शेतीतील नॅनो खतांचा थरार, वाढीचा आणि बचतीचा मार्ग...

शेतीतील नॅनो खतांचा थरार, वाढीचा आणि बचतीचा मार्ग...
Avatar of Krushi Kranti Editorial Desk
Author: Suraj Ghodke (null)

Published:

शेतीतील नॅनो खतांचा थरार, वाढीचा आणि बचतीचा मार्ग...

पिकांची उत्पादकता वाढण्यासाठी शेणखत, कंपोस्ट खत व जैविक खतांचा वापर करावा. शास्त्रीय दृष्टिकोनातून आवश्यक असणाऱ्या मूल घटकांच्या पूर्ततेसाठी रासायनिक खतांचा संतुलित वापर करून नॅनो खताचा वापर वाढवा.

नॅनो खतांची फवारणी केल्यानंतर नत्र व स्फुरद झाडाच्या पाना वरच्या, बिया व मुळाच्या पृष्ठभागावर असणाऱ्या छिद्रांच्या माध्यमातून आतमध्ये प्रवेश करते व पानांच्या पेशीमधील पोकळीमध्ये साठवले जाऊन पिकांच्या आवश्यकतेनुसार झाडाला उपलब्ध होते. 

त्यामुळे नत्र व स्फुरद ही अन्नद्रव्ये विहित वेळेत योग्य प्रमाणात पिकांना उपलब्ध होतात. नॅनो पद्धतीमुळे खतांचा संतुलित वापर होऊन जमीन हवा व पाणी यांसारख्या मूलभूत घटकांना प्रदूषण मुक्त ठेवता येते. 

लागवडीच्या खर्चात बचत होते व पिकांच्या भरघोस उत्पन्नाची हमी प्राप्त होते, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.

नॅनो खताचा वापर कसा करावा?

पिकांच्या विविध अवस्थेत दोन वेळा फवारणी करून नत्र व स्फुरद या अन्न घटकांची पिकांना पूर्तता करून देणे शक्य आहे. दोन ते पाच मिलिलिटर नॅनो खत प्रतिलिटर पाण्यामध्ये मिसळून पिकाच्या प्रमुख वाढीच्या अवस्थेनुसार फवारणी करावी.

नॅनो खतांच्या उत्तम परिणामासाठी पहिली फवारणी पिकाच्या फुटवे/फांद्या फुटण्याच्या अवस्थेमध्ये व दुसरी फवारणी पिकाच्या फुलोरा/शेंगा लागणीच्या सात दहा दिवस अगोदर करावी.

फवारणी सकाळच्या वेळेत कमी उन्हामध्ये आणि हवेच्या कमी वेगामध्ये करावी. पाणी पूर्ण ओली होण्यासाठी आणि नॅनो खते समप्रमाणात सर्वत्र मिसळण्यासाठी पंपाला फ्लॅट फॅन किंवा कट नोझल लावून फवारणी करावी. नॅनो युरिया/डीएपी फवारणीद्वारे द्यावे. ठिबक व वाहत्या पाण्यातून देण्यात येऊ नये.

खताचे प्रकार:

  • भारत सरकारने नॅनो खते नॅनो युरिया (द्रवरूप) व नॅनो डीएपी (द्रवरूप) नवीन संशोधनाद्वारे शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे.
  • नॅनो युरिया व नॅनो डीएपी द्रवरूप हे ५०० मिली पॅकिंगमध्ये असून, नॅनो युरियामध्ये ४ टक्के नत्राचे प्रमाण तसेच नॅनो डीएपीमध्ये ८ टक्के नत्र व १६ टक्के स्फुरद एकूण वजनाच्या प्रमाणात असते.
  • नॅनो युरिया व डीएपीद्वारे पिकांना नत्र व स्फुरद फवारणीच्या माध्यमातून उपलब्ध होते.
     

For the latest agricultural news and information, add 8999625494 to your WhatsApp group.

Share