शरद पवार ग्रामसमृद्धी योजना पहा सविस्तर माहिती
06-04-2023
शरद पवार ग्रामसमृद्धी योजना पहा सविस्तर माहिती
नमस्कार शेतकरी मित्रांनो, माननीय शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त १२ डिसेंबर २०२० रोजी महाराष्ट्र सरकारने शरद पवार शरद पवार ग्रामसमृद्धी योजना सुरु करण्याचा मंत्रिमडळात निर्णय झाला आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना रोजगार संधी उपलब्ध करण्यासाठी या योजनेचा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना काम मिळत नाही त्यांना स्थलांतर करून शहराच्या ठिकाणी वास्तव्यास जावे लागते, हीच गोष्ट लक्षात घेऊन स्थलांतर रोखण्यासाठी आणि योग्य ती रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे हेच या योजनेचे मुख्य उद्दिष्टय असणार आहे. मनरेगाच्या अंतर्गत दिल्या जाणाऱ्या रोजगारदेखील या योजनेशी जोडले जाणार आहे.
चला तर मग, पाहुयात काय आहे हि योजना, कोणत्या गोष्टीसाठी अनुदान मिळणार आहे, तसेच आवश्यक पात्रता कोणती असणार आहे, कागदपत्रे कोणती लागतील.
शरद पवार ग्रामसमृद्धी योजना कोणत्या गोष्टीसाठी अनुदान मिळणार आहे –
- कुक्कुटपालन/पोल्ट्री शेड बांधणे.
- शेळीसाठी शेड बांधणे
- भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंग
- गाई व म्हशींसाठी पक्का गोठा बांधणे.
या घटकांसाठी शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेअंतर्गत अनुदान मिळणार आहे.
शरद पवार शरद पवार ग्रामसमृद्धी योजना लाभ मिळणाऱ्या घटकांची माहिती –
गाई व म्हशींसाठी पक्का गोठा बांधणे –
गाई व म्हशींसाठी निवाऱ्यासाठी ग्रामीण भागात जागा उपलब्ध नसते. त्यासाठी शेतकऱ्याकडे पैसे नसते, याच कारणामुळे शेतकऱ्याला जनावरे ओबडधोबड ठिकाणी बांधावे लागतात. अश्या ठिकाणी गुरे बांधल्यामुळे आरोग्याची काळज़ी नीट होत नाही. त्यामुळे जनावरांना विविध आजार होतात.
यासोबतच शेतकऱ्याला गुरांचे शेण यांची साठवणूक हि नीट करता येत नाही. यामुळेच या योजनेअंतर्गत गाई व म्हशींसाठी पक्का गोठा बांधण्यासाठी अनुदान देऊन महाराष्ट्र शासनाने अर्थसाहाय्य केले आहे. एका गोठ्यासाठी ७७ हजार १८८ रुपये खर्च होईल. २ गुरे ते ६ गुरे या करिता एक गोठा व त्यानंतर त्यापेक्षा अधिक गुरांसाठी ६ च्या पटीत म्हणजे १२ गुरांसाठी दुप्पट आणि १८ गुरांपेक्षा जास्त गुरांसाठी ३ पट अनुदान शासन देणार आहे.
भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंग –
नाडेपच्या बांधकामासाठी १० हजार ५३७ रुपये खर्च होईल. तो निधी उपलब्ध करून दिला जाईल. कंपोस्ट बघत हे शेतीचे आरोग्य सुधरवण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावते. शेतातील कचऱ्यावर कंपोस्टिंगद्वारे प्रक्रिया केल्यावर शेताच्या पिकाची उत्पादकता वाढण्यास मदत होते. यासाठी शेतात नाडेप बांधण्यासाठी ही योजना आहे. नाडेप मध्ये कचरा, शेणखत, सेंद्रिय पदार्थ आणि माती यांचे एकावर एक ठार रचले जातात. आणि 2 ते 3 महिन्यांच्या कालावधीच त्याचे रूपांतर भुसभुशीत कंपोस्ट मध्ये होते. यामुळे जमिनीचा कस सुधारण्यास मदत होऊन उत्पन्न वाढावे हे या योजनेमागचा मुख्य उद्देश्य असणार आहे.
कुक्कुटपालन/पोल्ट्री शेड बांधणे –
प्रत्येक शेडला ४९ हजार ७६० रुपये खर्च येईल. १०० कोंबड्या यशस्वीरित्या सांभाळणाऱ्या शेतकऱ्याला कोंबड्यांची संख्या १५०च्या वर नेल्यास मोठ्या निवारा शेडसाठी दुप्पट निधी सरकार उपलब्ध करून येईल. कुक्कुटपालन हे शेतकऱ्यांना जोड धंदा म्हणून करता येईल आणि अंड्याच्या मार्फत त्याला आर्थिक चणचण भासणार नाही. म्ह्णून या योजनेअंतर्गत शासनाने पंक्षांच्या निवाऱ्यासाठी अनुदान देऊन अर्थसहाय्य केले आहे.
शेळीपालन शेड बांधणे –
एका शेळीपालन शेडसाठी ४९ हजार २८४ रुपये येईल. एका लाभार्थ्यास जास्तीत जास्त ३० शेळ्यांकरिता ३ पट अनुदान मंजुर करून देण्यात येणार आहे येईल. शेळ्यांसाठी शेड बांधून दिल्यास शेळ्यांचे आरोग्य हि चांगले राहण्यास मदत होणार आहे. तसेच त्यांच्या मलमूत्रापासून उत्तम प्रतीचे सेंद्रिय खताची देखील निर्मिती होणार आहे. याच गोष्टीचा विचार करून महाराष्ट्र शासनाने या योजनेअंतर्गत अनुदान देऊन अर्थसहाय्य केले आहे.
शरद पवार ग्रामसमृद्धी योजना लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता –
- महाराष्ट्र राज्याचा रहिवासी आणि शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असणार आहेत
- लाभार्थी कोणत्याही संघटनेचा भाग असू नये कारण हि योजना राज्यातील बेरोजगार आणि शेतकऱ्यांसाठी आहे.
- उत्पन्न प्रमाणपत्र, आधार कार्ड किंवा इतर कोणतेही ओळखपत्र आवश्यक आहे.
source : mahasarkariyojana