शेतकऱ्यांना २५ हजार हेक्टरी बोनस देण्याचा निर्धार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
14-10-2024
शेतकऱ्यांना २५ हजार हेक्टरी बोनस देण्याचा निर्धार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
राज्यामधील महायुती सरकार हे शेतकरी हितासाठी कटिबद्ध आहे. शेतकऱ्यांना १२ तास वीज मिळावी, त्यांचे विजेचे बिल माफ व्हावे तसेच कृषी पंपासाठी करावी लागणारी प्रतीक्षा करण्याचा प्रश्न दूर व्हावा यासाठी मागेल त्याला सौरकृषी पंप योजना सुरू केली.
मागील वर्षी धानाला प्रति हेक्टर २० हजार रुपये बोनस वाटप झाला होता. तर त्यामध्ये यावर्षी वाढ करून २५ हजार रुपये हेक्टरी बोनस दिला जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
धानाला २५ हजार रुपये बोनस मिळावा म्हणून तुमचा वकील म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करणार आणि धानाला निश्चितच हेक्टरी २५ हजार बोनस जाहीर करणार, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.