नंदीराज आंतर मशागत यंत्र
शेतकऱ्यांचा मशागतीचा खर्च कमी व्हावा यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत नंदीराज मोटारसायकल संचलित आंतर मशागत यंत्र
यंत्राचे फायदे :
- या यंत्राद्वारे कांदा, कापूस, सोयाबीन, तुर, मका, ज्वारी, बाजरी, हरभरा, गहु अशा जवळपास सर्वच पिकांची पेरणी करता येते.
- उच्च दर्जाच्या पेरणी यंत्रामुळे खत व बियाणे एकाच वेळी योग्य आंतरावर समान प्रमाणात पडते.
- पेरणी सरळ रेषेत होते, त्यामुळे आंतरमशागतीस अडचण येत नाही.
- कापूस, तुर लागवड यंत्राने झाल्यामुळे मजुरांची गरज पडत नाही.
- या यंत्राद्वारे कापूस, तूर अशा पिकातील पाळी (वखरणी) करता येते.
- याद्वारे सोयाबीन, मका, बाजरी अशा पिकांमध्ये कोळपणी (वखरणी) करता येते.
- पेरणी, पाळी, कोळपणी यांचा सरासरी एकरी पेट्रोल खर्च ८० ते १०० रुपये येतो.
- या यंत्राची रुंदी अॅडजेस्टेबल असल्यामुळे साडेतीन फुट आंतरावरील ओळीतही सहज चालते.
- या यंत्रावर फवारणी यंत्र जोडून कापूस, तूर, सोयाबीन, मका आदी पिकांसह डाळींब, मोसंबी, द्राक्षे, आंबे अशा प्रकारच्या फळ पिकांवरसुद्धा फवारणी करता येते.
- फवारणीसाठी सरासरी एकरी फक्त ५० रुपयांचा पेट्रोल खर्च येतो.
- दिवसभरात १५ एकर कापूस, तूर व ८ एकर सोयाबीनची फवारणी करता येते
व्हिडीओ पहा👇