मुरघास बॅग चा उपयोग हिरवा चारा दीर्घकाळ सुरक्षित साठवण करण्यासाठी केला जातो. यामध्ये मुरघास उत्तम प्रमाणात न सडता साठवला जातो
▶या बॅगची क्षमता किती आहे?
ही मूरघास बॅग १ टन (1000 kg) मुरघास साठवून ठेऊ शकते, अजून ३ टन आणि ५ टन मध्ये सुद्धा उपलब्ध आहेत
▶मुरघास बॅगचा उपयोग कशासाठी होतो?
ही बॅग हिरव्या चाऱ्याचा मुरघास बनवण्यासाठी आणि साठवण्यासाठी वापरली जाते. ह्या पद्धतीने चारा हवेपासून वाचतो व त्यातील पौष्टिकता टिकून राहते, त्यामुळे चारा वर्षभर उपलब्ध राहतो.
▶ही बॅग किती काळ चारा टिकवू शकते?
योग्य पद्धतीने भरल्यास,ही बॅग चार्याची गुणवत्ता अनेक महिने (कधीकधी वर्षभर) टिकवून ठेवू शकते.
▶या बॅगची देखभाल कशी करावी?
• भरल्यानंतर बॅग सॉलिड पृष्ठभागावर ठेवा • हवा सुटू नये याची काळजी घ्या • भरल्यानंतर टोप टाइट सील करा • वापरल्यानंतर स्वच्छ करून कोरड्या जागी ठेवावे
▶पावसाळ्यात चारा साठवण्यासाठी मूरघास बॅग उपयुक्त आहे का?
होय. मूरघास बॅग हवाबंद असल्यामुळे पावसाळ्यात चारा खराब होण्याचा धोका कमी होतो.
▶मुरघास बॅगची किंमत किती आहे ?
ह्या बॅगची किंमत ₹800 आहे
▶मूरघास बॅगचा जनावरांच्या दूध उत्पादनावर परिणाम होतो का?
होय. हंगामाबाहेरही चारा उपलब्ध राहिल्यामुळे दूध उत्पादनात सातत्य राखले जाते.