पुढील पाच दिवस विदर्भासह राज्यातील इतर काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज
18-05-2024
पुढील पाच दिवस विदर्भासह राज्यातील इतर काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज
राज्यातील काही भागात कडक ऊन तर काही भागात दुपारनंतर ढगाळ वातावरणासह वादळी पाऊस पडत आहे.हवामान विभागाने पुढील पाच दिवस विदर्भासह राज्यातील इतर काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज दिला आहे.हवामान विभागाने कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड,पालघर, ठाणे आणि मुंबई जिल्ह्यातील काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.तर मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली,सोलापूर, पुणे, नगर, नाशिक तसेच खानदेश वादळी पावसाचा अंदाज दिला आहे.तर विदर्भातील बुलढाणा,अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, वाशिम,चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.उद्यापासून पुढील पाच दिवस विदर्भात काही ठिकाणी विजा आणि वादळी पावसाचा येलोलट हवामान विभागाने दिला आहे.तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा काही भागात वादळी पावसाचा.अंदाज हवामान विभागाने दिला आहे.तसेच राज्यात काही ठिकाणी ढगाळ हवामान आणि काही भागात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.