शेतकरी समाजातील एक असा घटक आहे जो प्रगती पासून सतत दूर राहिला आहे. आज शेतकऱ्यांना शेती मालाचा भाव ठरवायचा झाला तर ते त्यांच्या हातात नाही. परिस्थिती, वेळ, साधन या गोष्टी सोबत तडजोड त्याला करावी लागते. व्यापारी जो भाव ठरवेल त्या भावाला माल विकावा लागतो. त्यात शेतकऱ्यांचे नुकसान होते.
शेतकऱ्याच्या अडचणीवर मात कारता येईल अशी एक वेबसाईट बाजारात आली आहे. तीचे नाव आहे कृषी क्रांती (www.krushikranti.com)
कृषी क्रांती ही एक मोफत ऑनलाईन वेबसाईट आहे, जिथे शेतकरी स्वतःच्या मालाची जाहिरात करू शकतो आणि भावसुद्धा स्वतः ठरवू शकतो. यामुळे बाजारात दलाल किंवा व्यापाऱ्यांच्या हातात न राहता, मालाचा दर थेट शेतकरी ठरवतो.
कृषी क्रांती वेबसाईट फक्त शेतकऱ्यांसाठी मर्यादित नाही. खालील व्यक्ती किंवा व्यवसायसुद्धा या वेबसाईटचा वापर करू शकतात:
जसे कि व्यापाऱ्याकडे कोणत्या मालाचा जर तुटवडा असेल तर तो वेबसासाईटवर जाहिरात पाहून तो शेतमाल असलेल्या शेतकऱ्या सोबत संपर्क साधून त्याची गरज भागवू शकतो.
अशा पद्धतीने या वेबसाईटचा फायदा फक्त शेतकऱ्यानाच नाही तर व्यापाऱ्याना व सर्व प्रकारच्या विक्रेत्यांना पण होईल. किरकोळ शेतमालाचे विक्रेते सुद्धा आपल्या शेतमालाची जाहिरात वेबसाईटवर करू शकतात. जेणे करून शेतकऱ्याच्या गरजेच्या वस्तू त्याचे भाव व त्याची प्रतवारी शेतकरी वेबसाईटवर पाहून ठरवू शकतो .व नंतर संपर्क साधून व्यवहार करू शकतो.
शेतकऱ्यानी, व्यापाऱ्यानी व विक्रेत्यांनी फक्त शेतीमालाच्या जाहिरातीसाठी वेबसाईटवर याव अस नाही तर (कृषी विषयक माहिती) नावाची संकल्पना देखील शेतकऱ्यासाठी सुरु केली आहे जेथे तज्ञ मंडळी आपले मत मांडतील व ते सर्वांना वाचण्यास उपलब्ध होतील.
महाराष्ट्रातील सर्व पिकांचे बाजारभाव. रोजच्या रोज पाहायला मिळतील.
शेतकऱ्यांचे प्रश्न व शंका विचारता येतात, इतर शेतकरी किंवा तज्ज्ञ उत्तरं देऊ शकतात.
शेतीसाठी लागणारे साहित्य – अवजारे, यंत्रं इत्यादी योग्य दरात, घरबसल्या मोबाईलवरून खरेदी करता येते.
कृषी विषयक माहिती, मार्गदर्शन अशे अनेक प्रकारचे व्हिडिओ – कमी वेळात मुद्देसूद माहिती मिळते.
आजची गरज आहे की शेतकरी आत्मनिर्भर व्हावा. कृषी क्रांती ही वेबसाईट शेतकऱ्याला स्वतःचा माल विकतानादर ठरवण्याचं स्वातंत्र्य देते. त्यामुळे दलालांचा खर्च कमी होतो आणि थेट ग्राहकांशी व्यवहार करता येतो.