कृषी जिप्सम पावडर
फुले, फळबाग आणि भाजीपाला सर्व प्रकारच्या पिकांसाठी उपलब्ध
कृषी जिप्सम म्हणजे कॅल्शियम सल्फेट (Dihydrate) Caso4.2H2o .
1. कृषी जिप्सम मुळे क्षारीय व चोपण मातीत होणारे फायदे
- जिप्सम जमिनीची सुपीकता वाढवते.
- जमीन भुसभुशीत होते.
- जमिनीची रचना बदलण्यास मदत होते.
- क्षारपड जमिनीतील सोडियम क्षारांचे कण जिप्सम मुळे सुटे होतात.त्यामूळे ते बाहेर फेकले जाऊन जमीन सुधारते.
- बियाण्याची उगवण चांगली होते.
- पाण्याबाहेर येणारे क्षार जिप्सम मुळे कमी होतात.
2. क्षारीय /चोपण मातीत कृषी जिप्सम चे पिकांवर होणारे फायदे :-
- पिकांना आवश्यक असलेले कॅल्शिअम आणि सल्फर कृषी जिप्सम मुळे योग्य प्रमाणत मिळते .
- पिकांची सामान्य वाढ आणि विकासाकरिता हे दोन्ही घटक महत्वाचे आहे .
- जिप्सममध्ये असलेल्या सल्फरमुळे पिकांचे विविध रोगांपासून संरक्षण होते .
- बियाणे उत्पादनासाठी तेलबियांच्या पिकासाठी तसेच वनस्पती तेलाच्या विशेष सुगंधासाठी जिप्समचा वापर प्रभावी ठरतो .