चक्रीवादळात स्वत:ला सुरक्षित कसं ठेवायचं? हवामान विभागाने दिल्या या मार्गदर्शक सूचना
14-06-2023
चक्रीवादळात स्वत:ला सुरक्षित कसं ठेवायचं?
हवामान विभागाने दिल्या या मार्गदर्शक सूचना
घरात आणि घराबाहेर स्वत:ला सुरक्षित ठेवायचंय? हवामान विभागाने दिलेल्या या मार्गदर्शक सूचनांचे पालन करा
मुंबईला बिपरजॉय चक्रीवादळाचा तडाखा बसला असून आता हे चक्रीवादळ गुजरातच्या दिशेनं घोंगावत असल्याची माहिती समोर आली आहे. या चक्रीवादळाचा सर्वात मोठा फटका गुजरातला बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विशेषत: गुजरातच्या कच्छ आणि जामनगर जिल्ह्याला या वादळाचा फटका बसणार असल्याचं हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आलं आहे.
१५ जूनला सायंकाळी बिपरजॉय चक्रीवादळ सौराष्ट्र आणि कच्छच्या परिसरातून जाणार असल्याची माहिती आहे. या चक्रीवादळाच्या वाऱ्यांची गती ताशी १२५-१३५ किमी ते १५० किमीपर्यंत असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाचे प्रमुख मृत्यूंजय मोहपत्रा यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभाग आणि एनडीएमए विभागाने लोकांच्या सुरक्षिततेसाठी महत्वाचा सल्ला दिला आहे.
घरात असल्यावर सुरक्षित कसे राहाल?
१) वीज आणि गॅस सप्लाय बंद करा.
२) सुरक्षिततेसाठी दरवाजे आणि खिडक्या बंद करा.
३) चक्रीवादळ येण्यापूर्वी धोकादायक ठिकाणांपासून दूर राहा.
४) रेडिओच्या माध्यमातून या चक्रीवादळाबाबत अपडेट्स जाणून घ्या.
५) उकळलेले पाणी किंवा शुद्ध पाण्याचे सेवन करा.
घराबाहेर असल्यावर स्वत:ला सुरक्षित कसे ठेवाल?
१) धोकादायक इमारतींमध्ये प्रवेश करू नका.
२) वीजेचे तुटलेले पोल, तुटलेल्या केबल्स आणि धारदार गोष्टींपासून दूर राहा.
३) सुरक्षित जागेवर राहण्याचा प्रयत्न करा.
source : loksatta