उत्तम क्वालिटीचे गांडूळखत, गांडूळ खताचे बेड, गांडूळ कल्चर मिळेल
गांडूळखत का वापरावे नक्की वाचा.
गेली ४००० वर्षापासून आपले पूर्वज शेती करतात. त्यावेळी शेतकरी सेंद्रीय खते भरपूर प्रमाणात वापरत असत. त्यामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहिली. गेल्या ५०-६० वर्षांपासून शेतकरी रासायनिक खते वापरत आहेत. पाणी व रासायनिक खताच्या अति वापरामुळे महाराष्ट्रातील जमिनी चोपण होत आहेत व अशा जमिनी पडीक पडत आहेत. महाराष्ट्र राज्यामध्ये ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव येथे १९६० साली उसावर संशोधन केले असता गांडूळामुळे उसाचे उत्पादन आणि साखरेचा उतारा वाढतो हे सिद्ध झाले आहे.
गांडूळांचे व गांडूळ खता चे उपयोग
- माती च्या दृष्टिने गांडूळामुळे जमिनीचा पोत सुधारतो
- मातीच्या कणांच्या रचनेत योग्य असा बदल घडविला जातो.
- गांडूळामुळे जमिनीची धूप कमी होते.
- गांडूळांच्या बिळांमुळे झाडांच्या मुळांना इजा न होता जमिनीची नैसर्गिक मशागत केली जाते.
- जमिनीत पाणी धरुन ठेवण्याची क्षमता वाढते.
- जमिनीत हवा खेळती राहून मुळांची वाढ चांगली होते.
- बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होते.
- जमिनीचा सामू ( पी.एच.) योग्य पातळीत राखला जातो.
- गांडूळ खालच्या थरातील माती वर आणतात व तिला उत्तम प्रतीची बनवितात.
- जमिनीतील उपयुक्त जिवाणूंच्या संख्येत भरपूर वाढ होते.
गांडूळ खतामध्ये ह्युमसचे प्रमाण भरपूर असल्याने नत्र, स्फुरद पालाश व इतर सूक्ष्मद्रव्ये झाडांना भरपूर व लगेच उपलब्ध होतात.
शेतकयांच्या दृष्टीने फायदे
- इतर रासायनिक खतावर पूर्णतः अवलंबून न राहता स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल.
- जमिनीची उत्पादन क्षमता वाढते.
- पाणी देण्याचा कालावधी कमी होतो.
- झाडांना, पिकांना पाणी देण्याचे प्रमाण कमी होत असल्याने मिळणारे उत्पादन जास्त व चांगल्या दर्जाचे असल्याने शेतमालाची चांगली किंमत येते.
- रासायनिक खताचा खर्च कमी आणि पिकाच्या निरोगी वाढीमुळे कीटकनाशकाच्या खर्चात बचत.
अझोला बेड तयार करुन मिळतील
आपल्याकडे योग्य दरात अझोला बेड तयार करुन मिळतील. सोबतच अझोलाचे बीज पण मिळेल. अझोला जनावरे, शेळी, मेंढी पालन तसेच पोल्ट्री साठी. खूप फायदेशीर आहे.
अझोलाचे जनावरांसाठी फायदे -
- गायी म्हशींचे 2 ते 3 लिटर दूध वाढते तसेच दुधाचे फॅट पण वाढते.
- अझोला मध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने तसेच जीवनसत्वे असतात.
- जनावरांच्या अतिरिक्त खाद्याची (सुग्रास,पेंड) गरज कमी करते.