गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना 2023
11-05-2023
![गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना 2023](/_next/image?url=https%3A%2F%2Fstatic-img.krushikranti.com%2Fimages%2F1683787807732.webp&w=3840&q=75)
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना 2023
लाभार्थ्यांचे पात्रता निकष
राज्यातील सर्व वहीतीधारक खातेदार शेतकरी व शेतकऱ्यांच्या कुटूंबातील वहीतीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले कोणतेही १ सदस्य (आई-वडील) शेतकऱ्यांची पती/पत्नी मुलगा व अविवाहीत मुलगी यापैकी कोणतेही एक व्यक्ती असे १०-७५ वयोगटातील एकुण २ जणांना अपघाती विमा संरक्षण १ शेतकरी आणि १ शेतकऱ्यांच्या कुटूंबातील व्यक्ती.
विमा संरक्षणासाठी समविष्ट असलेले अपघात :
- रस्ता / रेल्वे अपघात
- अपघाती विषबाधा
- विजेचा धक्का
- विज पडून मृत्यू
- सर्प दंश
- नक्षलवाद्याकडून होणाऱ्या हत्या
- उंचावरून पडुन मृत्यू
- खून
- जनावरांच्या हल्यामुळे किंवा चावल्यामुळे होणारे अपघाती मृत्यू
- दंगल इ. मुळे होणारे मृत्यू
- अपघाती घटनांमुळे शेतकऱ्यांस मृत्यू किंवा अपंगत्व.
विम्या पासुन मिळणारे आर्थिक लाभ
अक्र. | अपघाताची बाब | नुकसान भरपाई |
---|---|---|
१ | अपघाती मृत्यू | रु. २०००००/- |
२ | अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी होणे. | रु. २०००००/- |
३ | अपघातामुळे एक डोळा व एक अवयव निकामी होणे. | रु. २०००००/- |
४ | अपघातामुळे एक डोळा अथवा एक अवयव निकामी होणे. | रु. १०००००/- |
सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी व आवश्यक कागदपत्रा करिता तालुका कृषि अधिकारी, कृषि सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा.
source : krushi vibhag maharashtra shasan