लाळ्या खुरकूत रोग: लक्षणे, प्रसार आणि परिणाम…
14-06-2024
लाळ्या खुरकूत रोग: लक्षणे, प्रसार आणि परिणाम…
लाळ्या खुरकूत रोग अत्यंत वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार आहे. गाय वर्ग, म्हैस वर्ग, शेळ्या मेंढ्या यासह डुकरांमध्ये प्रामुख्याने आढळतो. या रोगामुळे दूध उत्पादनात घट व जनावरांच्या प्रतिकार शक्तीवर हि परिणाम होतो.
बैलांच्या क्रय शक्तीवरही परिणाम होतो. सोबत लहान वासरे, रेडकं यांच्यात मोठ्या प्रमाणात मरतूक होत असल्यामुळे दोन-चार जनावरे असणार्या पशु पालकांचे या रोगामुळे प्रचंड नुकसान होते.'पीकोर्ना हीरीडी' या वर्गातील 'अप्तो व्हायरस' या विषाणूमुळे या रोगाचा प्रादुर्भाव होतो. यांचे ए, ओ, सी, अशिया १ व एस् टी १, २, ३ असे उपप्रकार आहेत. हा विषाणू सामान्य निर्जंतुक करण द्रावणाला दाद देत नाही. कमी तापमानात अनेक दिवस जिवंत राहतो.
प्रसार:
- प्रसार प्रामुख्याने हवेमधून, दूध, शेण, लघवी, वीर्य, पाणी पिण्याच्या जागा, गोठ्यात वापरत असलेली भांडी इतत्यादीं पासून जास्त होतो.
- त्याचबरोबर बाधित जनावरांचा संपर्क येऊ शकणाऱ्या जागा म्हणजे जनावरांचे बाजार, यात्रा, पशुप्रदर्शने, साखर कारखान्याचे हंगाम त्याबरोबर स्थलांतरित पक्षीदेखील या रोगाचा प्रसार करू शकतात.
-बाधित जनावरांतील लाळ इतर सर्व स्रार्वातून या विषाणूचा प्रसार हा होतो.
- रोगाचा संक्रमण कालावधी दोन ते सहा दिवस काही वेळेला पंधरा दिवसांपर्यंत असतो.
-मरतुकीचे प्रमाणसुद्धा विषाणूच्या तीव्रतेवर अवलंबून असते.
-२० टक्क्यापासून ते ५० टक्क्यांपर्यंत मरतूक होऊ शकते.
- या रोगाचा प्रसार वेगाने होत असल्यामुळे काही ठिकाणी शंभर टक्के जनावरे बाधित होताना दिसतात.
उपाय:
1) या रोगाच्या साथीच्या काळात रोगी जनावरे कुरणात चरण्यासाठी जाऊ देऊ नयेत. रोगाचा प्रसार लाळेतून होत असल्याने आजारी जनावरांनी खाल्लेला चारा इतर जनावरांना खाऊ देऊ नये.
2) आजारी जनावरे निरोगी जनावरांपासून वेगळी करावीत व त्यांच्यावर औषधोपचार करावा.
3) आजारी जनावरांना सार्वजनिक ठिकाणी पाणी न पाजता वेगळ्या ठिकाणी पाणी पाजावे. रोगी जनावरांची बांधण्याची जागा रोज किमान एकदा जंतुनाशकाने धुवावी.
4) दूध काढण्याची भांडी धुण्याच्या सोड्याने व गरम पाण्याने धुऊन घ्यावी.
5) लाळ्या खुरकूत रोगावर लसीकरण हाच एकमेव उपाय आहे. सर्व जनावरांना लसीकरण केल्यास हा रोग शक्यतो होत नाही. या रोगाची लस सप्टेंबर आणि मार्च महिन्यात जनावरांना द्यावी.
कारणे:
लाळ्या खुरकूत हा प्रादुर्भाव त्या जनावरात होत नाही. पण इतर प्रकारामुळे हा रोग होऊ शकतो याचाच अर्थ इतर उपप्रकारांसाठी ही रोगप्रतिकारशक्ती उपयुक्त ठरत नाही. विशेष म्हणजे नैसर्गिक प्रादुर्भावानंतर सुमारे एक वर्ष जनावरांना लाळ्या खुरकूत रोगाची बाधा होत नाही. त्याबरोबर या रोगात आयुष्यभरासाठी रोगप्रतिकारशक्ती निर्माण होत नाही.
एखाद्या गावातील या रोगासाठीची रोगप्रतिकारशक्ती नष्ट झाल्यास त्या गावात या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. जर वारंवार एकाच गावात रोगाचा प्रादुर्भाव होता असेल तर एकापेक्षा अधिक प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारांनी पशुधन बाधित होते.
स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याच्या क्षमतेमुळे (उतपरिवर्तन) नवीन उपप्रकार तयार होतात, त्यांची रोगकारक क्षमता व तीव्रता वेगवेगळी असते. तथापि जनावरांतील लक्षणे मात्र एकसारखीच असतात.