साबुदाणा कसा व कोणत्या झाडापासुन बनवतात, जाणून घ्या सविस्तर

साबुदाणा कसा व कोणत्या झाडापासुन बनवतात, जाणून घ्या सविस्तर
Avatar of Krushi Kranti Editorial Desk
Author: Krushi Kranti Editorial Desk

Published:

साबुदाणा कसा व कोणत्या झाडापासुन बनवतात, जाणून घ्या सविस्तर 

जेव्हा जेव्हा उपवासाची चर्चा असते तेव्हा साबुदाण्याचे नाव प्रथम येते. बर्‍याच प्रकारच्या पाककृती साबुदाणाने बनवल्या जातात आणि त्या उपवासाच्या दिवशी वापरल्याही जातात. पांढर्‍या मोत्यासारख्या दिसणाऱ्या या साबूदाण्याची चवही चांगली आहे. इतकेच नव्हे तर बर्‍याच रिपोर्ट्समध्ये असा दावाही केला गेला आहे की, हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. परंतु, साबुदाण्याविषयी बहुतेकदा एक प्रश्न विचारला जातो, की तो कसा बनविला जातो?

बर्‍याच वेळा आपल्या मनातही हा प्रश्न उद्भवतो की साबुदाणा  कसा बनविला जातो. बर्‍याच लोकांच्या मते तो लाकडापासून बनवला जोता. तर बरेच लोक त्यास त्याला बी म्हणतात. परंतु, आज आम्ही आपले सर्व गोंधळ दूर करणार आहोत आणि तो कसा बनविला जातो ते सांगणार आहे. तसेच बर्‍याच लोक साबुदाणा उपवासात खाणे योग्य का मानत नाही. व्रतामध्ये खाल्या जाणाऱ्या सर्वात लोकप्रिय वस्तू साबुदाण्याबाबत जाणून घ्या.

साबुदाणा कशापासुन बनतो?

छोट्या पांढर्‍या गोळ्यासारख्या दिसणारा साबुदाणा हा साबुदाण्याच्या झाडाच्या माध्यमातून तयार केल्या जातो. साबुदाणे थेट झाडावर वाढत नाही. लांब प्रक्रियेनंतर साबुदाणा तयार केला जातो. त्याला सागो पाम नावाच्या झाडापासून बनवले गेले आहे. दक्षिण भारतामध्ये सागो ही सामान्य गोष्ट आहे आणि ही वनस्पती आफ्रिकेतून भारतात आणली गेली आहे. ते तयार करण्यासाठी, या साबुदाणा वनस्पतीच्या खोडाचा मध्य भाग बाहेर काढला जातो. हा एक प्रकारचा टॅपिओका रूट आहे, याला कसावा देखील म्हणतात आणि त्यापासून साबुदाणा बनवला जातो.

कसा तयार केला जातो साबुदाणा?

वास्तविक, प्रथम हा लगदा मोठ्या भांड्यांमध्ये बाहेर काढला जातो आणि बर्‍याच दिवस पाण्यात ठेवला जातो. यानंतर, त्यात सतत पाणी देखील ओतले जाते. ही प्रक्रिया 4-6 महिन्यांपर्यंत वारंवार पुनरावृत्ती होते. त्यानंतर तयार केलेला लगदा बाहेर काढून मशीनमध्ये ठेवला जातो आणि साबुदाणा अशा प्रकारे मिळतो.

नंतर या लगद्याला वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये विभागले जाते. मग ते ग्लूकोज आणि स्टार्चपासून बनवलेल्या पावडरने पॉलिश केले जाते आणि अशा प्रकारे पांढर्‍या मोत्यासारखा दिसणारा साबूदाणा  बाजारात येण्यास तयार असतो. अशा एका लांब प्रक्रियेनंतर साबुदाणा बनविला जातो.

source : timesnowmarathi

For the latest agricultural news and information, add 8999625494 to your WhatsApp group.

Share