ठिबक सिंचनासाठी शेतकऱ्यांचे अनुदान थांबले…

ठिबक सिंचनासाठी शेतकऱ्यांचे अनुदान थांबले…
Avatar of Krushi Kranti Editorial Desk
Author: Suraj Ghodke (null)

Published:

ठिबक सिंचनासाठी शेतकऱ्यांचे अनुदान थांबले…

इंदापूर तालुक्यामधील १५१० शेतकऱ्यांनी २०२३-२४ मध्ये ठिबक सिंचन अनुदानासाठी प्रस्ताव दिले होते. त्या पैकी कृषी विभागाने शासनाच्या दिलेल्या पहिल्या हप्त्यातील रकमेमध्ये तालुक्यातील फक्त ६०० ते ७०० शेतकऱ्यांनाच अनुदानाचा लाभ मिळाला आहे.

उरलेले ८०० ते ८५० शेतकरी अद्यापही ठिबक सिंचनाच्या अनुदानापासून वंचित राहिले असल्याचे चित्र दिसून येत आहे. यंदा पावसाने जरी चांगली साथ दिलेली असली, तरी ठिबक सिंचनाचा वापर हा करावाच लागतो.

कारण, फेब्रुवारी-मार्चमध्ये पाण्याची तीव्र टंचाई भासतेच. अशावेळी पिकांना ठिबक सिंचनद्वारेच पाणी देण्याची गरज असते. जानेवारी, फेब्रुवारी, मार्चमध्ये पावसाने ओढ दिल्यास शेतामधील पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांना धडपड करावी लागते.

त्यामुळे पाण्याची काटकसर करण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर करावा लागतो. अशातच पाणी वाचवा ठिबक सिंचनाचा वापर करा, अशी घोषणा शासन करीत आहे, परंतु इंदापूर तालुक्यात शासनाने पाठविलेला निधी कमी पडल्यामुळे ८०० ते ८५० लाभार्थी या अनुदानापासून वंचित राहिले आहेत.

शासन प्रत्येक वर्षी विविध योजनांची घोषणा करत असते, परंतु त्यामधील अनेक योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत नाहीत. तर, पोहोचणाऱ्या योजनांचे अनुदान वेळेवर मिळत नाही. यामुळे या योजनेच्या कार्यकाळात शेतकऱ्यांची फरपट होते. शासन शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहे की काय, हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

अल्पभूधारक शेतकरी राहतात वंचित

  • शासन २५ बाय ३० फूट, ३० बाय ३० व ३४ बाय ३४ जागेच्या शेततळ्यासाठी ७५ हजार रुपये अनुदान देते, पण त्यासाठी जमीन जर खडकाळ लागली, तर एक ते दीड लाखापर्यंत खर्च येतो. 
  • ठिबक सिंचनासाठी एकरी ४० ते ४५ हजार रुपये खर्च येतो.

मात्र, शासनाने ठरवून दिलेल्या रकमेच्या ८० टक्के रक्कम ही अनुदानापोटी ती पण अल्पभूधारक शेतकऱ्याला दिली जाते. यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांना शासनाच्या मागेल त्याला शेततळे व सवलतीचा फायदा घेता येत नसल्याचे दिसून येत आहे.

For the latest agricultural news and information, add 8999625494 to your WhatsApp group.

Share