डाळिंब पीक फवारणी वेळापत्रक
13-03-2023
डाळिंब पीक फवारणी वेळापत्रक
नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण डाळिंब पिकासाठी फवारणी व्यवस्थापन कसे करायचे याची माहिती पाहणार आहोत. छाटणीनंतरच्या कोणत्या दिवशी कोणते औषध फवारायचे. त्याचे संपूर्ण वेळापत्रक पाहणार आहोत. त्यानुसार जर तुम्ही डाळिंब पिकासाठी नियोजन केले, तर नक्कीच तुम्हला त्याच लाभ होणार आहे आणि उत्पादनात नक्कीच तुम्हला वाढ दिसून येणार आहे. हे वेळापत्रक टेस्टेड आहे. चला तर मग मित्रांनो पाहुयात, कसे करायचे डाळींब पिकासाठी फवारणी नियोजन. जर तुमच्या लक्ष्यात राहणार नसेल , कोणत्या दिवशी काय फवारायचे आहे, तर तुम्ही ते वेळापत्रक कॅलेंडर वर लिहून ठेऊ शकता, जेणेकरून तुम्हला त्यानुसार नियोजन करणे थोडे सोपे होईल.
डाळिंब फवारणी वेळापत्रक-
- डाळींबाच्या पहिल्या फवारणीसाठीडाळिंब छाटणीनंतरच्या तिसऱ्या दिवशी इथ्रेल (२ मिली) , ०:९:४६ (२.५० ग्रॅम ) , ट्रॅफॉस Cu ( २.५ मिली ) प्रति लिटर पाण्यात मिसळून डाळींबावर फवारावे.
- त्यानंतर डाळींबाची दुसऱ्या फवारणीसाठी १३:००:४५ (५ ग्रॅम) आणि ट्रॅफॉस Cu ( २.५ मिली ) प्रति लिटर पाण्यात मिसळून छाटणीनंतरच्या १८ दिवशी डाळिंबाला फवारावे.
- तिसरी फवारणी ही ३० व्या दिवशी करावी . या फवारणी मध्ये बा. बोरो (०.५० मिली ), बा. जिंक (०.३७५ ग्राम) , फ्रेस्को AZ (०.५० ग्राम ), बासफोलीअर अल्गी (२ मिली ) प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
- डाळिंबाची चौथी फवारणी ही ३५ व्या दिवशी करायची आहे. त्यासाठी मॅक्सफ्लो मॅग्नम( १ मिली), बा. झिंक ( ०.३७५ ग्रॅम ), बा. बोरो ( ०.५० मिली) आणि ट्रॅफॉस Cu ( २.५ मिली ) प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे .
- त्यानंतर पाचव्या फवारणीसाठी बा. कव्हर (२ मिली) आणि बा. बोरो ( ०.५० मिली) हे प्रति लिटर पाण्यात मिसळून छाटणीनंतरच्या ४९ व्या दिवशी फवारावे.
- त्यानंतर सहाव्या फवारणीसाठी फ्रिस्को AZ ( ०.५० ग्रॅम) आणि बासफोलीअर अल्गी (२ मिली ) प्रति लिटर पाण्यात ५० व्या दिवशी फवारावे.
- त्यानंतरची डाळिंबाची सातवी फवारणी ही छाटणीनंतरच्या पण ५५ व्या दिवशी करावी . त्या फवारणीसाठी बासफोलीअर कॉलर (२.५ ग्रॅम) , मॅक्सफ्लो मॅग्नम (१ मिली ) , फिलग्रीन २००( २ मिली) प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करून घ्यावी.
- त्यानंतर आठवी फवारणी ८० व्या दिवशी करावी फवारणीसाठी ऑमीफॉल K ( २.५ मिली ) , ट्रॅफॉस CU (२.५ मिली ), इनटेक(२ मिली ) प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- त्यानंतरच्या फवारणीसाठी बा. कवर (२मिली) , बा. बोरो (०. मिली) प्रति लिटर पाण्यात मिसळून छाटणीनंतरच्या ८५ व्या दिवशी ही नववी फवारणी करावी.
- फ्रेस्को AZ (०.५० ग्राम ) , फीलग्रीन २०० (२ मिली ) प्रति लिटर पाण्यात मिसळून ९० व्या दिवशी डाळिंबाला फवारावे.
- त्यानंतर ची फवारणी छाटणीनंतरच्या ९५व्या दिवशी करावी. ती फवारणी ऑमिफॉल की (२.५ मिली ), मॅक्सफ्लो मॅग्नम (१ मिली) प्रति लिटर पाण्यात मिसळून डाळिंबाला फवारावे.
- त्यानंतरच्या फवारणीसाठी ट्रॅफॉस Cu (२.५ मिली ), इनटेक (२ मिली ), फीलग्रीन २०० (२ मिली ) प्रति लिटर पाण्यात ११५ व्या दिवशी डाळिंबाला फवारावे
- ऑमीफॉल K (२.५ मिली), बा. बोरो (०.५० मिली ), ट्रॅफॉस Cu (२.५ मिली ) हे प्रति लिटर पाण्यात मिसळून छाटणीनंतरच्या १३० व्या दिवशी डाळिंबाला फवारावे.
- शेवटच्या फवारणीसाठी बासफोलीअर कॉलर (२.५ ग्रॅम) , बा. बोरो (०.५० मिली ) प्रति लिटर पाण्यात मिसळून १६५ व्या आणि १७५व्या दिवशी डाळिंबाला फवारण्यात यावे.
तर मित्रांनो, अश्यापरकरे डाळिंब छाटणीनंतर वरीलप्रमाणे १४ फवारण्या कराव्यात नक्कीच तुमच्या उत्पादनात वाढ होईल. आणि या पिकाचा अधिक लाभ तुम्हाला घेता येईल. तुम्हाला हि माहिती कशी वाटली नक्की कंमेंट द्वारे आमच्यापर्यंत पोहचावा.
source : mahasarkariyojana