जैविक / सेंद्रिय आंबा मिळेल
आम्ही शिवपार्वती फार्म च्या माध्यमातून मौजे हिप्परगा तालुका उदगीर जिल्हा लातूर येथे आमच्या शेतामध्ये केसर आंब्याची बाग गेल्या वीस पेक्षा जास्त वर्षांपासून पिकवीत आहोत.
- आम्ही या आंब्याच्या झाडांना कुठल्याही प्रकारे रासायनिक खत घातलेले नाही किंवा केमिकल फवारणी केलेली नाही.
- आंबा बाग फक्त जीवामृत , गोकृपामृत व गायीचे शेणखत वापरून जैविक पद्धतीने जोपासना केलेली आहे. त्यामुळे सदर आंबे खूप चवदार व गोड झाले असून पिकल्यानंतर अधिक काळ टिकतात
- आपल्या मागील वर्षीच्या प्रचंड प्रतिसाद मुळे आम्ही यावर्षीसुद्धा वजनावर ऑनलाईन ऑर्डर घेऊन केसर आंबे विक्री करणार आहोत.
- या वर्षी गेल्या वर्षी पेक्षा खूपच कमी आंबे लागले आहेत त्यामुळे प्रथम ऑर्डर देणाऱ्या ना प्रथम आंबे देणार आहोत. आपण आंबा प्रेमी असल्यामुळे अत्यंत खात्रीशीर स्वादिष्ट केसर आंबे आपणास पुरविले जातील.
- आंबे संपण्यापूर्वी आम्हाला व्हाट्सअप नंबर 8669034070 वर आगावू ऑर्डर बुक करावी. कमीत कमी 10 किलो आंब्याची ऑर्डर असावी अधिक ट्रान्सपोर्टचा खर्च असेल.
- सध्या मुंबई, नवी मुंबई, पुणे, नागपूर, नासिक, औरंगाबाद या शहरात आंबे पाठविण्याची सोय आहे.
- ग्राहक आमच्या शेतात स्वतः येऊन फ्रेश तोडलेले आंबे वजनावर घेऊन जाऊ शकतात.
आंबे विक्री भाव प्रती किलो ₹160/- असून 50 किलो पेक्षा जास्त खरेदी वर ट्रान्सपोर्टचा खर्च द्यावा लागणार नाही.
धन्यवाद
बलराज लंजीले सेवानिवृत्त Dy SP/ ACP
शिवपार्वती फार्म, हिप्परगा (डाऊळ) तालुका उदगीर जिल्हा लातूर