शेतीसोबत करा हा जोडधंदा कमी जागेत मिळते भरघोस उत्पन्न
31-01-2023
शेतीसोबत करा हा जोडधंदा कमी जागेत मिळते भरघोस उत्पन्न
मशरूम म्हणजे काय ?
मशरूम हे एक बुरशी आहे त्यालाच मशरूम असे म्हणतात. त्यात हिरवी बुरशी आढळत नाही तसेच मशरूम मध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक असतात. मशरूम खाण्यासाठी स्वादिष्ट / चविष्ट असून आरोग्यासाठी खूप फायदेच आहे.
डॉक्टर सांगतात मशरूम चे सेवन करणे हे आरोग्यास रामबाण उपाय आहे. झिंक, अँटी-ऑक्सिडंट्स, प्रोटीन, व्हिटॅमिन-डी, सेलेनियम ह्याचा औषधें बनवण्यसाठी वापर केला जातो, यामध्ये खूप पोषक तत्व असतात त्यामुळे अनेक धोकादायक आजरांपासून शरीर सुरक्षित राहते.
मशरूम पदार्थ हा शहरात महागड्या डिश मध्ये मोडला जातो,तसेच आधुनिक पद्धतीने मशरूम शेती घेतली जाते तसेच मशरूम चे वैशिष्ट असे हि आहे कमीत कमी जागेत चांगला नफा घेता येतो, हॉटेल्स व शहरातील नागरिकांकडून मशरूम ला खूप मागणी असते. तसेच चीन मध्ये तर मशरूम ला ओषध तसेच देवाचे अन्न असेही म्हंटले जाते.
मशरूम लागवड पद्धत (Mushroom Cultivation method)
मशरूम शेती करणे अवघड नाही खूप सोप्या पद्धतीने तुम्ही मशरूम ची शेती करू शकतात, तसेच मशरूम उत्पादन साठी शेती नसेल तरीही चालेल छोटा प्लॉट किंवा घरात हि उत्पादन घेऊ शकतात. लागवडी साठी कंपोस्ट खत खूप महत्वाचे आहे. कंपोस्ट मध्ये कंपोस्ट च्या बिया पेरतात. स्वस्त असलेला भात किंवा गव्हाचे पेंढ वापरून सहजरित्या तुम्ही कंपोस्ट खत बनवू शकतात.
हवामान
मशरूम वाढी साठी थंड हवामान गरजेचे असते. तसेच मशरूम च्या बाजारात अनेक प्रजाती आहेत ज्याची लागवड वर्षभरात कधीही घेता येते.
भारतात मशरूमचे चार प्रकार असून दुधाळ मशरूम, बटन मशरूम, स्ट्रॉ मशरूम, ऑयस्टर मशरूम इत्यादी.
मशरूम ची मागणी
मशरूम चा भाव सांगायचं झाल्यास साधारण सातशे ते एकहजार रुपये किलोप्रमाणे आहे. हॉटेल, तारांकित हॉटेल्स, उपहारगृह, मॉल्स, सुपर मार्केट. तसेच तुम्ही हि आकर्षक पॅकिंग करून मालाची विक्री करू शकता. तुम्ही krushikranti.com या आपल्या हक्काच्या वेबसाईट वर जाऊन मशरूमची जाहिरात करू शकता मशरूमला सर्वत्र मागणी आहे.
मशरूम लागवड करणे हे शेती सारखे नसून त्याचे प्रशिक्षण खूप महत्वाचे आहे. प्रशिक्षण घेऊन केल्यास तुम्हाला नुकसान होणार नाही तसेच विक्री कशी करावी इत्यादी माहिती पुरवली जाते.
ह्या बाबी महत्वाच्या आहे जागा, पाणी, कच्चा माल, प्लास्टिक, बियाणे, वातावरण, तर तुम्ही हि करू शकता सुरवात.
source : krushinama