बाजारभाव
 शेती विषयक माहिती
 सल्लागार
 कृषीसेवा

 खरेदी
 विक्री
 भाड्याने

 नर्सरी
 अवजारे
 बियाणे
 खते
 जमीन
 पशुधन
 फळे
 भाजी
 डेअरी
 सेंद्रिय
 धान्य
  फुले

  ॲप

कृषी क्रांती बद्दल

Privacy And Policy
Terms And Conditions
© Krushi Kranti







पंजाब डख यांचा आज रात्रीचा हवामान अंदाज

24-05-2023


पंजाब डख यांचा आज रात्रीचा हवामान अंदाज 

आज 24 मे 2023 पंजाब डख यांचा आज पासून चा नवीन हवामान अंदाज शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आला आहे. सर्व शेतकऱ्यांनी शेतीची कामं जरा लवकर आटपून घ्या कारण की राज्यामध्ये मान्सूनची प्रगती होत चालली आहे म्हणजे जवळजवळ 27, 28 नंतर मान्सून आणखीन खूप प्रगती करणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष्यात द्यायचा आहे. 

24 मे आणि 25 मे आणखीन दोन दिवस राज्यात भाग बदलत मान्सूनपूर्व पाऊस पडणार आहे.त्यानंतर 29 मे, 30 मे, 31 मे आणि 1 जूनच्या दरम्यान राज्यामध्ये मान्सूनपूर्व पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे. 

विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडणार आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आपण आपल्या पाळीव प्राण्यांची काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या झाडाखाली उभा राहू नका. मान्सून आगमन यावर्षी जवळजवळ चार जून पर्यंत केरळमध्ये येईल आणि त्याच्यानंतर आठ, नऊ नंतर महाराष्ट्रात प्रवेश होणार आहे म्हणजे आठ पासून पाऊस सुरू होणार आहे. 

शेतकऱ्यांनो आता पाऊस थोडा जवळच आलाय. आज 24 तारीख म्हणजे आणखीन बारा तेरा दिवसात पाऊस आला म्हणून तुम्ही तुमची शेतीची कामे आवरून घ्या कारण चांगला पाऊस पडणार आहे.  

राज्यातील सर्व भागामध्ये म्हणजे सगळीकडे पडणार आहे. यंदा पावसासाठी खूप चांगली परिस्थिती आहे. 29 मे, 30 मे, 31 मे आणि 1 जूनला परत मान्सून पूर्व पाऊस पडणार आहे. म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष्यात घ्या. शेतीची कामे करून घ्या. 

Source : panjab dakh havaman andaj 

havaman andaj, panjab dakh, ajacha havaman andaj, pavasacha andaj,


शेअर करा

खात्रीशीर जाहिराती