Search
Generic filters

Havaman andaj maharashtra : उन्हाळ्यातही अवकाळीचे संकट कायम, ‘या’ जिल्ह्यांमध्ये पडणार पाऊस

Havaman andaj maharashtra

Havaman andaj maharashtra : उन्हाळ्यातही अवकाळीचे संकट कायम, ‘या’ जिल्ह्यांमध्ये पडणार पाऊस

 

उन्हाळ्यात का होईना अवकाळी पाठ सोडेल अशी आशा होती पण महिन्याकाठी पाऊस हा ठरलेलाच आहे. आता कुठे रब्बी हंगामातील पीक काढणीची लगबग सुरु झाली आहे. असे असतानाच पुन्हा राज्यभर अवकाळी पाऊस बरसणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे पिकांचे तर नुकसान होणार आहे पण काढणी झालेल्या शेतीमालही काळवंडण्याचा धोका आहे.

दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे अंतिम टप्प्यात असलेल्या आंब्याची गळ होण्याचा धोका आहे. किमान तीन ते चार दिवस हे पावसाचेच असणार आहेत. एवढेच नाही तर मेघ गर्जनेसह पाऊस बरसणार असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. महिन्याभरापासून होत असलेल्या वातावरणातील बदलाचा सर्वाधिक परिणाम हा आंबा फळपिकावर झाला असून पुन्हा दक्षिण कोकणातच अधिकचा पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे.

दक्षिण महाराष्ट्रात अवकाळी बरसणार

गेल्या चार दिवसांपासून राज्यात ढगाळ वातावरण आहे पण पाऊस नाही. त्यामुळे थेट फळबागा आणि पिकांवर परिणाम झालेला नव्हता. पण आता 23 ते 26 मार्च या कालावधीत अवकाळीची अवकृपा राहणार आहे. आतापर्यंत झालेल्या अवकाळी पावसामुळे उत्पादनात तर घट झालीच होती पण कोकणात आंबा गळतीचा सर्वाधिक धोका झाला आहे. मध्यंतरी अवकाळी त्यानंतर वाढत्या उन्हाच्या झळा आणि आता पुन्हा अवकाळाचे सावट त्यामुळे शेवटच्या हंगामातील आंबा शेतकऱ्यांच्या पदरी पडणार की नाही अशी अवस्था झाली आहे.

पावसाचे प्रमाण कमी पण धोका अधिक

राज्यातील दक्षिण कोकण म्हणजेच ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये पाऊस बरसणार आहे तर दक्षिण मध्य महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर आणि विदर्भात अवकाळीची अवकृपा राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे. म्हणजेच पुन्हा एकदा कोकणातील आंबा फळपिकावरच या अवकाळीचा परिणाम होणार आहे. वर्षभर निसर्गाच्या लहरीपणामुळे फळपिकांचे नुकसान झाले आहे. आता काढणी दरम्यानही हे नुकसान अटळ असल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

हे पण वाचा:- मार्च अखेरपर्यंत 200 कोटींची कर्जमाफी, राज्य सरकार चा निर्णय नेमका कुणासाठी?

मराठवाड्यातही ढगाळ वातावरण

मराठवाड्यात पाऊस नाही पण ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काढणी झाली की लागलीच पिकांची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करणे गरजेचे आहे. जे खरिपात झाले त्याची पुनरावृत्ती होऊ न देता उत्पादनाची सुरक्षा ही महत्वाची आहे. शिवाय या वातावरणामुळे ज्वारीची कणसे काळवंडण्याचा धोका असतो. त्यामुळे काढणी, मोडणी आणि लागलीच मळणी कामे उरकून पीक पदरात पाडून घेण्याचा सल्ला कृषितज्ञ रामेश्वर चांडक यांनी दिला आहे.

source:- tv9 marathi

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published.