TRICO-TREAT
या प्रॉडक्ट चा वापर जमिनीमधील बुरशी नष्ट करण्याकरता करू शकता तसेच बीज प्रक्रियेसाठी सुद्धा करू शकता याचा फवारणीमध्येही वापर करू शकता याचा फायदा असा आहे की याचा वापर जमिनीमध्ये ही करता येतो व फवारणीमध्येही करता येतो.
याचा वापर काडीकचरा तसेच शेणखत उजवण्यासाठी सहाय्यक म्हणून करता येतो ज्यामुळे तीव्रवासाचा दर्प नाहीसा होतो. याचा वापर सर्व पिकांसाठी एकसमान करावयाचा आहे.
वापर करण्याची पद्धत खालील प्रमाणे
जमिनीमध्ये दर महिन्याला किमान दहा लिटर दिले गेले पाहिजे.
फवारणीसाठी
फवारणी मध्ये याचा वापर बुरशीचा प्रादुर्भाव व पिकानुसार योग्य वेळी केला पाहिजे फवारणीसाठी 16 लिटर प्रति पंप आपण पाच लिटर पर्यंत या द्रावणाचा वापर करू शकता.
दोन किलो गूळ व दोन किलो उकडलेला बटाटा गुठळी न ठेवता बारीक करून टाकीमध्ये टाकून टाकीला सच्छिद्र कापडाने पूर्ण झाकून ठेवणे.
दिवसातून दोन वेळा घड्याळाच्या काट्याप्रमाणे ढवळणे. पाच ते सात दिवसांमध्ये तयार होते. तयार झालेले द्रावण एक महिन्यामध्ये जमिनीमध्ये व फवारणी मध्ये देऊन संपवावे.