मानकर बायो एण्ड वर्मी कम्पोस्ट गांडुळ खत
आमच्याकडे चांगल्या क्वालिटीचे गांडूळ खत मिळेल.
गांडूळ खताचे फायदे :
- जमिनीचा सामू उदासीन करण्यास मदत होते.
- गांडूळ खतवापरामुळे जमिनीच्या भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्मात बदल होतो.
- जमीन भुसभुशीत होऊन पोत सुधारतो.
- उत्पादन क्षमता व जमिनीची सच्छिद्रता वाढते.
- जमिनीमध्ये पाण्याचा निचरा चांगला होऊन पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते, त्यामुळे कमी पाण्यात पिकाचे उत्पादन घेता येते.
- जमिनीमध्ये प्राणवायूचे प्रमाण वाढते, त्यामुळे जैविक क्रिया वाढते.
- गांडूळ खतामुळे उपयुक्त जिवाणूंची संख्या ३ ते ५ पटीने वाढते.
- पिकाच्या उत्पादनात वाढ होते, त्याचबरोबर उत्पादनातील प्रत सुधारते.
- पिकाचे उत्पादन वाढते.
विशेषतः रंग, साठवण क्षमता, चकाकी यामुळे उत्पादनाला जास्त बाजारभाव मिळतो.
रासायनिक खतवापरात बचत होऊन, खतावरील काही खर्च कमी होतो.