महा ई-ग्राम सिटीजन कनेक्ट : शेतकऱ्यांसाठी विकसित करण्यात आलेले राज्य सरकारचे नवीन अँप
21-04-2023
महा ई-ग्राम सिटीजन कनेक्ट : शेतकऱ्यांसाठी विकसित करण्यात आलेले राज्य सरकारचे नवीन अँप
शेतकरी बंधुनो आता आपल्याला कोणत्याही दाखल्याची गरज भासल्यास ग्रामपंचायत मध्ये चकरा मारण्याची आवश्यकता नाही आता आपण घर बसल्या देखील कोणताही दाखला आपण काढू शकता आपल्या मोबाइल मधून तो हि महाराष्ट्र राज्य सरकार च्या अधिकृत ॲपवर चला तर मग कोणते आहे हे ॲप सविस्तर माहिती पाहूया.
महा ई-ग्राम सिटीजन कनेक्ट
राज्य सरकारने एक नवीन अँड्रॉइड एप्लीकेशन महा ई-ग्राम सिटीजन कनेक्ट (mahaegram Citizen Connect) विकसित करण्यात आलेले असून यावरून ग्रामीण भागातील लोकांना ग्रामपंचायत कार्यालयामध्ये न जाता विविध प्रकारची कागदपत्रे किंवा दाखले घरबसल्या मोबाईलवरती मिळविता येणार आहेत. ते हि अगदी सोप्या पद्धतीने.
लोकांना सर्व प्रकारचे दाखले मिळवण्यासाठी तहसील कार्यालय, ग्रामपंचायत, पंचायत समिती अशा विविध कार्यालयाच्या चकरा माराव्या लागतात. प्रत्येकवेळी आपल्याला दाखला वेळेवर मिळेलच याची सुद्धा शाश्वती नसते. ही बाब ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या लक्षात आल्यानंतर, नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने घरबसल्या दाखले कशाप्रकारे देता येतील हा विचार करून हे ॲप सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा फायदा होणार आहे.
service plus दाखले :
महा ई-ग्राम सिटीजन कनेक्ट ॲपवरून नागरिकांना दैनंदिन व्यवहारातील किंवा जीवनातील आवश्यक अशी खालील नमूद कागदपत्रे मिळविण्यासाठी अर्ज करता येणार आहे.
- मालमता कर ऑनलाईन भरणा
- असेसमेंट उतारा
- जन्म प्रमाणपत्र
- मृत्यू प्रमाणपत्र
- विवाह नोंदणी प्रमाणपत्र
- दारिद्ररेषेखालील प्रमाणपत्र
वरील सर्व दाखले नागरिकांना घरबसल्या आपल्या मोबाईलवर काढता येणार आहेत, त्यासाठी नागरिकांना दाखल्यासाठी ठरविण्यात आलेली निश्चित अशी रक्कम ऑनलाईन पध्दतीने क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, यूपीआय किंवा क्युआर कोडच्या माध्यमातून करावी लागेल.
सोबतच नागरिकांना मिळकतीचा करसुध्दा या ॲप्लिकेशनच्या मदतीने भरता येणार आहे. या माध्यमातून जमा होणार सर्व पैसा थेट ग्रामपंचायतच्या खात्यात जमा होणार आहे. यामुळे नक्कीच गावच्या विकासामध्ये भर पडणार आहे.
Mahaegram Citizen Connect mobile app process?
- सर्वप्रथम तुम्हांला हे ॲप इन्स्टॉल करण्यासाठी प्ले-स्टोरवर Maha e gram citizen Connect असे सर्च करावे लागेल, त्यानंतर अँप इन्स्टॉल करा अथवा येथे क्लिक करून अँप इन्स्टॉल करून घ्या.
- अँप डाउनलोड केल्यानंतर त्याठिकाणी तुम्हाला रेजिस्ट्रेशन करावे लागेल.
- महा ई-ग्राम सिटीझन कनेक्ट अँपमध्ये रेजिस्ट्रेशन करण्यासाठी खालील स्टेप्स पूर्ण करा.
- रेजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वप्रथम Dont have account? Register या ऑपशनवर क्लिक करा.
- क्लिक केल्यानंतर त्याठिकाणी तुम्हांला मूलभूत अशी माहिती टाकून जसे कि स्वतःचे पूर्ण नाव, वडिलांचे नाव, जात, लिंग, धर्म, जन्म तारीख, मोबाईल क्रमांक, ई मेल-आयडी इत्यादी माहिती टाकून रेजिस्ट्रेशन करून घ्यायचे आहे.
- लॉगिन करण्यासाठी तुमचा मोबाईल क्रमांक हा username असेल व password मेसेजमध्ये दिलेला असेल.
- लॉगिन केल्यानंतर तुम्हांला विविध दाखल्याच्या नावासह बरेच पर्याय दिसतील.
Mahaegram Citizen Connect पर्याय विवरण
- दाखले/प्रमाणपत्र : या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हांला जन्म दाखला, मृत्यू दाखला, विवाह नोंदणी दाखला इत्यादी दाखले दाखविण्यात येतील.
- कर भरणा : या पर्यायावर क्लिक करून तुम्ही मालमत्ता कर भरू शकता. त्यासाठी तुम्हांला ग्रामपंचायतला जाण्याची आवश्यकता भासणार नाही. सोबतच कर भरल्याची पावतीसुध्दा तुम्हांला ऑनलाईन प्राप्त होईल.
- व्यवहार इतिहास : या पर्यायामध्ये तुम्ही अँप इन्स्टॉल केल्यापासून आतापर्येंतचे संपूर्ण व्यवहार पाहू शकता. उदा. मालमत्ता कर भरणा
- ग्रा.पं.पदाधिकारी : या पर्यायामध्ये ग्रामपंचायतमधील सर्व पदाधिकारण्याची माहिती पाहण्यास मिळेल. ज्यामध्ये सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, कर्मचारी इत्यादींची माहिती पाहण्यास मिळेल.
निष्कर्ष :
शासनामार्फतच हा एक महत्वकांक्षी निर्णय असून, यामुळे नक्कीच गावाच्या विकासासोबतच नागरिकांच्या सुविधांनासुद्धां चालना मिळणार आहे. त्यामुळे शक्य तितक्या नागरिकांनी या अँप्लिकेशनचा वापर करून घरबसल्या दाखले मिळविण्याचा नक्की फायदा घ्यावा.
MahaeGram Citizen Connect information?
नागरिकांसाठी सुरु करण्यात आलेलं नवीन अँप्लिकेशन असून यामुळे नागरिकांना घरबसल्या दाखले मिळविता येणार आहेत. प्ले-स्टोरवर सहजरित्या हा अँप्लिकेशन नागरिक इन्स्टॉल करू शकतात. यामध्ये जन्म प्रमाणपत्र, मृत्य प्रमाणपत्र, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, मालमता कर ऑनलाईन भरणा इत्यादी सुविधा देण्यात आल्या आहेत.
source : maharashtrayojana