाची संख्या कमी असतांना अथवा रोगाने झाड झपाटलेले असतांना, झाडाची वाढ खुंटलेली असल्यास सर्व रोगट फांद्या, शेंडे व पाने सदृश्य जिथपर्यंत झाड निरोगी दिसते, फांदी किंवा खोडाच्या बेचक्यातील डोळ्यांवर एक फूट भाग सोडून वापरलेल्या ब्लेडच्या पात्याने आडवा छेद घ्यावा. ही सगळी छाटलेली झाडाची पाने, फांद्या, रोगट झाडांचा भाग प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये जमा करून पिकापासून दूर अंतरावर खोल खड्डा खोदून पाचटांबरोबर किंवा वाया गेलेल्या चाऱ्याबरोबर पूर्ण जाळून टाकावे. नंतर जमीन वाफश्यांवर असताना कुदळीने खोदून खोडाला भर द्यावी. जर्मिनेटर, , थ्राईवर, क्रॉंपशाईनर, राईपनर, प्रोटेक्टंट, प्रिझम, न्युट्राटोन व स्ट्रेप्टोसायक्लीन या औषधांची योग्य प्रमाणत फवारणी केल्यास चौथ्या दिवसापासून नवीन फूट येते व नवीन फूल १५ दिवसांत चमकू लागते. या फवारणीमुळे झाडावर असणाऱ्या विकृत फळांचे प्रमाण कमी होऊन लहान फळे झपाट्याने मोठी वाढून तजेलदार होतात व वाढलेले मार्क्ताचे भाव सापडू शकतात. दोन किंवा तीन तोडे झाल्यानंतर नवीन लागलेल्या फुलांना फलधारणा होऊन आकार घेऊ लागतो व अशा अवस्थेमध्ये मिश्रखत किंवा कल्पतरू सेंद्रिय खत देऊन वरील औषधांची फवारणी योग्य वेळी य्गोय प्रमाणत केली असता, टोमॅटोचा यशस्वी खोडवा घेता येऊन पाण्याची उपलब्धता चांगली असल्यास योग्य फळांची काढणी दर आठवड्यात किंवा आठवड्यातून दोन वेळेसही करता येते. ही फळे दोन महिन्यांपर्यंत चांगल्या प्रकारे मिळतात. नेमका यावेळेस प्रतिकूल परिस्थितीमुळे मार्केटला माल कमी असतो. आपला माल चांगल्या दर्जाचा असला म्हणजे मालाला भाव चांगला मिळतो आणि त्यामुळे नियमित पिकापेक्षा खोडव्याचे उत्पन्न कमी आले तरी अधिक बाजारभाव सापडल्यामुळे खोडव्यापासून भरपूर नफा मिळविता येतो.कॉलर रॉट / करकोचा : टोमॅटो, ढोबळी मिरची, वांगी यासारख्या पिकांना लागवड झाल्यानंतर लगेच हा अतिशय हानिकारक रोग होतो. ह्याला गल पडली असेही म्हणतात.कारण,

लक्षणे व उपाय : हा रोग येण्याचे प्रमुख कारण असे की, पाऊस पडण्याअगोदर जमिनीत प्रचंड उष्णता निर्माण होते. या जमिनीमध्ये क्षारांचे प्रमाण अधिक असते. त्यातल्या त्यात सोडियम (Na) , कॅल्शियम (Ca), मॅग्नेशियम (Mg), या मूलद्रव्यांचे क्लोराईडस, कार्बोनेटस, बाय कार्बोनेटस, सल्फेटस हे क्षार असल्यामुळे जेव्हा तापलेल्या जमिनीमध्ये प्रथम पाऊस पडतो तेव्हा जमिनीतील अन्नद्रव्यांचे रूपांतर Soil Solution मध्ये होताना हे क्षार विरघळतात आणि हे क्षार पिकांच्या नाजूक मुळ्या (केशाकर्षक पांढऱ्या मुळ्या ) वर आधार करतात व हा आधात हळूहळू रोपांच्या, झाडांच्या आंतरसालीवर परिणाम करून पेशी कुजाविण्याचे कार्य हळूहळू चलो राहते. ह्याचा पुढील परिणाम म्हणजे रोपांच्या उजव्या बाजूकडील शेंडा पिवळसर पाडण्यात होऊन करपा पडल्यासारखी लक्षणे दिसू लागतात व संपूर्ण शेंडा नंतर करपून प्रथम करड्या रंगाचा ठिपका असलेले व्रण (Scar) नजरेस पडतो. डागावर बोट फिरविल्यास दबलेला दिसतो. त्याचे रूपांतर आठ दिवसांत गळ पडून कड (Ring) तयार होऊन अन्न व पाणी वाहक पेशी तोडल्या जातात आणि मग झाड कोलमडते. सहजासहजी हा रोग बरा होत नाही. परंतु डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर केल्यानंतर प्रथम आणि द्वितीय अवस्थेमध्ये आधात झालेली रोपे / झाडे / कलमे ताळ्यावर येऊन पेशी जुळून संपूर्ण झाड किंवा रोप पुनर्जिवीत (पहिल्यासारखे टवटवीत ) होते व त्याला नवीन, जोमाने फुट येते. फुले, फळे चांगल्या प्रकारे लागतात.बाल्यावस्थेमध्ये जेव्हा रोपे कोलमडतात तेव्हा ती रोपाच्या बुंध्यापासून दोन बोटे (६ इंच) अंतरावर जमिनीतील अळीने (White Grub) किंवा हुमानीने कुरतडल्यासारखी दिसतात. ही कुरतडलेली लक्षणे दिसताच अज्ञानामुळे शेतकरी याला ‘खरपुडी’ ने कुरतडले असे संबोधतो. शेतकऱ्याला नेमके कोणते औषध द्यावयाचे हे दुकानदाराला उमजत नाही. मग अनावश्यक विषारी औषधाच्या फवारणीची मालिका सुरू होत राहेत आणि रोपाची अवस्था मात्र जखमेवर मीठ चोळते अशी म्हणण्यापेक्षा भोपाळच्या विषारी वायूग्रस्त आधाताने पछाडलेल्या नव्हे तर मृत्युमुखी पडलेल्या लाखो लोकांसारखी दुर्देवी होते, कारण हे प्लॉट चार ते आठ दिवसांत रोगग्रस्त होऊन खलास होतात आणि मग शेतकरी खचून जातो.अनेक प्रकारचे इलाज करून रोप किंवा पीक जगत नाही. वारेमाप खर्च करून देखील फरक पडत नाही कारण शेतकऱ्याबरोबरच औषध विक्रेत्यालाही याचे मूळ कारण उमगलेले नसते. औषध विक्रेत्याचे त्या मानाने दु:ख जणू तिव्रतेचे असते. परंतु शेतकरी मात्र पूर्ण खचून जातो आणि मग तो हे औषध मार, त्याने फरक पडत नाही म्हणून दुसरे औषध मार, असे करत राहतो, म्हणून या सर्व बाबी टाळण्यासाठी शेतकऱ्याने सर्व गोष्टींची व्यवस्थित माहिती घेऊनच या लेखात दिल्याप्रमाणे औषध फवारणी केल्यास वरील समस्य उद्भवत नाहीत व हमखास इलाज होतो.कॉलर रॉट टाळण्यासाठी सप्तामृत वापरण्याचे प्रमाण व कृती दिलेल्या तक्त्याप्रमाणे करावे.विशेष बाब : हे द्रावण ओतताना पिकास पणी देऊन वापसा येणे आवश्यक आहे. हे ओळखायचे असल्यास पायात बुट किंवा चप्पल न घालता पिकातून चालताना पायांना सुखद गारवा मिळून त्याची प्रतिक्रिया म्हणजे तापट होळ्यांना गारवा जाणवल्याची अवस्था असते. या अवस्थेत द्रावण या पद्धतीनेच ओतणे आवश्यक आहे. यालाच तज्ज्ञ ‘ बुंध्याजवळ चूळ भरणे ‘ असे म्हणतात. त्या पद्धतीने रोग बरा होत नाही. तेव्हा बुंध्यापासून रोगाची अवस्था पाहून होन इंचापासून ते एक फुटापर्यंत दोन बोटे उंचीवरून (पपयांचे झाड असल्यास ५ फूट ) सहा इंच झाडावर कड पडली असल्यावर खोडव्या पेशीवरून हे द्रावण ओतल्यानंतर काटलेली पँट किंवा पायजमा जसा शिंपी राफ्फू करतो त्याचप्रमाणे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे सप्तामृत मेलेल्या पेशी जिवंत करते व मृतावस्थेतून झाडे पुनर्जिवीत होतात. नवीन जोमदार फुट येऊन फुले, फळे पोसून टवटवीत होऊन फळे गोडी भरून अशा फळांना अधिक भाव शेतकऱ्याला मिळतो. हा आजवरचा अनेक शेतकऱ्यांच अनुभव आहे.वरील रोगग्रस्त (मृतप्राय) अवस्थेतून देखील काही शेतकऱ्यांनी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरून लाखो रुपये मिळविले आहेत. म्हणजे शून्यातून लाखो रुपये मिळतात तर तेथे किती टक्के नफा वाढला हे अपरिमित आहे.कॉलर रॉट टाळण्यासाठी सप्तामृत औषधे वापरण्याचे प्रमाणरोपाचे वय उंची औषध प्रमाण (१० लि. पाण्यासाठी)१) १ महिना ४ ते ६ इंच जर्मिनेटर- ३० मिली.थ्राईवर – ४०मिली.क्रॉंपशाईनर – ४० मिली.राईपनर -२० ते २५ मिली.प्रोटेक्टंट – एक चहाचा चमचाप्रिझम – ३० मिली.कृती : हे मिश्रण रोपांच्या २ इंच अंतरावर रोपांच्या सभोवार भाजीचा १ चमचा ओतणे.२) लागणीनंतर १५ ते २० दिवसांनी ९ इंच ते १ फूट जर्मिनेटर- ४०मिली.थ्राईवर – ६० मिली.क्रॉंपशाईनर – ६० मिली.राईपनर -३५ ते ४० मिली.प्रोटेक्टंट – दोन चमचे (४ ग्रॅम )प्रिझम – ४० मिली.कृती : हे मिश्रण प्रत्येक रोपांच्या सभोवार अर्धा कप किंवा ३० ४५ मिली ओतणे.३) लागणीनंतर १५ ते २।। महिने (फुले व फळे लागल्यावर ) १ ते २ फूट जर्मिनेटर- ६०मिली.थ्राईवर – ८०मिली.क्रॉंपशाईनर – ८० मिली.राईपनर – ५० मिली.प्रोटेक्टंट – १ काडेपेटी (२० ग्रॅम)न्युट्राटोन – ५० मिली.कृती : हे द्रावण प्रत्येक झाडास २०० ते २५० मिली (पाण्याचा उभा एक ग्लास ) या प्रमाणांत ओतणे. यामुळे कच्ची फळे, फुले, फळे लागलेली, पोसण्यापासून वंचित राहिलेली, फुले अर्धी सुकलेली पाने करपून करड्या जर्दाच्या रंगासारखी झालेली लक्षणे ठिक होतात.४) ३ महिन्यानंतर, उंची- २ ते ३ फूट, औषध प्रमाण- क्रमांक तीन प्रमाणेकृती : ५०० मिली द्रावण (एक सांगली तांब्या भरून ) झाडाच्या सभोवताली ओतणे. त्यामुळे पिकाचे निम्मे फळ पिकलेले असतानांच तोडण्यायोग्य झालेली काही फळे मध्यम अवस्थेत, फुलकळी सुकलेली, पिकलेली फळे रंगामध्ये निस्तेज हिरवी, पिवळसर ,(ढोबळी मिरचीमध्ये करड्यारंगाची) अकाली पिवळी पडणे, पाठीमागे पाने पूर्ण पिवळी पडलेली व करप्याने झपाटलेली पाने करपून खाण्याच्या ‘अकोल’ तंबाखूसारखी निस्तेज म्हणजेच उत्तरावस्था असते तेथे १ लिटर द्रावण ओतावे.फळकुजव्या (Fruit Rot)टोमॅटो / ढोबळी मिरचीवरील फळकुजव्या रोग कसा आटोक्यात आणाल ?अवस्था : उन्हाळा संपलेला असतो, वातावरणात ढग जमा व्हायची सुरुवात झालेली असते. उष्णता अधिक होऊन आर्द्रता वाढते व उष्णता परत कमी – कमी होत जाते आणि मग पावसाची चिन्हे दिसू लागतात. या चिन्हांचे रूपांतर धो – धो पूस पाडण्यात होऊन, या पावसाच्या पाण्याचे थेंब देठावर पडून, तेथून सरकून देठाच्या बेचक्यात, देठ व फळ जेथे जोडले जाते तेथे (Calyx) शिरून फल कुजण्यास सुरुवात होते. हे ओळखायचे कसे ?१) देठाच्या भोवताली, फळाच्या तळाजवळ कात केलेली नक्षीदार टिकली स्त्रिया लावतात त्या आकाराची, करड्या रंगाची रिंग (कड) हळूवार ते स्पष्टपणे दिसल्याचे जाणवते. चांगले दिसणारे फळ धरी नेल्यानंतर तिसऱ्या दिवशीच पूर्ण सडते, नासते.२) टोमॅटो, ढोबळी मिरचीच्या देठाच्या डाव्या बाजूस वरती खाकी, करड्या रंगाचा (पुस्तकाच्या ब्राऊन कव्हरच्या कलरचा ) लहान एक नवा पैसा ते जुन्या ढब्बू पैशाच्या आक्राचा चट्टा व देठाजवळ उपसल्यानंतर करड्या रंगाची गोल रिंग हळूवार ते स्पष्टपणे दिसल्याचे जाणवते. पाऊस होताच २ दिवसांमध्येच हजारो फळे सडतात, कुजतात, फळे तोडताना चारही बोटे फळात जातात आणि मग शेतकरी व फळे तोडणारे फळात अळी झाली अशा गैरसजुतीने कीटकनाशके मारत राहतात.३) या रोगांमुळे फळावर उजवीकडे वरच्या बाजूस तपकिरी रंगाचा लहान मुलांना तीट लावतात त्या आकाराचा डाग दिसतो यालाच देवी किंवा मूर असे म्हणतात. अशाच अनियमित किंवा देवीची लक्षणे फळाला खालून एक बोट वरती दिसून येतात. खालचा डाग वरच्या डागापेक्षा वेगळा असतो. ४ ते ५ दिवसांमध्ये संपूर्ण प्लॉट उध्वस्त होतो. असे होऊ नये म्हणून सुरुवातीलाचा जर्मिनेटर + थ्राईवर + क्रॉंपशाईनर + राईपनर+ प्रिझम + न्युट्राटोन प्रत्येकी ५०० मिली (वरील वातावरणाची अवस्था दिसण्याअगोदर १२ मिली व नंतर वाढवून ४० मिलीपर्यंत कॅलॅक्झीनचे प्रमाण ठेवावे) १०० लिटर पाण्यात मिसळून तीन वेळा फवारणी करावी. सुरूवातीपासून सप्तामृत औषधे वापरल्यास फळकुजव्या अजिबात होत नाही. रासायनिक खते या काळात वापरू नयेत. ऊन तापण्याच्या अगोदर पावसाचे पूर्वी व भाद्रपद उन्हाचे अगोदर (१५ दिवस ते १ महिन्यापुर्वी ) ‘कल्पतरू’ सेंद्रिय खताचा वापर एकरी ६० ते ७० किलो या प्रमाणात केल्यास जमिनीत गारवा निर्माण होऊन ‘फळकुजव्या’ कमी होण्याची शक्यता असते. जमिनीचे जैविक, भौतिक गुणधर्म सुधारण्याबरोबरच ‘कल्पतरू’ सेंद्रिय खतामुळेच फळकुजव्या टाळता येतो याचे संशोधन झाले तर नवीन क्रांती झाल्यासारखी होईल.फळकुजव्या झालेल्या

फळांची विल्हेवाट : फळकुजव्या झालेली फळे प्राथमिक लक्षणांपासून, प्रगत अवस्थेपर्यंत कधीही बहुतेक शेतकरी लाकडी / चहाची खोकी किंवा क्रेटस (पिंजरा ) यामध्ये तोडत असतात. ही फळे बदला म्हणून मार्केटला आणली जातात व नंतर रिकामी खोकी, क्रेटस गावोगाव जाऊन पालखीतल्या दिंडीसारखी परत प्रसर करतात. त्यामुळे अनके रोगांचा प्रसार वेगाने, झपाट्याने व अधिक प्रमाणात होतो. म्हणून औषध खपण्याचे प्रमाण वाढते आणि शेतकऱ्याच्या पदरी निराशा येते. तेव्हा कुजलेली फळे प्लॅस्टिकच्या बदलीमध्ये किंवा पिशवीमध्ये तोडावी, खाली पडू देऊ नयेत. अशी तोडलेली फळे खड्ड्यामध्ये जाळून टाकून त्यावर एक फूट माती लोटून खड्डा बुजवून टाकावा. असे न करता शेतकरी ही फळे शेताच्या कडेला बांधावर फेकून देतात. त्यामुळे रोगांचा प्रसार झपाट्याने होतो. म्हणून शेतकऱ्यांनी वादळापुर्वी ही धोक्याची सूचन समजावी आणि वरीलप्रमाणे खबरदारी घ्यावी.वरील कीड, रोग, विकृतींवर प्रतिबंधक व प्रभावी उपाय तसेच भरघोस, दर्जेदार उत्पादनासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या खालीलप्रमाणे फवारण्या कराव्यात.१) पहिली फवारणी : ( लागणीनंतर १० ते १५ दिवसांनी ) : जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली.+ प्रोटेक्टंट १०० ग्रॅम + प्रिझम १०० मिली. + हार्मोनी १०० मिली + १०० लि.पाणी.२) दुसरी फवारणी : (लागणीनंतर २५ ते ३० दिवसांनी) : जर्मिनेटर ३५० ते ४०० मिली.+ थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + प्रिझम २५० मिली.+ न्युट्राटोन २५० मिली.+ हार्मोनी २०० मिली + १५० लि.पाणी.३) तिसरी फवारणी : (लागणीनंतर ४० ते ४५ दिवसांनी ) : थ्राईवर ७५० मिली. + क्रॉंपशाईनर ७५० मिली.+ राईपनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + न्युट्राटोन ५०० मिली. + हार्मोनी ३०० मिली + २०० लि.पाणी.४) चौठी फवारणी : (लागणीनंतर ५५ ते ६० दिवसांनी) : थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. + राईपनर ७५० मिली. + न्युट्राटोन ७५० मिली.+ हार्मोनी ४०० मिली + २५० लि. पाणी.

drbawasakartechnology.com

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *