फुले ऊस १५०१२ (एमएस १७०८२) ऊसाचे बेणे विकणे आहे
ऊसाची नवीन जात ऊसाचा नवीन वाण CO - 15012 या नवीन जातीच्या ऊसाचे बेणे योग्य किंमतीत मिळेल
फुले ऊस १५०१२ वाणाची वैशिष्टे :-
- ऊस सरळ वाढतो. जाड, कांड्या लांब आहेत. कांड्यावर पांढरा रंगाचा थर.
- मध्यम आणि गोल डोळा, डोळ्याच्या पुढे खाच नसलेला, पाण्याचा ताण सहन करणारा आणि न लोळणारा वाण.
- खोडव्यासाठी उत्तम. पाने मध्यम रूंद, सरळ व टोकदार, पानाच्या टोपणावर कूस नाही, पाचट सहज निघते.
- चाबूक काणी आणि पिवळा पानाच्या रोगास प्रतिकारक, लालकूज आणि मर रोगास मध्यम प्रतिकारक. खोड कीड, कांडी कीड, शेंडे कीड आणि खवले किडीस कमी प्रमाणात बळी पडतो.
- तुरा उशिरा आणि कमी प्रमाणात येतो. चोपण जमिनीत उत्तम उगवण आणि उत्पादन.
- रसवंतीसाठी उत्तम आहे. सुरू, पूर्वहंगामी आणि आडसाली या हंगामासाठी शिफारस.
- ऊस पाचट न काढता हिरवट-पिवळसर आणि पाचट काढल्यानंतर पांढरट हिरवा दिसतो.
प्रत्यक्षात प्लॉट बघा आणि मगच बेणे खरेदी करा किंवा बुकिंग करा
प्लॉट बघायला आल्यानंतर त्यांना recovery test लॅब रिपोर्ट बघायला मिळेल.
टीप :
बाहेर जिल्ह्यातील लांबचे शेतकरी प्रत्यक्षात प्लॉट बघायला येऊ शकत नाही त्यांच्यासाठी S.T. Parcelच्या माध्यमातून पोहोचची सुविधा हि उपलब्ध करून दिली जाईल.