Main Thumbnail
Thumbnail 1
Thumbnail 2
आकडी
Main Thumbnail
Thumbnail 1
Thumbnail 2

आकडी

किंमत:
₹450
कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध
खराब मालावर बदली किंवा पैसे परत.
24×7 ग्राहक सेवा
विकत घ्या
कार्टमध्ये जोडा
मेसेज करा

झाडावरील पाला व फांद्या काढण्यासाठी सुपर आकडी!

उंच झाडावरील पाला, वेल किंवा फांद्या कापण्यासाठी आता शिडी लावण्याची किंवा झाडावर चढण्याची गरज नाही!

शेतकरी मित्रांनो,
आता सुरक्षित आणि सोप्या पद्धतीने जमिनीवर उभं राहूनच उंचावरचं काम करा 💪🌿

ही खास आकडी तुम्ही साध्या पाईप किंवा बांबूला लावू शकता आणि काही क्षणात फांद्या कापू शकता.


✨ खास वैशिष्ट्ये:

🛠️ पाईपला घट्ट फिट बसते:
लोखंडी रिंग आणि विंग नटमुळे कोणत्याही पाईप/बांबूला मजबूत पकड

🗡️ धारदार पाते:
पाला, वेल आणि जाड फांद्या सुद्धा सहज कापते

💪 मजबूत आणि टिकाऊ:
हेवी ड्युटी वापरासाठी बनवलेली – दीर्घकाळ टिकणारी


🎯 कुठे उपयोगी?

✔️ उंच झाडांच्या फांद्या कापण्यासाठी
✔️ शेळ्यांसाठी पाला काढण्यासाठी
✔️ बाग आणि शेती व्यवस्थापनासाठी


🛒 खरेदी माहिती:

🚚 महाराष्ट्रभर घरपोच डिलिव्हरी उपलब्ध

युनिव्हर्सल पाईप सॉकेट,हाय-कार्बन स्टील पाते,टूल-फ्री फिटिंग,हेवी-ड्युटी बनावट,उंचावरची छाटणी.

प्रश्न-उत्तर
१. ही आकडी कोणत्याही पाईपला बसवता येते का?
हो, या आकडीला 'अ‍ॅडजस्टेबल' रिंग्स देण्यात आल्या आहेत. साधारणपणे १ इंच ते १.५ इंच व्यासाच्या कोणत्याही लोखंडी पाईप, प्लास्टिक पाईप किंवा बांबूला ही आकडी सहजपणे घट्ट बसवता येते.
२ .आकडी पाईपला जोडण्यासाठी वेगळ्या पानाच्या (Tools) गरज पडते का?
अजिबात नाही! याला 'विंग नट' (Wing Nuts) दिलेले आहेत, जे तुम्ही हातानेच फिरवून घट्ट करू शकता. त्यामुळे शेतात काम करताना तुम्हाला पक्कड किंवा पाना सोबत ठेवण्याची गरज भासणार नाही.
३ .ही आकडी किती उंचावर वापरता येईल?
हे तुम्ही जोडलेल्या पाईप किंवा बांबूच्या लांबीवर अवलंबून आहे. तुम्ही १० ते १५ फुटांचा पाईप जोडला, तर जमिनीवर उभे राहूनच तुम्ही तितक्या उंचावरची स्वच्छता किंवा छाटणी करू शकता.
५. पात्याला धार लावता येते का?
हो, ही आकडी उच्च दर्जाच्या कार्बन स्टीलपासून बनवलेली आहे. जर भविष्यात धार कमी झाली, तर तुम्ही कानस किंवा सॅण्डपेपरच्या साहाय्याने याला पुन्हा धार लावू शकता.
६. हे उत्पादन गंजते का?
हे लोखंडी अवजार असल्याने ओलाव्यामुळे गंज चढण्याची शक्यता असते. मात्र, दीर्घकाळ टिकवण्यासाठी प्रत्येक वापरानंतर ही आकडी स्वच्छ पुसून त्याला थोडे तेल लावून ठेवल्यास ती अनेक वर्षे गंजमुक्त राहते.
७. पेमेंट आणि डिलिव्हरी कशी होईल?
तुम्ही 'कृषी क्रांती'वर ऑर्डर दिल्यानंतर आम्ही भारतीय पोस्टाद्वारे ही आकडी तुमच्या पत्त्यावर पाठवतो. विशेष म्हणजे, 'कॅश ऑन डिलिव्हरी' (COD) सुविधा उपलब्ध असल्याने, माल हातात मिळाल्यावरच तुम्हाला पैसे द्यावे लागतील.
८ .ह्या आकड्याची किंमत किती आहे ?
ह्या आकड्याची किंमत 450 आहे.
विकत घ्या
कार्टमध्ये जोडा
मेसेज करा

रेटिंग आणि रिव्ह्यू द्या:

पहिला रिव्ह्यू द्या!

शेतीसाठी उपयुक्त साहित्य