लाल चंदन लागवड तंत्रज्ञान
11-05-2023
लाल चंदन लागवड तंत्रज्ञान
लाल चंदनाची शेती करून कमवा करोडो रुपये, एक टन लाकडाचा भाव ऐकल्यावर विश्वास बसणार नाही
कमी पाण्यात तसेच कमी खतामध्ये आणि अत्यंत हलक्या प्रतीच्या जमिनीत येऊन बळीराजाला बक्कळ पैसा मिळवून देणारा वृक्ष म्हणजे रक्त चंदनाचे झाड. लाल चंदनाचा म्हणजेच रक्त चंदनाला बाजारात मोठी मागणी आहे शिवाय किंमत तर अवाढव्य अशी आहे. लाल चंदनाचा उपयोग अनेक वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केला जातो सरबत बनवण्यापासून ते अत्तर आणि देवपूजेसाठी धूप आणि इतर सुद्धा अनेक उपयोग आहेत.
आपल्या देशात लाल चंदन कोठे आढळते
शेतकरी सुद्धा आपल्या शेतामध्ये लाल चंदनाची लागवड करून बक्कळ पैसे मिळवू शकतो. आपल्या देशात लाल आणि पांढरे हे 2 प्रकारचे चंदन मोठ्या प्रमाणात आढळते. लाल चंदनाचा उपयोग मूर्ती बनवण्यासाठी तसेच फर्निचर बनवणे यासाठी लाल चंदनाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुळे लाल चंदनाची शेती शेतकरी वर्गाला फायदेशीर ठरू शकते शिवाय मागणी असल्याने बाजारात प्रचंड भाव सुद्धा लाल चंदनाचा आहे.आपल्याकडे सामान्यतः लाल चंदनाचा जंगली झाड म्हणून सुद्धा संबोधले जाते. आपल्या देशामध्ये लाल चंदनाला अनेक नावांनी ओळखले जाते यामध्ये अल्मुग, सॉन्डरवुड, रेड सँडर्स, रेड सॅन्डरवुड, रेड सॉंडर्स, रक्त चंदन, रेड सॅन्डलवुड, रगत चंदन, रुख्तो चंदन इत्यादी नावे आहेत. आपल्या देशामध्ये पूर्व घाटाच्या दक्षिणेकडील भागात आणि निलगिरी पर्वताच्या भागामध्ये लाल चंदन मोठ्या प्रमाणात सापडते.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी
लाल चंदनाला आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या प्रमाणात जोरदार मागणी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या लाकडाला सुमारे 20 ते 40 लाख रुपये क्विंटल एवढा भाव मिळत आहे. त्यामुळं शेतकरी वर्गाने लाल चंदनाची शेती करणे फायदेशीर ठरणार आहे. जगात चीन आणि जपान या देशात लाल चंदनाला मोठी मागणी आहे.
लाल चंदनाचे उपयोग
लाल चंदनाचा उपयोग अनेक ठिकाणी होतो.प्रामुख्यानेलाल चंदनाचा वापर कोरीव काम, फर्निचर, खांब आणि घरासाठी तसेच वाद्ये तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. याचबरोबर लाल चंदनाचा उपयोग औषध निर्मितीसाठी तसेच सौंदर्य प्रसादाने बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो.
लागवडीसाठी उत्तम वेळ
चंदन लागवडीसाठी हवामान हे कोरडे उष्ण आवश्यक असते तसेच ते चंदनाच्या वाढीसाठी चांगले मानले जाते. या दृष्टिकोनातून, भारतात त्याच्या लागवडीसाठी सर्वोत्तम वेळ मे ते जून मानला जातो.
लाल रोपांची किंमत
लाल चंदन लागवडीसाठी जास्त खर्च येत नाही लाल चंदनाची रोपे तुम्हाला सरकारी किंवा खाजगी नर्सरी मध्ये अगदी सहजपणे मिळून जातील. लाल चंदनाच्या एका झाडाची किंवा रोपाची किंमत ही 100 ते 160 रुपयंदारम्यान असते. याचबरोबर लागवड करताना पाणी व्यवस्थापन खत व्यवस्थापन आणि तणापासून रोपांचे संरक्षण करणे गरजेचे आहे.योग्य व्यवस्थापन करून शेतकरी वर्ग करोडो रुपये कमवू शकतो.