Search
Generic filters

Asani chakri vadal : असनी चक्रीवादळाने मार्ग बदलला, राज्यात या ठिकाणी बरसणार पाऊस?

Asani chakri vadal

Asani chakri vadal : असनी चक्रीवादळाने मार्ग बदलला, राज्यात या ठिकाणी बरसणार पाऊस?

 

पश्चिम बंगालच्या खाडीत निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे असनी चक्रीवादळ (Asani Cyclone) निर्माण झाले आहे. या चक्रीवादळाने आता आपला मार्ग बदलला असून आंध्रप्रदेशच्या (Andhra Pradesh) दिशेने वाटचाल केली आहे. हवामान विभागाने आंध्रप्रदेशातील तीन जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. याच दरम्यान या चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रातील काही भागांत जाणवणार असल्याचा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे.

बुधवारी सकाळच्या सुमारास असनी चक्रीवादळ हे काकीनाडा आणि विशाखापट्टनमच्या किनारपट्टीच्या भागात धडकेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या दरम्यान वादळी वारे ताशी 100 किलोमीटर वेगाने वाहू शकतात, मुसळधार पाऊस पडू शकतो. आंध्रप्रदेशातील पूर्व गोदावरी, पश्चिम गोदावरी आणि यनम या तीन जिल्ह्यांना रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. चक्रीवादळ वेगाने आंध्रप्रदेशच्या दिशेने कूच करत आहे. या काळात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती 12 मे पर्यंत राहण्याचा अंदाज आहे.

महाराष्ट्रावर काय परिणाम?

असनी चक्रीवादळाचा प्रभाव महाराष्ट्रातील (Asani Cyclone affect on Maharashtra) कोकणात, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागावर जाणवण्याची शक्यता आहे. या भागात ढगाळ वातावरण असणार आहे. यासोबतच मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली या परिसरातही असनी चक्रीवादळाचा परिमाण जावण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

राज्यातील पुढील हवामानाचा अंदाज

11 मे

कोकण – तुरळ कठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्र – तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता, उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता.

मराठवाडा – तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

विदर्भ – तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता.

12 मे

कोकण – तुरळ कठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्र – हवामान कोरडे राहण्याची शक्यता

मराठवाडा – हवामान कोरडे राहण्याची शक्यता

विदर्भ – तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता.

हे पण वाचा:- Pm kisan E-kyc : ई-केवायसीचे आता उरले 19 दिवस, अन्यथा लाभापासून वंचित..!

हवामान विभागाकडून सांगण्यात आले होते की, चक्रीवादळ गेल्या सहा तासांपासून 12 किमी प्रतितास वेगाने पुढे जात आहे. बुधवारी सकाळी उत्तर पश्चिम बंगालच्या उपसागरामार्गे मध्य पश्चिमेकडील आंध्रप्रदेश किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. त्यानंतर वादळ लगेचच आपला मार्ग बदलले आणि मछलीपटनम, नरसापूर, यनम, काकनीडा, टूनी आणि विशाखापट्टनम किनारपट्टीच्या दिशेने धडकेल.

संदर्भ:- lokmat.news18

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published.