संपर्क करा
आपल्या सोबत चर्चा करून आनंद वाटेल.

info@krushikranti.com
At-Post Baburdi ghumat, Tal Dist Ahmednagar
सतत विचारले गेलेले प्रश्न !

जेव्हा शेतकरी पिकवले माल मार्केट मध्ये विकण्यासाठी जातो, तेव्हा त्याला त्यानेच पिकवलेल्या मालाचे मूल्य ठरवण्याचा हक्क राहत नाही.ही पद्धध चुकीची आहे हे प्रकर्षाने जाणवते.
अश्या वेळी जर शेतकऱ्याने मालाची उत्तम मार्केटिंग केली मालाची उत्तम प्रत गुणवत्ता जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवली तर शेतकऱ्यांन समोर माल विकत घेणाऱ्यांचे जास्त पर्याय राहतील. मालाला मूल्य चांगले भेटेल आणि अश्या परिस्थिती मध्ये खऱ्या अर्थी शेतकरी बळीराजा असेल.
कृषी विषयक सल्ला व माहिती आपल्या कृषिक्रांती मध्ये मिळेल
आपल्या कृषिक्रांती वर म्हणजेच www.krushikranti.com वर आल्यावर तुम्हाला जाहिरात करा असे बटन दिसेल व तुम्ही त्या बटनावर जाऊन क्लिक करा व क्लिक केल्यावर तुम्हाला एक फॉर्म ओपन होईल व तुम्ही त्यामध्ये तुमच्या मालाची माहिती भरा भरल्यानंतर तुम्हाला लगेच तिथेच मेसेज येईल व आमच्या कडे तुमची जाहिरात आल्यावर व्यवस्थित पडताळणी करून वेबसाईटवर सोडण्यात येईल.
जाहिरात टाकण्यास काही तांत्रिक अडचण येत असल्यास तुम्ही आम्हाला संपर्क केल्यास आम्ही जाहिरात टाकण्यास मदत करू.
आजचे जग हे मार्केटिंग चे जग म्हणून ओळखले जाते.मार्केटिंग ची व्याख्या म्हणजे तुमचे प्रॉडक्ट, सेवा, मत, विचार जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहचवणे, त्यांना ते समजावणे आणि ते जास्तीत जास्त जनतेला वापरायला लावणे म्हणजे मार्केटिंग होय.
जगभर अनेक गोष्टींची मार्केटिंग केली जाते. वेगवेगळ्या नवीन जुन्या गोष्टी जणते पर्यंत पोहचवल्या जातात चतुराईने आपल्याला त्या वापरण्यास भाग पाडले जाते.
मग या युगात शेतकरी मार्केटिंग पासून लांब का? त्यांना देखील त्यांच्या पिकांची मार्केटिंग करता यायला हवी. त्यांना देखील त्यांच्या मालाला नावलौकिक मिळू चांगले मूल्य भेटले पाहिजे.
या शेतीच्या आधुनिक कल्पनेला साकार करण्यासाठी काम करणारे डिजिटल व्यासपीठ म्हणजे कृषी क्रांती. या नावीन्य पूर्ण संकलपनेचा भाग बना.