डिजिटल ड्राय रन ऑटो स्विच
उन्हाळ्यात काय आपल्या बोरवेलचे पाणी कमी झाले आहे? का ते विशिष्ट कालावधीसाठी चालत आहे, तर चिंता करू नका आपल्या बोरवेलच्या मोटारीला किंवा शेतातील मोटारीला बसवा बायोकॉन डिजिटल ड्रायरण ऑटो स्विच आणि निश्चिंत व्हा..!
ऑटो स्विच बसवल्यानंतर होणारे फायदे
- शेती पंपाला पूर्णपणे सुरक्षित ठेवतो सिंगल फेज मुळे मोटर जळण्याची भीती नाही पाणी कमी होऊन मोटर बिघडण्याची भीती नाही किंवा मोटर जाम फिरून तिने जास्त एंपियर घेऊन होणारा तांत्रिक बिघाड टळतो
- ऑटो स्विच च्या डिस्प्ले वरती आपणाला असलेल्या होल्टेजची पूर्णपणे माहिती मिळते तसेच आपली मोटर किती एंपियर घेऊन चालते हे आपणाला समजते
- ऑटो स्विच वरती असलेले एलईडी दिवे आपणास परिस्थितीची पूर्ण माहिती देतात जसे की लाईन ओके आहे, मोटर चालू आहे, होल्टेज, एंपियर, लाईन फॉल्ट, तसेच ओव्हरलोड व ड्राय रन इत्यादी सर्व काही आपणाला दर्शवितात
- सायकलिक टाइमिंग : ऑटो स्विच बसविल्यानंतर आपण आपली मोटर हव्या त्या वेळेनुसार चालू किंवा बंद करू शकतो जसे की पाच मिनिटांपासून सहाशे मिनिटांपर्यंत आपण आपली मोटर चालू किंवा बंद करू शकतो जसे की सायकल टायमिंग नुसार आपण एक तास चालू एक तास बंद अशा पद्धतीने मोटर चालू किंवा बंद ठेवू शकतो त्यामुळे आपल्या बोरचे पाणी जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण ऑन टाइम देऊन आपल्याला माहित असलेल्या वेळेनुसार आपण आपली मोटर बंद ठेवून पुन्हा चालू करण्याचा टाइमिंग आपण सेट करू शकतो
- रिस्टार्ट टाइमिंग ज्याने आपली मोटर ही पाणी संपल्यानंतर बंद होते व ती पुन्हा चालू करण्याचा टाइमिंग आपण सेट करू शकतो तो पाच मिनिटांपासून 600 मिनिटांपर्यंत आपण सेट करू शकतो ज्यामुळे आपली मोटर रिकामी फिरत असताना मोटर बंद केली जाते व ती विशिष्ट कालावधीनंतर म्हणजेच आपण सेट केलेल्या वेळेनुसार ती परत रिस्टार्ट होते
- आपण आपल्या मोटारीचे ड्रायरन एंपियर मॅन्युअली व ऑटोमॅटिक सेट करू शकतो
- लाईट आल्यानंतर आपण आपली मोटर किती वेळाने चालू करायची ते आपण सेट करू शकतो बाय डिफॉल्ट एक मिनिटांनी आपली मोटर चालू होते परंतु ती आपण हव्या त्या वेळेनुसार म्हणजेच दहा सेकंद ते एक मिनिटांपासून दहा मिनिटांपर्यंत लाईट आल्यानंतर चालू होण्याचा टाईम सेट करू शकतो