इको-पेस्ट ट्रॅप विकणे आहे
पिवळा चिकट सापळा व प्रकाश सापळा
शेतकऱ्यांना त्यांचा उत्पादन खर्च कमी करणे व एकात्मिक किड नियोजन करून मानवी शरीराला हानिकारक रासायनिक कीडनाशकांचा कमी वापर करून दर्जेदार शेती उत्पादनासाठी इको-पेस्ट ट्रॅप’ हा कमी खर्चात अत्यंत प्रभावी कीड व रोग नियंत्रणासाठी उपयुक्त असे तंत्रज्ञान आहे.
इको-पेस्ट ट्रॅप हा प्रकाश सापळा, चिकट सापळा आणि कामगंध सापळा याचे संयुक्तरित्या काम करते. पिवळ्या आणि निळा रंगाचा चिकट सापळा दिवसा शेतात उडणारे हानिकारक कीटक उदा. पांढरी माशी, तुडतुडे, फळ माशी, फुलकिडे, पंखाचा मावा, नागअळी ची माशी व इतर उडणारे बारीक कीटक त्याला आकर्षित होऊन चिटकतात.
तसेच मीज माशी,खोड किडीची माशी, कंदमाशी याचाही यामध्ये समावेश होतो.
या सापळ्यात ठराविक प्रकाश तिव्रतेचा व स्वयंचलीत लाईट लावलेला असुन तो अंधार पडल्यावर प्रकाशमान होऊन रात्री संचार करणारे विविध प्रकारचे गळ्याचे पतंग जसे की गुलाबी बोंडआळी पतंग, अमेरिकन बोंडआळी पतंग, टिपक्याची बोंडआळी पतंग , फळ पोखरणाऱ्या अळीचा पतंग, शेंडे पोखरणाऱ्या अळीचा पतंग, पाने गुंडाळणाऱ्या अळीचा पतंग उडणारे कीटक हे प्रकाशामुळे आकर्षित होऊन सापल्याला चिटकतात.
इको-पेस्ट ट्रॅप’ सापल्यातील दिवा स्वयंचलित असल्याने संध्याकाळी स्वयंप्रकाशित होतो व सकाळी सूर्योदयानंतर बंद होतो. हा सापळा फक्त रात्रीच नव्हे तर दिवसाही कीड नियंत्रणाचे प्रभावी काम करतो. त्यामुळे कीड नियंत्रणासाठी एक प्रभावी कमी खर्चाची उपायोजना आहे.
वापर करण्याची पद्धत –
- एकरी पाच ते दहा लावून द्यावे लागतात. आपण पुन्हा वापरात आणू शकतो.
- हे 2 AA पेन्सिल वर चालतात. हे सेल 20 ते 25 दिवस चालतात.
- सर्व पिकांमध्येये लावण्यास उपयुक्त आहे.( आपल्याकडे पिवळ्या कलर चे निळ्या कलरचे व पिवळ्या + निळा कलर चे ट्रॅप आहेत.)
महेश जाधव
संपर्क :- 8888128013
जैविक कृषी विज्ञान केंद्र कोलवड ता.जि बुलढाणा