इलेक्ट्रॉनिक + मॅग्नेटिक वॉटर कंडिशनर
पेटंट प्राप्त एकमेव इलेक्ट्रॉनिक प्लस मॅग्नेटिक वॉटर कंडिशनर
इलेक्ट्रॉनिक मॅग्नेटिक वॉटर कंडिशनर वापरलेल्या शेतकऱ्याचे अनुभव वाचा
नमस्कार आजची वॉटर कंडिशनर यशोगाथा आहे श्री विक्रम चव्हाणके, राहणार किरपांगळी, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक.
बरोबर 1 वर्षांपूर्वी खूप ठिकाणी चौकशी करून आम्ही वॉटर कंडिशनर बसवण्याचा निर्णय घेतला.
25ECOP44 ताशी 50,000 लिटर भौतिक प्रक्रिया ( रासायनिक नाही ) करून पाणी हलके करणारे मशीन लावले.
कांदा हे आमचे मुख्य पीक असते पण पाणी अतिशय शारयुक्त म्हणजे 2800 पीपीएम असल्यामुळे कुठल्याही पिकाची म्हणावी तशी मनासारखी वाढ होत नव्हती. कारण क्षारयुक्त पाण्यामुळे नवीन मुळी चालत नसे मुळी नाही म्हणजे पुढचा पिक वाढीचा विषयच संपला, मग मी अनेक प्रकारचे औषधे वापरतो पीक वाढीसाठी. पण मूळ प्रश्न आणि विषय बाजूलाच राहतो. वॉटर कंडिशनर त्याच्यावर हा एक रामबाण उपाय आहे .सर्वात चांगली गोष्ट म्हणजे वॉटर कंडिशनर ला कुठल्याही प्रकारचे रसायन वापरावे लागत नाही. हे एक अभियांत्रिकी संशोधन व मशीन आहे (engineering product and Innovation ) यामध्ये विशिष्ट लहरी तयार केला जातात ज्यामुळे विरघळलेले क्षार आपला चिकटण्याचा गुणधर्म सोडून देतात व आपला प्रश्न निकाली निघतो.
वॉटर कंडिशनर लावल्यानंतर मला आलेले काही अनुभव खालील प्रमाणे
- पाण्याची चव लगेच बदलली कारण सवळ चवीसाठी जबाबदार असलेले क्षार आता निष्क्रिय झाले होते.
- कांद्याची मुळी चांगल्या पद्धतीने पोसली गेली त्यामुळे कांद्याची वाढ इतर शेतकऱ्यांच्या तुलनेमध्ये व आमच्या मागील वर्षाच्या तुलनेमध्ये चांगली झाली . इतर शेतकऱ्यांच्या तुलनेमध्ये 200% जास्त उत्पन्न मिळाले.
- यावर्षी 10 जून 2022 रोजी दीड एकर म्हणजे 60 गुंठे क्षेत्रामध्ये मेघदूत 2048 ही टोमॅटोची व्हरायटी 5 फूट x 1.5 फूट वर मल्चिंग पेपरचा वापर करून लावली.
- दीड एकर मध्ये 9500 रोपे लावली 100% ड्रीप चा वापर केला
- आता 30-9-2022 ला शेवटचा तोडा केला . एकूण 3000 जाळी (20 kg एक जाळी) टोमॅटो गुणवत्ता अतिशय चांगली आली.
- मार्केटमध्ये रेट चांगला असल्यामुळे सर्वसाधारण 9 लाख 50,000 रुपये उत्पन्न मिळाले. खर्च 2 लाख 50,000 रुपये आला वॉटर कंडिशनर लावण्यापूर्वी दोन वर्ष अगोदर सर्वकाही हेच होते व तरीही जास्तीत जास्त 2000 जाळी उत्पादन मिळाले होते अगदी सरळ सरळ 1000 जाळी उत्पादन वाढले.
- कितीही कमीत कमी हिशोब केला तरी 2.5 ते 3 लाख उत्पन्न जास्त मिळाले. यासाठी फक्त वॉटर कंडिशनर मुळे हे झाले याच्यामध्ये माझ्या मनात कुठलीही शंका नाही.
- साधारण एक वर्षांपूर्वी घरांमध्ये पाणी पिण्यासाठी आरो फिल्टर बसूवुन् घेतला त्यावेळी बसवणाऱ्या माणसाने पाणी तपासले व चिंता व्यक्त केली कारण पाणी 2800 पीपीएमचे आहे.
- त्यांनी दोन गोष्टी सांगितल्या, आरो पुरिफियर आधी एक पेपर फिल्टर चा मुख्य फिल्टर असतो त्यामुळे कुठल्याही प्रकारची माती, रेती, पार्टीकल, शेवाळ वगैरे आरो पुरिफायर मध्ये जात नाही.
- त्यांनी पाणी तपासल्यानंतर सांगितले की हा पेपर फिल्टर तुम्हाला दर महिना बदली करावा लागेल. त्याला कुठलाही उपाय नाही. तसेच तुमचं पाणी अतिशय जड असल्यामुळे आत मधील मुख्य पार्ट आरो मेम्बरेन सहा महिने जरी टिकला तरी खूप झालं असं समजा.
- आज एक वर्षानंतर फक्त एकदा आम्ही पेपर फिल्टर बदली केला आहे त्यासाठी आम्हाला फक्त 50 रुपये खर्च आला आहे आणि मुख्य पार्ट आरो मेम्ब्रेन अजूनही 100% तसंच काम करत आहे तो बदलण्याची कुठलीही वेळ आली नाही.
- शेजारील सर्व शेतातील घरातील लोकांचे आरो मेम्बरेन 3 ते 4 महिन्यांमध्ये मान टाकतात. त्यांना सतत खूप खर्च येतो पण आमच्या आरो ला एक वर्षांमध्ये फक्त 50 रुपये खर्च आला आहे. तोही पेपर फिल्टर बदलण्याचा तो आमचा आम्हीच बदलला आहे.
मागील एक वर्षापासून वॉटर कंडिशनर ला कुठलाही देखभाल खर्च नाही. मशीन पूर्णपणे ऑटोमॅटिक आहे. पाणी पंप चालू झाला की मशीन आपोआप चालू होते व पंप बंद झाला की मशीन आपोआप बंद होते.
वॉटर कंडिशनर लावण्यापूर्वी आणि लावल्यानंतर पहिला 1 महिनात माझ्या मनात जे काही धाकधुक होती ती आता पूर्णपणे नाहीशी झाली आहे.
आज एक वर्षानंतर मी 100% खात्रीशीर सांगू शकतो की वॉटर कंडिशनर हे प्रत्येक शेतकऱ्यासाठी एक उपयुक्त तंत्रज्ञान आणि वरदान आहे.
धन्यवाद.
Electronic+Magnetic Water Conditioner Technology.