ऊस बेणे नवीन वाण : फुले ऊस १५०१२ (एमएस १७०८२)
(मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव, ता. फलटण, जि. सातारा)
डॉ. भरत रासकर, डॉ. रामदास गारकर, डॉ. माधवी शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली :
ऊसाची नवीन जात ऊसाचा नवीन वाण CO - 15012 या नवीन जातीच्या ऊसाचे बेणे योग्य किमतीमध्ये मिळेल
फुले ऊस १५०१२ वाणाची वैशिष्टे ः
- ऊस सरळ वाढतो.
- जाड, कांड्या लांब आहेत. कांड्यावर पांढरा रंगाचा थर.
- मध्यम आणि गोल डोळा, डोळ्याच्या पुढे खाच नसलेला, पाण्याचा ताण सहन करणारा आणि न लोळणारा वाण.
- खोडव्यासाठी उत्तम.
- पाने मध्यम रूंद, सरळ व टोकदार, पानाच्या टोपणावर कूस नाही, पाचट सहज निघते.
- चाबूक काणी आणि पिवळा पानाच्या रोगास प्रतिकारक.
- लालकूज आणि मर रोगास मध्यम प्रतिकारक.
- खोड कीड, कांडी कीड, शेंडे कीड आणि खवले किडीस कमी प्रमाणात बळी पडतो.
- तुरा उशिरा आणि कमी प्रमाणात येतो.
- चोपण जमिनीत उत्तम उगवण आणि उत्पादन.
- रसवंतीसाठी उत्तम आहे. सुरू, पूर्वहंगामी आणि आडसाली या हंगामासाठी शिफारस.
- ऊस पाचट न काढता हिरवट-पिवळसर आणि पाचट काढल्यानंतर पांढरट हिरवा दिसतो.
S.T. पार्सल पोहोचची सुविधा हि उपलब्ध
प्रत्यक्षात प्लॉट बघा आणि मगच बेणे खरेदी करा किंवा बुकिंग करा
पत्ता :- गाव. रुई कोहकी
ता :- राहाता जिल्हा- अहमदनगर
नाव :- संदीप गमे