आले पिक लागवड तंत्रज्ञान पहा सविस्तर माहिती

09-02-2023

आले पिक लागवड तंत्रज्ञान पहा सविस्तर माहिती

आले पिक लागवड तंत्रज्ञान पहा सविस्तर माहिती 

◉ जमीन

पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी, मध्यम ते हलकी, सेंद्रिय खतांचा जास्त वापर केलेली, जमिनीचा सामू ६- ६.५ असलेली जमीन आले पिकासाठी फायदेशीर ठरते, ह्यासोबत मित्रांनो वारंवार एकाच जमीनीत आले पीक घेऊ नये.

◉ पेरणीची वेळ व पूर्व मशागत

आले पिकाची लागवड ही एप्रिल पासून मे अखेर पर्यंत कधीही करू शकतो. लागवड करण्याआधी जमिनीची उभी आडवी खोल नांगरणी करून घ्यावी आणि रोटर च्या साहाय्याने जमीन भुसभुशीत करून घ्यावी.

◉ सुधारीत वाण

रजता, माहीम, वरदा, महिमा, रियो डी जानेरो, कालीकत

( लागवडीसाठी बियाणे घेताना ७ - ८ क्विंटल बियाणे/ एकर घ्यावे. बियांची लांबी २- २.५ व वजन २५- ४५ ग्रॅम असावे आणि बियांवर्ती एक ते दोन डोळे असावेत )

◉ बीज प्रक्रिया

आल्याची बीजप्रक्रिया करताना ०.३ टक्के मँकोझेब व ०.०७५ टक्के क्विनॉलफॉस द्रावणात बियाणे ३० मिनिट भिजवून लागवडीपूर्वी ३-४ तास सावलीत वाळवावे मग लागवड करावी

◉ लागवड पद्धत :

मित्रांनो जमिनीची मशागत झाली की आले लागवडीसाठी गादीवाफे तयार करावेत. गादीवाफे तयार करताना रुंदी १ मीटर, उंची ३० सेमी आशा लांबीचे गादीवाफे ५० - ५० सेमी अंतरावर बनवावेत. बागायती पिकात ४० सेमी अंतरावर सरी पाडाव्यात.

◉ खत

आले लागवडीच्या आधी चांगले कुजलेले शेणखत १० टन/ एकरी वाफ्यांवर पसरून द्यावी किंवा आले लागवडीच्या खड्यांमध्ये टाकावे. लागवडीनंतर २.५ ते ३ महिन्यांनी उटाळणी करतेवेळी ८० किलो निंबोळी किंवा करंज पेंड द्यावी. लागवडीपूर्वी वाफ्यात ३० किलो स्फुरद व ३० किलो पालाश पसरून द्यावे. ४८ किलो नत्र लागवडीनंतर तीन हप्यांत ४५, ५५ व ६५ दिवसांनी विभागून द्यावे.

 मशागत

लागवडीनंतर गरजेनुसार २ ते ३ खुरपण्या कराव्यात. तसेच लागवडीनंतर ४५ व ९० दिवसांनंतर खुरपणी करून खते द्यावीत आणि पिकाला भर द्यावी. पिकाला लागवडीनंतर लगेचच ४-५ टन/ एकरी पालापाचोळा किंवा २-३ किलो भाताचे तूस/ वाफा वापरून आच्छादन करावे. परत ४५ व ९० दिवसांनी ७.५ टन/ एकर पालापाचोळ्याचे आच्छादन करावे.

◉ पाणी व्यवस्थापन

आले पिकाला वाढीच्या कालावधीमध्ये १३००-१५०० मिमी पाणी लागते. पिकाच्या संवेदनशील अवस्था कोंब उगवताना, फुटवे फुटताना (लागवडीनंतर ९० दिवस) व कांदांचा विकास (लागवडीनंतर १२० दिवस) या आहेत.

लागवडीनंतर लगेचच पहिली आंबवणी करावी म्हणजेच पहिले पाणी द्यावे , आणि त्यानंतर कालांतराने आपली जमीन व हवामान बघून ७ - ८ दिवसांनी पाणी द्यावे. पिकांना पाणी देण्यासाठी ठिबकसिंचन किव्हा तुषारसिंचन चा वापर करू शकता ह्यामुळे पाण्याची बचत होते व उत्पन्न वाढते.

◉ पिक संरक्षण

कंदकुज – लागवडीसाठी रोगमुक्त बियाण्याची निवड करावी. साठवणुकीपूर्वी व लागवडीपूर्वी ०.३ % मँकोझेब किंवा ०.१२५ % मेटालॅक्झील+ मँकोझेबची ३० मिनिटे बियाणेप्रक्रिया करावी व लागवडीनंतर ३० व ६० दिवसांनी आळवणी करावी.

◉ पानांवरील ठिपके – प्रादुर्भाव दिसून येताच मँकोझेब ०.२ % किंवा कार्बेंडाझीम ०.१ % फवारणी करावी.

◉ कंद पोखरणारी अळी – किडीचा प्रादुर्भाव दिसून येताच जुलै ते ऑक्टोबर कालावधीत ०.१ % मॅलाथीऑनची २१ दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.

◉  कीड – पिकाची काढणी वेळेवर करावी. साठवणूक व लागवडीपूर्वी क्विनॉलफॉस ०.०७५ % द्रावणात ३० मिनिटे बियाणेप्रक्रिया करावी.

◉ काढणी व उत्पादन

पाने पिवळी पडून वाळू लागताच वाळलेला पाला कापून पालापाचोळा वेचून घ्यावा. कुदळीने खोदून गड्यांना इजा न करता आल्याची काढणी करावी. आले वेचून पाण्याने स्वच्छ धुवून गड्डे व बोटे (नवीन आले) वेगवेगळी करावी. एकरी ४- ६ टन उत्पादन मिळते.

◉ कालावधी

ताज्या आल्यासाठी पिकाची काढणी लागवडीनंतर ७ महिन्यांनी व सुंठनिर्मितीसाठी ८.५ ते ९ महिन्यांनी करावी.

source : digitalshetkari

Ginger Crop Cultivation Technology, ale lagvad tantradnyan, adarak, अदरक लागवड

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading