केशर आंब्याचा बाप - गिर केशर
केशर आंबा भारतभरात बहुतांश ठिकाणी लागवड केला जातो, परंतु त्याचे मूळ हे गिर परिसरातील (गुजरात मधील जुनागड - गिर अभयारण्य - गिर सोमनाथ) आहे.
येथील केशर ची चव सर्वोच्च आहे. त्यामुळे याला Geographical Indication (GI) मानांकन मिळाले आहे.
गर आकर्षक केशरी रंगाचा, अप्रतिम गोडी, उत्तम व मधुर चव, चांगल्या किपिंग क्वालिटीमुळे गिर केशर खरेदीला प्रथम प्राधान्य मिळते. 80 % फळे निर्यातक्षम दर्जाची असतात.
फळाचे सरासरी वजन 250 ते 350 ग्राम असते. कोय बारीक असल्याने गराचे प्रमाण अधिक असते.
मार्च व एप्रिल मध्ये हापूसच्या बरोबरीने दर मिळतो
टिप : गुजरात चा केशर म्हणजे (वलसाड, नवसारी, वासदा, धरमपुर ई) गीर केशर नाही.
फक्त व्यावसायिक लागवडीकरीता ओरिजीनल गीर केशर रोप हवे असल्यास संपर्क करा.
रोपांची किंमत :
हे रेट होलसेल रोपांकरिता आहेत.