टोमॅटोच्या या जाती देतात चांगले उत्पादन
09-01-2023
टोमॅटोच्या या जाती देतात चांगले उत्पादन
महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्र मध्ये टोमॅटो पिकाखाली सुमारे 50 हजार हेक्टर क्षेत्र असून त्यामाध्यमातून जवळ-जवळ एक लाख टन टोमॅटो उत्पादन मिळते. तसेच सरासरी उत्पादन याचा विचार केला तर महाराष्ट्र इतर राज्यांच्या तुलनेत आघाडीवर आहे
महाराष्ट्रातील एकुण हवामान टोमॅटो पिकास पोषक असून जमीन, पिक,हवामान, पाणी व खत तसेच पीकसंरक्षण यांचे योग्य नियोजन केल्यास टोमॅटोची उत्पादकता 68 ते 70 टन प्रति हेक्टर पर्यंत वाढवता येऊ शकते. या लेखामध्ये आपण टोमॅटो लागवडीसाठी उपयुक्त काही जातीची माहिती घेऊयात.
टोमॅटोच्या लागवडीयोग्य काही महत्त्वाच्या जाती
- भाग्यश्री - टोमॅटोच्या या जातीच्या फळांमध्ये लायकोपीन या रंगद्रव्याचे प्रमाण जास्त असून बियांचे प्रमाण खूप कमी असते.फळे लाल गर्द रंगाची तसेच भरपूर गर असलेली असतात. या जातीचा टोमॅटो हा टोमॅटो प्रक्रिया उद्योगासाठी फायदेशीर आहे. या जातीचे सरासरी उत्पादन हे 50 ते 60 टन प्रति हेक्टर मिळते.
- धनश्री - या जातीच्या टोमॅटोची फळे मध्यम गोल आकाराची व नारंगी रंगाचे असतात. या जातीच्या माध्यमातून सरासरी उत्पादन हे 50 ते 60 टन हेक्टरी मिळते. धनश्री जात ही स्पॉटेड विल्ट आणि लीप कर्ल व्हायरस या विषाणूजन्य रोगांना कमी प्रमाणात बळी पडते.
- राजश्री - या जातीचे टोमॅटो हे नारंगी लाल रंगाचे असतात व या संकरित वाणापासून हेक्टरी 50 ते 60 टन उत्पादन मिळते.ही संकरित जात लीफकर्ल व्हायरस या विषाणूजन्य रोगांला कमी बळी पडते.
- फुले राजा - या जातीचे टोमॅटो हे लाल रंगाचे तसेच नारंगी असतात. ही टोमॅटोच्या संकरित जात लिफकर्ल व्हायरस या विषाणूजन्य रोगांना कमी बळी पडते. या जातीची लागवडीतून प्रति हेक्टर 55 ते 60 टन उत्पादन मिळते.
source : krishijagran