MYCO - MEAL
या प्रॉडक्ट चा वापर सुरुवातीच्या काळामध्ये मुळी वाढण्यासाठी करता येतो
यामध्ये असणाऱ्या घटकांमुळे मुळी नैसर्गिकरित्या चांगली वाढू शकते
याच्या वापरामुळे केसमुळे खूप चांगल्या प्रकारे वाढतात आणि पिकाला काही अन्नघटकही चांगल्या प्रमाणात उपलब्ध होण्यास मदत होते
प्रामुख्याने फॉस्फरस ची गरज याच्या माध्यमातून चांगली पूर्ण होते याचा वापर खालील प्रमाणे
जमिनीतून देताना महिन्यातून सुरुवातीच्या काळामध्ये दोन वेळा ही दहा लिटर याप्रमाणे देऊ शकता.
तणनाशकाचा वापर केल्यानंतर साधारण पंधरा दिवसानंतर याचा वापर करणे गरजेचे आहे.
वनस्पतींच्या केस मुळे ह्या दर 21 दिवसांनी नवीन येत असल्याने साधारण दहा लिटर हे प्रमाण दर महिन्याला जमिनीत देत राहिल्यास मुळी वाडीचे अतिशय योग्य परिणाम दिसून येतात.
द्रावण कसे तयार करायचे
दोन किलो गूळ व दोन किलो उकडलेला बटाटा गुठळी न ठेवता बारीक करून टाकीमध्ये टाकून टाकीला सच्छिद्र कापडाने पूर्ण झाकून ठेवणे.
दिवसातून दोन वेळा घड्याळाच्या काट्याप्रमाणे ढवळणे पाच ते सात दिवसांमध्ये तयार होते.
तयार झालेले द्रावण महिन्यातून टप्प्याटप्प्याने जमिनीतून देऊन संपवणे