मजुराअभावी शेतकऱ्यांचा आधार, ड्रोन फवारणी…

मजुराअभावी शेतकऱ्यांचा आधार, ड्रोन फवारणी…
Avatar of Krushi Kranti Editorial Desk
Author: Suraj Ghodke (null)

Published:

मजुराअभावी शेतकऱ्यांचा आधार, ड्रोन फवारणी…

सध्या शेती आधुनिक होत आहे. बदलते तंत्रज्ञान शेतकरी आता आपल्या उशाशी ठेवत आहेत. पूर्वी मजुरांवर अवलंबून असणारे शेतकरी आता एका क्लिकवर शेती करायला लागले. त्याबरोबर अशा स्वरूपाचा बदल ग्रामीण भागातही होणारच आहे हे ओळखून शेतकऱ्यांनी आता नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करायला सुरुवात केली आहे.

त्याचा एक भाग म्हणून नानगाव परिसरातील अनेक शेतकरी ड्रोनच्या माध्यमातून ऊस व इतर मोठ्या पिकांवर अत्यंत कमी वेळेत कीड नियंत्रणासाठी फवारणी करत आहेत. ड्रोन एकावेळी १० लिटर औषध वाहून नेऊ शकतो, सोबत त्याचे स्वतःचे वजन १९ किलो असते. त्याला समोर व मागच्या बाजूला सेन्सर असतो, त्यामुळे अडथळा आल्यास लगेच समजते.

खालच्या बाजूला लक्ष देण्यासाठी तीन मीटरपर्यंतचे तत्काळ लक्षात येईल असे सेन्सर असते. सर्व प्रकारचे पाण्यात विरघळणारे कीड नियंत्रण टॉनिक अळ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठीचे विविध औषधे सहजतेने मारता येतात. सुरुवातीला जमिनीचे मॅपिंग करून घ्यावे लागते.

औषधाचे व्यवस्थित मिश्रण केल्यानंतर ड्रोन हवेत उडवला की अवघ्या ७ मिनिटात एक एकर एवढे क्षेत्र औषधाने फवारले जाते. सर्व गोष्टींवर लक्ष ठेवण्यासाठी या ड्रोनला कॅमेरा बसवलेला असतो. ड्रोन रिचार्जेबल बॅटरीवर असल्यामुळे एकावेळी किमान दहा ते बारा एकर क्षेत्र फवारले जाऊ शकते, शुद्ध पाणी वापरावे लागते.

शेतकऱ्यांची होणारी फरपट थांबली:

  • एक एकरला जास्तीत जास्त ६०० रुपये असा खर्च येतो. मजुराअभावी शेतकऱ्यांची होणारी फरपट ड्रोनच्या उपलब्धतेमुळे कमी झाल्या असल्याचे चर्चा सध्या शेतकरी करत आहेत.
  • या ड्रोनची किंमत १५ लाख रुपये असून, शासनाकडून यावर ५०% सबसिडी मिळते.
  • परिसरात असणाऱ्या ऊस, मका, गहू, कोबी, फ्लॉवर त्याचबरोबर वेगवेगळ्या फळबागा यावर योग्यवेळी फवारणीसाठी या परिसरात अनेक शेतकरी उपयोग करून घेत आहेत.
  • शेतकऱ्यांनी मजुरांची वाट न पाहता एकत्रित येऊन ड्रोनची खरेदी करू शकतात. कृषी विभागाकडूनही यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे.

For the latest agricultural news and information, add 8999625494 to your WhatsApp group.

Share