Search
Generic filters

नवीन कर्ज माफी

सविस्तर माहिती

नवीन कर्ज माफी 

नवीन सरकारने केलेल्या कर्ज माफीवर काहीजणांनी स्वागत केले व काही जणांनी विरोध केला

पण एका शेतकऱ्याला त्या कर्जमाफीबद्दल बोलायचं झालं तर कुठं बोलायचं तर त्यासाठी आपल्या कृषीक्रांती वर चर्चासत्र हा उपक्रम चालू केला आहे तरी सर्व शेतकरी वर्गाने आपले कर्जमाफी विषयी आपले मत नक्की कमेंट बॉक्स मध्ये नक्की व्यक्त करा म्हणजे इतर शेतकरी व तुम्हाला काय वाटते या माध्यमातून कळेल

धन्यवाद

santsahitya.in/

Post Views: [views id="4844"]

25 thoughts on “नवीन कर्ज माफी”

 1. Fasavi karj mafi ahe karan Regular shetkaryancha kahich fayda nahi shivay shednet . Polly house shetkaryancha yat samavesh nahi

 2. संदीप जाधव

  दोन लाखांपेक्षा जास्त शेतकर्‍यांच कर्ज असेल तर शेतकऱ्यांना सरासरी दोन लाख रुपये माफ व्हावे बाकी राहिलेली रक्कम शेतकरी भरतील

 3. Pravin Shivajirao Nigade

  कर्जमाफी ही सरसकट झाली पाहिजे. ज्या शेतकऱ्यांनी सप्टेंबर2019 पर्यंत कर्ज घेतले आहे थकीत असेल किंवा रेग्युलर सर्वांना 200000 पर्यंत माफी मिळाली पाहिजे.

 4. माझे कर्ज 3 लाख असल्याने 1 रूपया पण माफ झाला नाही..
  फसवी आहे योजना..

 5. 2 lakh paryant karj maff karun baki rakkam shatkari bartil pan yat atti lau naye nahi ter bhajap ani tumchat kai farak

 6. Maz karj 2 lakhanchya var ahe nidan 2 lakh tari maf vyayla have hotel khup viswas hota ya sarrkar vr pn vyarth ahe sarv

 7. अनुजा बिरप्पा बंदीछोडे

  माझे कर्ज सहकारी पतसंसंस्थेचे आहे 1लाख 20.000 रुपये तर माफ होईल का

  1. Shivaji Antram Sangapude

   थकबाकीदारांना 2,00,000 माफ केले तर प्रामाणिकपणाने नियमितपणे कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 2,50,000 माफ करावे जेणेकरून नियमितपणे कर्ज परतफेड केल्याचा पश्र्चाताप होणार नाही.
   #प्रामाणिकपणाचेबक्षिस

 8. विशाल थोरात

  आमचे 2010 चे कर्ज आहे पन या सरकारने 2015 नंतर चे 2 लाखापर्यंत माफ करायचा निर्णय घेतला आहे.
  जर आम्हाला शक्य झाले असते तर आम्ही तेव्हाच भरले असते. सरकारला विनंती आहे की सरसकट कर्ज माफी द्यावी

 9. जो इमान दारीने क़र्ज़ थकित ठेवित नाही त्याचे क़र्ज़ माफ करायला पाहिजे

 10. विलास डावखर

  शेतकऱ्यांना द्यायचंच असेल तर 8 अ धारक प्रत्येक शेतकऱ्याला ( 5 लाखांच्या पुढची चारचाकी असलेल्यांना वगळून, पंचायत समिती पासून पुढचे वगळून, सरकारी नोकरदार वगळून) 50 हजार किंवा 5 लाख सरकारच्या क्षमतेप्रमाणे द्यावेत. कर्जदार असो किंवा नसो. थकीत असो किंवा नियमित असो.
  अन्यथा कर्जमाफी करूच नये.
  खरेतर नियमित भरणाऱ्यांनाच प्रोत्साहन द्यायला पाहिजे. थकलेल्यांना माफ होतंय म्हटल्यावर ज्याची क्षमता आहे ते सुद्धा भरत नाहीत. हे प्रमाण असंच वाढत जाणार, अशाने सर्वच विस्कळीत होणार आहे.
  शेतकऱ्यांना कर्जमाफीपेक्षा कायम स्वरूपी वीज मोफत द्या, सर्वांना फायदा होईल.

 11. Yashwant khashaba bhosale

  Maze karja satara district co op bank kcc asun Sudha government auditor pick karja ka manat nahit? Please yavr vichar jarur karava.

 12. Suraj Vinayak Hirulkar

  शासनाने 1 एप्रिल 2015 नंतर उचल केलेल्या शेतकऱ्यांचे थकीत कर्ज माफ केले आहे .
  परंतु त्यापूर्वी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचे काय?
  ही अट काढून टाकण्यात यावी व मर्यादा 3 लखा पर्यंत वाढवावी

 13. प्रविण मोरे

  सरसगट कर्ज माफी द्या सर्व शेतकऱ्यांना ध्या ही विनंती

 14. प्रविण मोरे

  कर्ज माफी सरसगट झाली पाहिजे व नवीन कर्ज एकरी 75 हजार रुपये तंबोडतोब शेतकऱ्यांच्या खातात जमा करायला पाहिजे आमच्या विदर्भात एकरी 10 हजार रु देतात त्या मुळे आम्हाला काही एवढा दिलासा मिळत नाही करतात माननीय ठाकरे सरकार यांनी आम्हाला तात्काळ हा दिलासा द्या वा ही विनंती

  1. KAILAS MAHADU KHANDAGALE

   नमस्कार सरसकट कर्जमाफी व्हायलाच पाहिजे ज्या अल्पभुधारक शेतकरी वर्गाने आपला ७/१२ जोडुन जो कोणताही कर्ज २००००० लाखापर्यंत घेतला असेल तर तो माफ करावा .
   ही नम्र विनंती.

 15. राजेंद्र प्रकाश जवरे

  खरतर शेतकरी वर्गाला कर्ज घेण्याची वेळ येऊ नये याकडे सरकारने लक्ष घालने गरजेचे आहे त्यासाठी शेतकरी यांना फक्त मुबलक पाणी आणि शेतमालाला भाव या 2 गोष्टी द्या , याने सरकारचा पैसा, वेळ वाचेल आणि देशाचे उत्पन्न वाढेल.
  राहिला प्रश्न कर्ज माफीचा तर सरसकट 2 लाख माफी करावी आणि ज्याचे आताच 1.5 लाख माफी झाली असेल त्यांना फक्त 50 हजार रुपये माफी करावी .

 16. सदानंद

  एकतर सरसकट म्हणजे पीक कर्ज ,मध्यम मुदत कर्ज , गाय गोठा किंवा पाईपलाईन कर्ज जे थकीत आहे असं दोन ते तीन लाखापर्यंतच कर्ज एकदाच माफ करण्यात यावे कारण ज्या शेतकऱ्याचं पीक कर्ज थकीत नाही किंवा पीक कर्ज नाही म्हणजे ते कर्जबाजारी नाहीत असं नाही,तसेच आतापर्यंत दोन वेळा कर्जमाफी झाली त्या कर्जमाफीमध्ये त्याच त्याच धनदांडग्या शेतकऱ्याचं पुन्हा पुन्हा कर्ज माफ होत आहे कारण त्याचं कर्ज थकलेलं असतं किंवा थकवलं जात मग एक अट अशीही घाला की ज्या शेतकऱ्याचं 2008 आणि 2017 साली कर्जमाफ झालं आहे अशा शेतकऱ्याचं या कर्जमाफीमध्ये कर्जमाफ होणार नाही आणि मागील दोन्ही कर्जमाफीमध्ये ज्या शेतकऱ्याचं कर्जमाफ झालं नाही अशाच शेतकऱ्याचं फक्त कर्जमाफ करण्यात येईल मग ते पीककर्ज असो किंवा मध्यम मुदत असो किंवा गायगोठा असो किंवा पाईपलाईन असो जे थकीत आहे ते दोन ते तीन लाखापर्यंत माफ करण्यात यावे जर असं केलं तरच खऱ्या शेतकऱ्याचं कर्जमाफ होईल कारण मागील दोन्ही कर्जमाफीमध्ये भ्रष्टाचार झाला आहे आणि ठराविकच शेतकऱ्याचं कर्जमाफ करण्यात आलं किंवा केलं गेलं त्यामुळे खऱ्या गरजू प्रामाणिक शेतकऱ्याचं मात्र कर्जमाफ झालंच नाही ज्यांच्याकडे बंगले महागड्या कार आहेत अशाच शेतकऱ्याचं कर्जमाफ झालं पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा वेशेला मणीहार अशी अवस्था मागच्या 2008 आणि 2017 च्या कर्जमाफीची झाली आहे आणि खरा गरजू शेतकरी मात्र मागील दोन्ही कर्जमाफी पासून वंचित राहिला किंवा वंचित ठेवला गेला आहे म्हणून माझी एकच विनंती आहे जर कर्जमाफी करायची आहे तर ती सरसकट दोन ते तीन लाखापर्यंत करावी किंवा मग आजपर्यंत एकदाही ज्या शेतकऱ्याचं कर्जमाफ झालं नाही अशाच शेतकऱ्याचं फक्त असेल ते कर्ज दोन ते तीन लाखापर्यंत माफ करण्यात यावे तरच खऱ्या शेतकऱ्याचं कर्ज माफ होईल आणि त्याने वेळेत कर्ज भरल्याचं त्याला समाधान लागेल नाहीतर पुन्हा पुन्हा त्याच शेतकऱ्याचं कर्जमाफ होत गेलं तर एकही शेतकरी नियमितपणे कर्ज भरणार नाही आणि आत्महत्या कमी होण्याऐवजी वाढत जातील आणि मग तुम्ही कितीही कर्जमाफी केली तरी शेतकरी कर्जबाजारी च राहणार

 17. Shyamsundar ajbe

  दोन लाखांपेक्षा जास्त शेतकर्‍यांच कर्ज असेल तर शेतकऱ्यांना सरासरी दोन लाख रुपये माफ व्हावे बाकी राहिलेली रक्कम शेतकरी भरतील

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

खात्रीशीर जाहिराती

नवीन जाहिराती