पीएम किसान योजनेचा निधी मिळवण्यासाठी पात्र आहे की नाही कसं पाहायचं?
18-06-2023
पीएम किसान योजनेचा निधी मिळवण्यासाठी पात्र आहे की नाही कसं पाहायचं?
पीएम किसानसाठी ई-केवायसी अनिवार्य
पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षातून तीन वेळा दोन हजार रुपयांप्रमाणं ६ हजार रुपयांची रक्कम दिली जाते. शेतकऱ्यांना १४ व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पीएम किसान सन्मान योजना सुरु केली होती. त्या योजनेनुसार शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी ६ हजार रुपये जमा केले जातात. शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम तीन टप्प्यात पाठवली जाते.
आतापर्यंत या योजनेअंतर्गत १३ हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम वर्ग करण्यात आली आहे. शेतकरी आता १४ व्या हप्त्याची रक्कम कधी येणार याची वाट पाहत आहेत. शेतकऱ्यांना आता १४ व्या हप्त्याच्या रकमेसाठी जास्त वेळ थांबावं लागणार नाही. माध्यमातील रिपोर्टनुसार जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम वर्ग केली जाण्याची शक्यता आहे.
पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या १४ व्या हप्त्याची रक्कम मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केलेली असणं आवश्यक आहे. त्याशिवाय त्या शेतकऱ्याकडे जमीन असणं आवश्यक आहे.
पीएम किसान सन्मान योजनेच्या १३ व्या हप्त्याची रक्कम २७ फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली होती. पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ काही शेतकऱ्यांना त्यांचं रेकॉर्ड अपडेट नसल्यानं मिळाली नव्हती. ज्या शेतकऱ्यांनी ते पूर्ण केलं असेल त्यांना १४ व्या हप्त्याची रक्कम मिळू शकते.
पीएम किसानची रक्कम मिळवण्यासाठी ई केवायसी अनिवार्य
पीएम किसान योजनेची रक्कम मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे. जर ई-केवायसी केली नसेल तर शेतकऱ्यांना रक्कम मिळणार नाही. पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन मोबाईल क्रमांक आणि आधार क्रमांक नोंदवून ई-केवायची प्रक्रिया पूर्ण केली जाऊ शकते. याशिवाय सीएससी केंद्रावर जाऊन देखील शेतकरी ही प्रक्रिया करु शकतात.
पीएम किसान योजनेचा निधी मिळवण्यासाठी पात्र आहे की नाही कसं पाहायचं?
- स्टेप १ : पीएम किसानच्या वेबसाइटला भेट द्या
- स्टेप २ : फार्मर्स कॉर्नरमधील बेनिफिशरी स्टेटस सिलेक्ट करा
- स्टेप ३ : आधार क्रमांक किंवा बँक खात्याशी जोडलेला मोबाइल नंबर नोंदवा
- स्टेप ४ : गेट डाटावर क्लिक करा
- स्टेप ५ : तुम्हाला मिळालेल्या निधीची माहिती मिळेल
source : maharashtratimes