जिरेनियम रोपे मिळतील
नमस्कार शेतकरी मित्रानो आज आपण अशी एक शेती बगणार जी शेती शेतकऱ्यांना सदनशील व भरघोस उत्पन्न देणार ती शेती म्हणजे जिरेनियम शेती
- ही एक औषधी सुगंधी वनस्पती आहे .
- या वनस्पतीची पाने फांद्या सुवासिक असतात
- जिरेनियम पासून सुगंधी तेलाची निर्मिती केली जाते
- या तेलाचा उपयोग सौंदर्यसाधने औषधे अत्तरे यांसाठी केला जातो
- या तेलाची बाजारामध्ये पुरवठा पेक्षा मागणी जास्त आहे साधारणतः पाचसे टन गरज असताना वीस ते पंचवीस टनांपर्यंत जगभरात उत्पन्न होते
- या या तेलाची हमीभावाने खरेदी केली जाते *तेल काढण्यासाठी ऊर्ध्वपातन पद्धतीचा उपयोग होतो
- बारमाही वाढणारी सदाहरित झुडूपवर्गीय वनस्पती आहे .
- लागवड साधारणतः बारमाही केली जाते .
- सामान्य तापमानात वाढणारी ही वनस्पती आहे . ( 15 अंश सेल्सियस ते 45 अंश सेल्सिअस पर्यंत )
- पाण्याची गरज सामान्य असते अति पाणी किंवा अति पाण्याचा ताण या वनस्पतीला सहन होत नाही .
- सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये या पिकाची लागवड करता येते .
- एकदा लागवडीनंतर तीन वर्षांपर्यंत या पिकाचे उत्पादन घेता येते (खोडवा पद्धतीने )
- लागवडीनंतर सुमारे 105 ते 120 दिवसांमध्ये या पिकाचे उत्पादन चालू होते व त्या नंतर 80 ते 90 दिवसात उत्पन्न मिळत असते
- एका वर्षामध्ये सरासरी तीन ते चार वेळा या पिकाचे उत्पादन मिळते
- प्रत्येक कापणी मधून12 ते 15 टन ओल्या पाल्याचे उत्पादन होते
- एक टन 5500 ते 6000 रु प्रमाणे विकत घेतला जातो
- या पिकाचे उत्पादन सेंद्रिय तसेच रासायनिक पद्धतीने घेता येते
- पिकाची लागवड सरी पद्धतीने केली जाते (3 × 1)
- एकरी साधारणतः 10000 हजार रोपे लागतात
- एका रोपाची किंमत सहा रुपये असते
- मल्चिंग पद्धतीने सुद्धा या पिकाची लागवड होते
- इतर पिकांप्रमाणेच या पिकालाही खते व पाण्याचा पुरवठा करावा लागतो
- जनावरे किंवा इतर पशु या पिकाला खात नाही
जिरेनियम खरेदी विक्री व मार्गदर्शक केले जाईल