₹5000 अनुदानाची धमाकेदार संधी! कापूस-सोयाबीन शेतकऱ्यांनी त्वरित अर्ज करा…!
25-02-2025

₹5000 अनुदानाची धमाकेदार संधी! कापूस-सोयाबीन शेतकऱ्यांनी त्वरित अर्ज करा…!
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२३ मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सरकारकडून रु. ५०००/- प्रति हेक्टर प्रमाणे अनुदान मिळणार आहे. ही मदत कमाल २ हेक्टरच्या मर्यादेत दिली जाणार आहे.
या अनुदानासाठी पात्र कोण?
✔ ई-पिक पहाणी केलेले शेतकरी – ज्या शेतकऱ्यांनी खरीप २०२३ मध्ये ई-पिक पहाणी पोर्टलवर नोंदणी केली आहे, ते या योजनेसाठी पात्र आहेत.
✔ ७/१२ उताऱ्यावर पिकाची नोंद असलेले शेतकरी – ज्या शेतकऱ्यांनी ई-पिक पहाणी केली नाही, पण त्यांच्या ७/१२ उताऱ्यावर खरीप २०२३ मध्ये कापूस किंवा सोयाबीन पिकाची नोंद आहे, तेही लाभ घेऊ शकतात.
(टीप: सर्व शेतमालाचे जिल्ह्यानुसार व सर्व बाजार समितीचे बाजारभाव खालील लिंक वर पाहायला मिळतील👇🏻)
https://www.krushikranti.com/bajarbhav
✔ वनपट्टेधारक आणि Non-Digitalised Villages मधील शेतकरी:
- खरीप २०२३ मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक वनपट्टेधारक शेतकरी पात्र आहेत.
- चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील Non-Digitalised Villages मधील वैयक्तिक व सामाईक खातेदार योजनेचा लाभ घेऊ शकतात.
अनुदानासाठी अर्ज कसा करावा?
✅ ई-पिक पहाणी यादीत नाव तपासा – पात्र शेतकऱ्यांनी ई-पिक पहाणी पोर्टलवर जाऊन आपले नाव यादीत आहे का, हे तपासावे. गरज असल्यास कृषि सहाय्यकांशी संपर्क साधावा.
✅ तलाठ्याशी संपर्क साधा – ज्या शेतकऱ्यांनी ई-पिक पहाणी केली नाही, पण ७/१२ उताऱ्यावर पिकाची नोंद आहे किंवा जिवती तालुक्यातील Non-Digitalised Villages मधील शेतकरी असतील, त्यांनी गावातील तलाठ्याशी संपर्क साधावा.
✅ वनपट्टेधारक शेतकऱ्यांनी तहसील/जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क साधावा – वनपट्टेधारक शेतकऱ्यांनी लाभ घेण्यासाठी तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाशी चर्चा करावी.
महत्वाची सूचना!
🔹 अनुदानासाठी पात्र शेतकऱ्यांनी २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत आधार संमती पत्र आणि ना हरकत प्रमाणपत्र संबंधित कृषि सहाय्यक यांचेकडे सादर करावे.
🔹 विहीत मुदतीत आधार संमती व ना हरकत प्रमाणपत्र जमा न केल्यास अनुदान मिळू शकणार नाही, त्यामुळे वेळेत प्रक्रिया पूर्ण करावी.
🔹 आधार संमती व ना हरकत प्रमाणपत्राचा नमुना कृषि सहाय्यकांकडे उपलब्ध आहे.
हे पण पहा: शेतकऱ्यांसाठी खास! ट्रॅक्टर, वीज आणि सिंचन अनुदान योजनांची संपूर्ण माहिती…