सागवानची शेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर, जाणून घ्या
21-01-2023
सागवानची शेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर, जाणून घ्या
शेतकरी आपल्या शेतीमध्ये नवनवीन पिकांची लागवड करत चांगले उत्पादन घेत असतात. मात्र शेतकऱ्यांना पाहिजे तसे उत्पादन मिळत नाही. त्यामुळे आज आपण अशाच एका फायदेशीर वनस्पती लागवडीविषयी माहिती जाणून घेणार आहोत. ज्यातून शेतकरी चांगले उत्पादन घेऊ शकतील.
आज आपण सागवान या वनस्पतीबद्दल जाणून घेणार आहोत. याचा उपयोग फर्निचरसाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. मुख्यता यासाठीच झाडांची लागवड केली जाते.
सागवानाचे वैशिष्ट्य आपण पाहिले तर हे झाड फार कमी वेळात फर्निचरसाठी तयार होते. याचे लाकूड मजबूत असल्याने बाजारात चांगला दरही मिळतो. सध्या बाजारात फर्निचर बनवण्यासाठी सागवानाला खूप मागणी आहे. त्यामुळे याची लागवड शेतकऱ्यांना फायदेशीर ठरू शकते.
सागाची लागवड
सागाची लागवड करण्यासाठी थोडा संयम गरजेचा असतो. याचे झाड तयार व्हायला बरीच वर्षे लागतात. यानंतर तुम्ही ते विकून चांगले पैसे कमवू शकता. सागवान रोपासाठी कोणत्याही प्रकारची माती उपयुक्त असते.
सागाच्या लागवडीसाठी प्रथम शेतात नांगरणी केली जाते. शेतातील तण आणि खडे काढून शेताची आणखी दोनदा नांगरणी करून माती समतल केली जाते. त्यानंतर, क्रमानुसार ठराविक अंतरावर सागवान रोपे लावले जातात. माहितीनुसार रोप लावल्यानंतर त्याचे झाड 10 ते 12 वर्षांत तयार होते.
एका एकरात 400 सागवान रोपे लावता येतात. त्याच्या लागवडीसाठी सुमारे 45 ते 50 हजार रुपये खर्च येतो. 12 वर्षांनंतर एका झाडाची किंमत 40 हजार रुपयांपर्यंत पोहोचते. अशा परिस्थितीत जर तुम्ही 12 वर्षांनी 400 झाडे विकली तर तुमचे एकूण उत्पन्न एक कोटी 60 लाख रुपये होईल.
source : krishijagran