महोगनी विश्व ॲग्रो लिमिटेड
महोगनी विश्व ॲग्रो लिमिटेड
करारा अंतर्गत दिल्या जाणाऱ्या सुविधा
- ४५० रोपे, वाहतूक खर्च, करार फी.
- कार्बन क्रेडिट प्रकल्प भागधारक नोदणी ते ऑडिट प्रक्रिया फी.
- महोगनी लागवड केलेल्या शेतीला प्रत्यक्षरित्या किंवा प्रिसिझन फार्मिंगद्वारे पीक व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन.
- लाकूड कापणी परवाना, वाहतूक परवाना व इतर प्रयोजनासाठी शेतकरी बांधवांच्या सहयोगाने मार्गदर्शन केले जाईल.
- बियांची व अंतिम लाकूड उत्पादनाची संस्था / व्यापाऱ्यांमार्फत विक्री व खरेदी प्रचलित चालू बाजारभावानुसार करून देणे.
- प्रथम १५ वर्षीय कापणीनंतर पुर्नलागवडीसाठी मोफत रोपे देण्यात येतील.
- कृषी वनीकरण व पुनर्वनीकरण (Afforestation and Reforestation) प्रकल्पाला वेरा (VERRA) रजिस्ट्री अंतर्गत यशस्वीरीत्या प्रमाणित केले आहे. या यशाचे सर्वत्र ठिकाणावरून कौतुक होत आहे.
एकरी १५ वर्षातील उत्पादनाचे अंदाजपत्रक
कार्बन क्रेडिट:
- ४ थ्या वर्षी वृक्षाची उत्तम वाढ व संख्या (४४४) असलेल्या महोगनी लागवड क्षेत्रासाठी कार्बन क्रेडिटची प्रक्रिया (अधिकृत तपासणी आणि पडताळणीनंतर) राबवली जाईल.
- कार्बन क्रेडिटची जागतिक पातळीवर योग्य दरानुसार विक्री केली जाईल.
- कार्बन क्रेडिटचा मोबदला १५ वर्षापर्यंत शेतामध्ये महोगनीचे वृक्ष ठेवणाऱ्या व कापणीनंतर पुर्नलागवड करणाऱ्या शेतकऱ्याला मिळेल.
बियांचे उत्पन्नः
- ५०० रुपये प्रति किलो दराने किंवा प्रचलित चालू बाजारभावानुसार विक्री करून दिली जाईल.
लाकडांचे उत्पन्नः
- ५०० रुपये प्रति घनफूट द्राने किंवा प्रचलित चालू बाजारभावानुसार आणि लाकडाच्या प्रतवारीनुसार विक्री करून दिली जाईल.
- एकरी सरासरी ६००० ८००० घनफूट लाकूड तयार होईल.
संस्थेद्वारे शेतकरी बंधूंच्या लाकूड व बियांच्या एकूण उत्पादनावर १५ टक्के शुल्क घेतले जाईल.
कार्बन क्रेडिटच्या एकूण उत्पन्नावर २१ टक्के शुल्क घेतले जाईल.
एकरी वृक्ष लागवड खर्च ४२,००० रुपये
महोगनी कृषि-वनशेती
- भारत हा कृषिप्रधान देश आहे.
- झाडे व हंगामी पिके यांची लागवड करून एकनित उत्पादन घेण्याच्या पद्धतीला कृषि-वनशेती असे म्हणतात.
- उत्तम प्रकारची जमीन व हवामान अनुकूल असल्याने उत्तम लाकूड निर्मिती हे संस्थेचे ध्येय आहे.
- सेंद्रिय कर्ब वाढून जमीनीची सुपीकता वाढते.
- पक्षी, फुलपाखरे व मधमाश्याचा नैसर्गिक आदिवासास अनुकूलता व जैवविविधता संगोपन.
- बियांचा उपयोग कर्करोग, क्षय रोग, मलेरिया, अॅनेमिया, मधुमेह व अनेक आजारांच्या औषधामध्ये उपयोग होतो.
- महोगनी लालसर लाकडाचा वापर फर्निचर, घर-इमारती बांधकाम व जलरोधक असल्यामुळे फ्लोरिंग करणे व जहाज बांधणीसाठी होतो तसेच म्युझिकल इन्स्ट्रुमेंट, प्लायवुड, वूडन पॅनेल इत्यादी मध्ये होतो.
- पर्जन्यमान सुधारणा व जागतिक तापमान वाढ (ग्लोबल वार्मिंग) रोखण्यासाठी महोगनी वृक्ष लागवड सहाय्यभूत ठरते.
महोगनी लागवडीचे नियोजन
- पाण्याचा उत्तम निचरा होणारी सुपीक जमीन असावी.
- एक एकर क्षेत्रासाठी ४४४ रोपांची लागवड करावी.
- लागवडीचे अंतर १० x १० फूट किंवा ८ × १२ फूट असावे.
- खड्याची लांबी, रुंदी व खोली १.५ x १.५ x १.५ फूट असावी.
- आंतरपीक घेताना कृषी सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
- महोगनी वृक्षांपासून योग्य अंतर सोडून आंतरपीक घेण्यात यावे.
- ३ ते ५ वर्षापर्यंत हंगामी आंतरपीके घेता येतात.
- महोगनी वृक्षांची उंची किमान ४० ते ५० फूट होते.
- वृक्ष परिपक्व होण्यासाठी किमान १५ वर्षाचा कालावधी लागतो
कार्बन क्रेडिट
- वनशेतीला कार्बन क्रेडिटद्वारे प्रोत्साहन.
- क्योटो प्रोटोकॉल (१९९७) नुसार कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी कार्बन क्रेडिट प्रणालीद्वारे आर्थिक प्रोत्साहन दिले जाते.
- वृक्षांद्वारे कार्बन डायऑक्साइड (CO2) घेऊन त्याचे रूपांतर कर्बरूपी घन पदार्थात केले जाते.
भारतातील लाकूड उद्योगातील संधी
- भारतातील २०२० मध्ये ५७ दशलक्ष घनमीटर लाकडाची मागणी होती, तर २०३० मध्ये ९८ दशलक्ष घनमीटर असेल.
- निर्यातक्षम लाकूड निर्मितीद्वारे ग्रामीण भागात उद्योग व रोजगार उपलब्ध करणे.
- इमारती लाकूड, बांधकाम क्षेत्र, कागद निर्मिती, प्लायवुड, पॅनल्स, फर्निचर, हस्तकला यासह विविध प्रकारच्या उद्योगांसाठी लाकडाची आवश्यकता आहे.
- दिवसेंदिवस लाकडाची वाढती मागणी पाहता वरील गरज पूर्ण करण्यासाठी कृषि-वनशेती महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे.
प्रिसिझन फार्मिंग (Precision Farming)
- सॅटेलाईट मॅपिंग आर्टीफिशिअल इंटेलिजन्सद्वारे (AI) मार्गदर्शन.
- कीड, रोग, पाऊस व वादळ यांची पूर्वसूचना.
- पाणी नियोजन (ड्रिप नळी सर्वेक्षण):- पिकाखालील जमिनीतील पाण्याच्या स्थितीबाबत सूचना.
- माती परीक्षणाद्वारे पिकाच्या स्थितीनुसार खते व औषधे यांचा तज्ञ सल्ला