बाजारभाव
 शेती विषयक माहिती
 सल्लागार
 कृषीसेवा

 खरेदी
 विक्री
 भाड्याने

 नर्सरी
 अवजारे
 बियाणे
 खते
 जमीन
 पशुधन
 फळे
 भाजी
 डेअरी
 सेंद्रिय
 धान्य
  फुले

  ॲप

कृषी क्रांती बद्दल

Privacy And Policy
Terms And Conditions
© Krushi Kranti







महोगनी करारशेती फायद्याची

21-04-2023


धनाचा तोचि धनी ज्याचे क्षेत्र महोगनी

मिटकॉन कन्सल्टन्सी अँड इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लि. समुह कंपनी महोगनी विश्व ॲग्रो प्रा. लि. पुणे.

कृषि - वनशेतीचा शाश्वत विचार !

देईल पयावरण संरक्षणासोबत आर्थिक समृद्धी !!

महोगनी लागवडीचे फायदे व गुणधर्मः

  • महोगणी वृक्ष लागवडीमध्ये ५ ते ७ वर्षापर्यंत हंगामी आंतरपिके घेता येतात.
  • महोगनी वृक्षांची किमान उंची ४० ते ५० फूट होते . 
  • झाड परिपक्व होण्यासाठी किमान १५ वर्षाचा कालावधी लागतो.
  • सूक्ष्म जीवाणू वाढल्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढून जमिनीची उत्पादक क्षमता वाढते.
  • जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढून जमिनीची धूप थांबण्यास मदत होते.
  • वातावरणातील कार्बन डायऑक्साईड मोठ्या प्रमाणात शोषून परिसरातील हवा शुद्ध होते.
  • जागतिक तापमान वाढ (ग्लोबल वार्मिंग) कमी होण्यास मदत होते.
  • बियांचा उपयोग कॅन्सर, टि-बी, मलेरिया, ॲनिमिया, डायबेटीस इत्यादी आजारांच्या औषधांमध्ये होतो.
  • वनस्पतीच्या लालसर लाकडाचा वापर म्युझिकल इन्स्ट्रुमेंट, प्लायवूड, पॅनल, फर्निचर इंटेरियर व जलरोधक असल्यामुळे फ्लोरिंग करणे, जहाज व घरे बांधण्यासाठी होतो.
  • पर्जन्यमान सुधारणा, पूर व दुष्काळ नियंत्रणास अप्रत्यक्षरीत्या • महोगनी वृक्षलागवड वरदान ठरते.
  • पक्षी, फुलपाखरे व मधमाशांचा नैसर्गिक अधिवासास अनुकूलता महोगनी या कृषि-वानिकीमुळे होते.

कार्बन क्रेडिट

कृषि-वानिकीकडे कार्बन क्रेडिट मिळवून देणारे आर्थिक उत्पन्नाचे साधन म्हणून ओळखले जाते.

कार्बन क्रेडिट प्रणालीची संकल्पना अधिकृतपणे क्योटो प्रोटोकॉलमध्ये (१९९७) औपचारिकपणे मांडण्यात आली ज्यामध्ये उत्सर्जन कमी करण्यासाठी आर्थिक प्रोत्साहन दिले जाते.

वृक्ष, वनस्पती वातावरणातील कार्बन डायऑक्साइड (CO2) वायु शोषून घेऊन त्याचे रुपांतर कर्बरुपी घन पदार्थात करुन तो खोड, फांद्या, मातीमध्ये साठवतात.

सुमारे २५-३२ टन प्रति एकरी कार्बनचे स्थिरीकरण
 

महोगनी वृक्ष लागवड साठी येणारा खर्च व शेतकरी बंधूंना मिळणाऱ्या सुविधा

एकरी महोगनी वृक्ष लागवड खर्च ५१,००० रुपये करारा अंतर्गत दिल्या जाणाऱ्या सुविधा:

  • ४५० रोपे लागवडीसाठी.
  • करारा अंतर्गत लागवडीपासून ३ महिन्यापर्यंत नैसर्गिकरित्या मर झालेल्या रोपांचे तुटीचे प्रयोजन. वाहतूक खर्च, करार फी.
  • लागवडीनंतर १२ महिन्यांसाठी जैविक खतांचे प्रयोजन.
  • कार्बन क्रेडिट प्रकल्प भागधारक नोंदणी ते ऑडिट प्रक्रिया फी. 
  • प्रत्यक्ष लागवड करतेवेळी कृषी सल्लागाराची/प्रतिनिधीची उपस्थिती व त्यानंतर दर ३ महिन्याला महोगनी लागवड केलेल्या शेतीला भेट देऊन पीक व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन.
  • अंतिम लाकूड कापणी परवाना, वाहतूक परवाना व इतर 
  • प्रयोजनासाठी शेतकरी बांधवांच्या सहयोगाने मार्गदर्शन केले जाईल. 
  • बियांच्या व अंतिम लाकूड उत्पादनाची संस्थे / व्यापाऱ्यांमार्फत विक्री व खरेदी प्रचलित चालू बाजारभावानुसार करून देणे.
  • प्रथम १५ वर्षीय कापणीनंतर पुर्नलागवडीसाठी मोफत रोपांचे प्रयोजन.

महोगनी उत्पादनाचे अंदाजपत्रक कार्बन क्रेडिट:

महोगनी लागवडीला ४ थ्या वर्षांपासून कापणीपर्यंत (१५ वर्ष) वृक्षाची उत्तम वाढ व सुस्थितीत असणाऱ्या (४४४ वृक्ष) लागवड क्षेत्राला कार्बन क्रेडिटचा मोबदला प्रति वर्षी प्रति हेक्टरी ५०,०००- १,५०,००० जागतिक दरानुसार मिळण्याची शक्यता आहे.

कार्बन क्रेडिटचा मोबदला १५ वर्षापर्यंत शेतामध्ये महोगनी वृक्ष राहतील व तदनंतर पुर्नलागवड केली तरच मिळेल.

बियांचे उत्पन्नः

महोगनीच्या फळांपासून मिळणाऱ्या बियांचे उत्पन्न किमान ५०० रुपये प्रति किलो दराने किंवा प्रचलित चालू बाजारभावानुसार खरेदी व विक्री संस्थे / व्यापाऱ्यांमार्फत करून दिली जाईल. 

लाकडांचे उत्पन्न :

महोगनी लाकडापासून मिळणारे उत्पन्न किमान ५०० रुपये प्रति घनफूट दराने किंवा प्रचलित चालू बाजारभावानुसार आणि लाकडाच्या प्रतवारीनुसार खरेदी व विक्री संस्थे / व्यापाऱ्यांमार्फत करून दिली जाईल.

१५ वर्षामध्ये कृषि-वानिकी या पीक पद्धतीचा योग्य अवलंब केला तर प्रति एकरी किमान ६००० घनफूट लाकूड तयार होईल. 

संस्थेचे उत्पन्नः

शेतकरी बंधूंच्या लाकूड व बियांच्या उत्पादनवर १५ टक्के व कार्बन क्रेडिटच्या उत्पन्नावर २१ टक्के शुल्क घेतले जाईल.

शेतकरी बंधूंना त्यांचे उत्पादन संस्थे व्यतिरिक्त इतरांना विकण्याच परवानगी असेल परंतु कराराप्रमाणे अशा विक्रीतून मिळालेल्या उत्पन्नावर १५ टक्के शुल्क संस्थेस द्यावे लागेल.

महोगनी विश्व ॲग्रो प्रा. लि.
मुख्य कार्यालय : पहिला मजला कुबेरा चेंबर्स , शिवाजीनगर , पुणे -४११००५, महाराष्ट्र.
विभागीय कार्यालय : मांजरी ग्रीन्स सोसा., फेज -२, १३- बंगलो, मांजरी बु . पुणे - ४१२३०७, महाराष्ट्र 

अधिक माहितीसाठी संपर्क :

किर्ती मॅडम       9119456969
प्रतीक्षा मॅडम     9022364020
दीपाली मॅडम    9112150027
 

व्हाट्सअँप वर संपर्क करण्यासाठी खालील लिंकचा वापर करा

https://wa.me/919119456969

https://wa.me/919022364020

https://wa.me/919112150027

कंपनी ची वेबसाईट

https://www.mahoganivishwaagro.com

https://www.mitconindia.com

कंपनी चा मेल

mahoganivishwaagro@gmail.com

mahogany tree information in marathi


--

महोगनी विश्व ॲग्रो प्रा लि

9119456969

9119456969

पुणे , ता. पुणे , जि. पुणे

शेअर करा

खात्रीशीर जाहिराती

संबंधित जाहिराती