कृषी ड्रोन व्यवसायासाठी अनुदान योजना

कृषी ड्रोन व्यवसायासाठी अनुदान योजना
नमस्कार, 
गेल्या काही वर्षांमध्ये ग्रामीण भागातील शेतकऱ्यांमध्ये सातत्याने पीक फवारणी करताना हानिकारक केमिकलशी थेट संपर्क येत असल्याने कॅन्सर व इतर गंभीर आजाराचे प्रमाण वाढले आहे. यावर उपाय म्हणून आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने म्हणजेच कृषी ड्रोनच्या माध्यमातून जर पीक फवारणी केली तर शेतकऱ्यांचा हानिकारक रासायनिक औषंधानसोबतचा थेट संपर्क कमी होऊन त्याद्वारे होणारे गंभीर आजार टाळता येऊ शकतात असे निष्पन्न झाले आहे.

ज्या तरुण शेतकऱ्यांना स्वतःचा नवीन कृषी ड्रोन फवारणी व्यवसाय सुरु करायचा आहे अशा शेतकरी तरुणांना कृषी ड्रोन फवारणी व्यवसाय सुरू करण्यासाठी ४०% अनुदान व प्रोत्साहन म्हणून महा फाउंडेशनच्या सामाजिक दायित्त्व निधीच्या माध्यमातून दरमहा १० हजार रुपये किंवा एकरकमी २ लाख रुपये अनुदान देण्यात येईल जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक फवारणीची सेवा मिळेल व त्यांचा हानिकारक औषधांसोबत संपर्कात येण्याचे प्रमाण कमी होईल.

कृषी ड्रोन खरेदी करून पीक फवारणीचा व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या तरुणांना सरकारी बँकेतून केंद्र सरकारच्या ''ऍग्री इन्फ्रा फंड'' अर्थात AIF या योजनेअंतर्गत प्रकल्पाच्या ९०% पर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. कर्ज प्रकरणासाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे, प्रकल्प अहवाल हे इच्छुक लाभार्थ्याला संस्थेकडून मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी कृषी ड्रोन योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शेतकरी तरुणांना कोणत्याही प्रकारचा खर्च करावा लागणार नाही सर्व खर्च हा संस्थेमार्फत करण्यात येणार आहे.

संस्था व शासनाकडे नोंदणीकृत असलेल्या अधिकृत पुरवठादार यांचेकडून आपल्याला कृषी ड्रोन सेट उपलब्ध करून देण्यात येईल. या सेट मध्ये आपल्याला १७ लिटरचा मोठा कृषी ड्रोन त्यासोबत ८ बॅटरी, २ चार्जर व सेफ्टी किट देण्यात येईल.

या प्रकल्पाची एकूण मंजूर किंमत रु.९८५००० (नऊ लाख पंच्च्याऐंशी हजार रुपये) असणार आहे. व यावर आपल्याला बँकेच्या माध्यमातून सुमारे ९०% कर्ज व ४०% अनुदान मिळणार आहे. उर्वरित १०% डाऊन पेमेंट लाभार्थ्यास स्वतः बँकेत जमा करायचे आहे.

सबसिडी मंजूर झाल्यानंतरच लाभार्थ्यांना कर्ज मिळणार असून मिळालेल्या कर्जाला ६% इतका व्याजदर असणार आहे. व दरमहा १३ हजार रुपये इतका EMI असणार आहे. त्यापैकी १० हजार रुपये आपल्याला संस्था दरमहा आपला व्यायसाय सुरळीत होईपर्यंत सलग २ वर्षापर्यंत किंवा २ लाख रुपये एकरकमी देणार आहे. म्हणजे ४०% अधिक २ लाख रुपये असे एकूण ५ लाख ९४ हजार रुपये पर्यंत अनुदान लाभार्थ्यांना कृषी ड्रोन खरेदीसाठी मिळणार आहे.

त्याचप्रमाणे संस्थेच्या कॉल सेंटरच्या माध्यमातून लाभार्थ्यांना पीक फवारणीसाठी इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांसोबत देखील जोडून देण्यात येणार आहे.

कृषी ड्रोन योजना ही सर्वत्र महाराष्ट्रामध्ये सुरू करण्यात आली असून ज्यांना कुणाला योजनेतून कृषी ड्रोन खरेदी करायचा असेल त्यांनी त्वरित खाली दिलेल्या पत्त्यावर प्रत्यक्ष भेट द्यावी किंवा हेल्पलाईन क्रमांकावर कॉल करून योजनेबद्दल संपूर्ण माहिती घ्यावी.

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे.

आधार कार्ड 
पॅन कार्ड 
शाळा सोडल्याचा दाखला 
मार्कशीट १० वी किंवा १२ वी 
जातीचा दाखला (cast certificate) 
फोटो
मोबाईल क्रमांक 
ईमेल आयडी 
उद्यम सर्टिफिकेट
प्रोजेक्ट रिपोर्ट (संस्थेमार्फत देण्यात येईल)
अनुदान मंजुरी पत्र (संस्थेमार्फत देण्यात येईल)

जे शेतकरी तरुण या योजनेच्या माध्यमातून कृषी ड्रोन फवारणी व्यवसाय सुरु करण्यासाठी इच्छुक असतील त्यांनी अर्ज करण्यासाठी त्वरित खालील पत्त्यावर संपर्क करावा.

पत्ता - 
शासकीय दूध डेअरी चौक, नगर - मनमाड रोड, अहिल्यानगर.  
संपर्क - 9552501050

टीप - संस्थेच्या वतीने संपूर्ण अर्जप्रक्रिया ही मोफत असून लाभार्थ्याला अर्ज करण्यासाठी किंवा अनुदान मंजुरीसाठी कोणत्याही प्रकारचा खर्च येणार नाही.

Harvester

 मेसेज करा
 9552501050
कमेंट करा
0 कमेंट्स
Loading
Loading
संबंधित जाहिराती

Loading

शेतीसाठी उपयुक्त साहित्य

Loading