स्व.भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना
24-05-2023
स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत जे शेतकरी फळबाग लागवडीकरिता पात्र ठरु शकत नाही त्याकरीता हि योजना लागू.
पात्र लाभार्थी
- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत जे शेतकरी फळबाग लागवडी करिता पात्र ठरु शकत नाही असे वैयक्तीक शेतकरी.
- स्वतः च्या नावे ७/१२ आवश्यक ७ / १२ नसल्यास संमतीपत्र.
लाभ क्षेत्र मर्यादा
- किमान ०.२० हेक्टर ते कमाल ६.०० हेक्टर
- कमाल मर्यादित लाभार्थी त्याच्या इच्छेनुसार एकापेक्षा जास्त फळपिके लागवड करु शकेल.
- म.ग्रा.रो.ह.यो. मध्ये पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांनी सदर योजनेचा लाभ २ हेक्टर क्षेत्रापर्यंत घेतल्यानंतर उर्वरीत क्षेत्रासाठी या योजनेमधुन लाभ घेता येईल.
- यापुर्वी राज्य रोजगार हमी योजनेशी निगडीत फळबाग लागवड व अन्य योजनेअंतर्गत लाभ घेतला असल्यास सदर लाभ घेतलेले क्षेत्र वगळून उर्वरीत कमाल क्षेत्र मर्यादित लाभार्थी पात्र राहील.
समाविष्ट पिके- १६ बहुवार्षिक फळपिके.
आंबा, पेरु, मोसंबी, कागदी लिंबु, संत्रा, नारळ, सिताफळ, आवळा, चिंच, जांभूळ, फणस, चिकू.
अनुदान :
खड्डे खोदणे, कालमे / रोपे लागवड, पीक संरक्षण, नांग्या भरणे, ठिबक द्वारे पाणी इत्यादीसाठी १०० टक्के राज्य शासन.
अर्ज ऑनलाईन करण्यासाठी संकेतस्थळ :
https://mahadbtmhait.gov.in या संकेतस्थळावर शेतकरी योजना पर्याय निवडुन ऑनलाईन पध्दतीने अर्जाची नोंदणी करावी.
खालील प्रमाणे कागदपत्र आवश्यक आहेत.
- ७ / १२, नमुना ८ अ,
- आधार कार्ड,
- बँक पासबुक झेरॉक्स.
source : krushi vibhag maharashtra