What is Beekeeping : मधुमक्षिका पालन माहिती
06-09-2022
What is Beekeeping : मधुमक्षिका पालन माहिती
मधुमक्षिका पालन हा शेतीला पुरक असा व्यवसाय शेतकन्यांना (farmers) अतिरीक्त उत्पन्न मिळवून देवू शकतो . मधमाशा अन्नाची गरज भागविण्यासाठी प्रत्यक्षपणे मधाच्या रूपाने आणि अप्रत्यक्षपणे पिकांच्या फुलोऱ्यातील परागसिंचनाचे फार महत्वाची मदत करतात. भारतात आयुर्वेदाचा प्रसार वाढत असल्याने मधाची मागणी येणाऱ्या पुढील काळात मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे .
मधआणि त्यापासून तयार केलेल्या उत्पादनांची बाजारपेठेतील मागणी दिवसेंदिवस वाढत असल्याने शेतकऱ्यांनी हा व्यवसाय करणे फायदेशिर ठरेल .
मधमाशा पालन करतांना योग्य नियोजन केले तर मोठ्या प्रमाणावर उत्पन्न व्यवसायातून (Income from business) मिळू शकते .
रोजगार निर्मीतीला वाव असल्याने उद्योग पुरक उद्योग म्हणून केल्यास ग्रामीण भागातील बेरोजगार तरूणांना चांगला रोजगार उपलब्ध होऊ शकतो .
मधमाशी पालनामुळे पर्यावरणावर सकारात्मक परिणाम (positive impact on the environment) होतात .
त्याचबरोबर वनस्पतीच्या परागीकरणात महत्वाची भूमिका मधमाशा बजावतात त्यामुळे पिकांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर वाढ होते .
शेतीचे उत्पादन वाढविण्यासाठी मधमाशांचा सहभाग हि काळाची गरज आहे.
मधमाशा पालनाचे फायदे (Benefits of beekeeping)
- शुद्ध मधाचे उत्पादन , शुद्ध मेणाचे उत्पादन.
- औषध आणि सौंदर्य प्रसाधनामध्ये मध आणि मेणाचा उपयोग ,
- शेती , फळबाग आणि भाजीपाला पुरक यांसारख्या इतर कोणत्याच उद्योगाशी स्पर्धा करत नाही
- श्राजान्न ( Royal Jelly ) चे उत्पादन
- मधमाश्यांच्या विषाचे उत्पादन .
- परागीभवनाद्वारे पिकांच्या आणि फुलांच्या उत्पादनात भरीय वाढ व निसर्गाचे संतुलन व संवर्धन होते
मधुमक्षिका पालनासाठी आवश्यक बाबी (Essentials of beekeeping)
- मधमाशांच्या पाळता येणान्या जातींची योग्य निवड
- मधमाशांना उपयुक्त पराग , मकरंद देणाऱ्या वनस्पतींची मुबलक उपलब्धता व त्यांच्या फुलोन्याचे सातत्य
- मधुमक्षिका पालनासाठी आवश्यक तंत्राचे प्रशिक्षण
- मध आणि मेण विक्रीसाठी बाजारपेठेची जवळ उपलब्धता .
- मधपेट्या आणि मधयंत्र यांचा मागणीमुसार पुरवठा आणि त्यांना हाताळण्याचे तंत्रज्ञान
मधमाशापालन उद्योगासाठी आवश्यक साधनसामुग्री (equipment for beekeeping )
१. मधूपेटी (Honey comb) : आधुनिक मधमाशापालनात योग्य मधुपेटीची अत्यंत आवश्यकता असते .
२. मधुनिष्कासक यंत्र (Honey extractor) : मधकोठातील मधाने भरलेल्या चौकटीतून मध काढण्यासाठी या यंत्राचा उपयोग होतो .
३. पटाशी ( हाईप टूल ) : ही एक इंग्रजी ‘ L ‘ आकाराची पोलादी पट्टी असते . हिचा उपयोग वसाहत तपासणीचे वेळी होतो .
४. धुमक : ह्या यंत्राचा उपयोग धूर करण्यासाठी होतो . धुरामुळे मधमाशा सभ्रमात पडतात व वसाहतीची देखभाल करणे सोपे होते .
५.बुरखा : मधमाशाच्या वसाहती तपासतांना तोंडावरील नाजूक भाग मधमाशांच्या दंशापासून वाचविण्यासाठी काळ्या मच्छरदाणीच्या कापड्यांच्या बुरखा वापरला जातो .
६. चाकू : मधपोळावरील मेणाचा पापुद्रा काढण्यासाठी मेणपत्रे चिकटविण्यासाठी सुरीचा उपयोग होतो ,
७. पाकपात्र : मधमाशांना साखरेचचा पाक देण्याकरिता अॅल्युमिनीयमची पसरट वाट्याचा उपयोग होतो .
८. मेणपत्रे : मधमाशांची वाढ जलद व्हावी व पोकळ्या बांधण्यात त्यांचे श्रम वाया जाऊ नयेत म्हणून मधमाशांच्या मेणापासून बनविलेले मेणपत्रे चौकटीत बसवितात . असे मेणपत्रे बसविल्याने वसाहतीची वाढ जलद होते व मधाचे उत्पादनही वाढू शकते .
९ . राणीपिंजरा : मधमाशांधी नैसर्गिक वसाहती पकडतेवेळी राणीमाशीला राणी पिंजराचा उपयोग होतो .
मधमाशाच्या प्रजाती (Bee species) :
भारतामध्ये मधमाशाच्या चार महत्वाच्या प्रजाती आहेत :
१. दगडी माशी (Stone fly) ( Apis Dorsata ) या माशा उत्तम प्रकारे मध गोळा करतात आणि त्यांच्या प्रत्येक वसाहतीमागे सरासरी मध उत्पादन अंदाजे ५०-८० किलो असते .
२.लहान माशी (Small fly) ( Apis floria) या माशा कमी मध गोळा करतात आणि त्यांच्या वसाहतीमारो अंदाजे २०० – ९ ०० ग्रॅम मध मिळते
३. भारतीय माशी (Indian fly) ( Opis Serrana Indica ) या भावनाशांसारे होणारे मध उत्पावन वर वर्षी प्रतिवसाहत ६-८किलो असते . ४. युरोपियन माशी ( अपीस मेलीफेरा ) या मधमाशांकारे वर वसाहती मागे सरासरी सधउत्पावन २५-४० किलो असते.
मधाच्या पोळ्यांची स्थापना (Establishment of honey bees)
- पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या जमिनीत मध उत्पादन केंद्र उभारावे .
- फळबागांच्या जपळ मकरंय , परागकण आणि भरपूर पाणी असलेल्या ठिकाणी उभारणी करावी .
- पोळ्याचे तापमान आवश्यक तितके राहण्यासाठी सूर्यप्रकाशापासून मधमाशांचे संरक्षण करणे महत्वाचे आहे .
- मधमाशा पेटीत ठेवतांना चारही पायाखाली पाण्याने भरलेली पाटी ( Antwells) ठेवावी , जेणेकरून पेटीत मुंग्या जाणार नाही
- शक्यतो वसाहतीचे तोंड पूर्व दिशेला असावे .
- वसाहतींना पाळीव जनावर , अन्य प्राणी , गर्दीचे रस्ते , इलेक्ट्रीक पोल पासून दूर ठेवावे .
वसाहतीचे व्यवस्थापन (Colonial management)
- मधाच्या पोळ्यांची तपासणी शक्यतो सकाळच्या तासामध्ये मधाच्या हंगामामध्ये आठवड्यातून किमान एकदा करावी
- पोळ्यांची स्वच्छता पुढील क्रमाने करावी , छप्पर सुपर / सुपरस , बुड चेंबरर्स आणि फ्लोअर बोर्ड .
- सुदृढ राणी माशी , अन्यांची वाढ , मध आणि परागकणांची साठवणूक , राणी चौकटीची उपस्थिती माशांच्या संख्या आणि नर मधमाश्यांच्या पाढे पाहण्यासाठी वसाहतीवर नियमितपणे देखरेख ठेवा .
- मधमाश्यांच्या खालील पैकी कोणत्याही शव्दारे त्रास होत असल्यास त्यांचा शोध घ्या , मेण कीड ( Platybolium Rs ) प्रौर कीडे गोळा करून नष्ट करा
- जेष्ठ माशांना काढा आणि उपलब्ध सुद्व नव्या माशांना ब्रूड चेंबरमध्ये नीट बसवा
- तुडतुडे- नाईटत्यांचा उपाय जानकाल्यास पोळ्यांची चौकट आणि तळाचा बोर्ड ताज्या बनवलेल्या पोटॅशिअम परमॅग्नेट मध्ये बुडविलेल्या कापसाच्या बोळयांनी स्वच्छ करा .
- राणीमाशीला कूड चेम्बरमध्येच ठेवण्यासाठी फूड आणि सुपर पेम्बर यांच्या दरम्यान राणीला वेगळी करणारी शीट्स ठेवा .
- वसाहतीची तपासणी आठवड्यातून एकदा करा आणि मचान भरलेल्या फ्रेम्स सुपरच्या बाजून काढून घ्याव्यात . तीन -चतुर्थांश भाग मधान किंवा परागकणांनी भरलेल्या आणि एक चतुर्थाश बंदीस्त अळ्यांनी भरलेल्या फ्रेम्स चेंबरच्या बाहेर काढून घ्याव्यात आणि त्यांच्या जागी रिकामी पोळी किंवा फ्रेम्स आधारासहित ठेवण्यात याव्यात .
मधमाशांमुळे लाभ होणारी पिके (Crops benefiting from bees)
१ ) नगदी पिके : कापूस
२ ) तेलबिया : मोहरी , तीळ , कराळ , सूर्यफूल .
३ ) फळभाज्या : वांगी , भेंडी , मिरची , काकडी , भोपळा , टोमॅटो , दुधी भोपळा , कारले इ
४ ) फळ पिके : सफरचंद , लिंबू , संत्री , मोसंबी , पेरू , लिची इ . तूर , मूग , उडीद , मटकी इ
मधमाशाचे खाद्य (Bee food)
मधमाशा मकरंद व पराग यांच्यावर पूर्णपणे अवलंबून असतात . फुलातील मकरदं गोळा करून मधमाशा मध तयार करतात . म्हणूनच यशस्वी मधमाशी पालनासाठी हा फुलोरा जवळ – जवळ वर्षभर उपलब्ध असणे आवश्यक आहे .
मधाची काढणी (Honey extraction:) :
- पोळ्याच्या ज्या भागातून मध काढायचा आहे त्या भागातील मधमाशांना धुरांन दूर करावे आणि पोळी काळजीपूर्वक कापून घ्यावीत .
- मधाची कावणी शक्यतो दोन मुख्य फुलोन्याच्या मोसमांच्या दरम्यान आणि त्यांच्या लगेच नंतर , अनुक्रमें ऑक्टोबर / नोव्हेंबर आणि फेब्रुवारी-जूनमध्ये काढणे शक्य होते.
- मधाचे पिकलेले पोळे रंगाने हलके असते आणि मधाने भरलेले असते.
मधाचे फायदे (profit of honey) :
- उर्जा देणारे एक उत्तम नैसर्गिक अन्नघटक .
- एक चांगले अँटिबायोटिकआणि अँटीसेप्टिक
- स्नायुंना बळकटी देणारे .
- खोकला . कफ . दमा या विकारांवर उपयुक्त .
- यकृत व पोटाच्या आजारावर उपयुक्त .
- वजन कमी करण्याची फायदेशीर .
- जलद थकवा घालवून कार्यशक्ती वाढते .
- विविध प्रकारच्या सौंदर्य प्रसाधनामध्ये उपयुक्त .
किटकनाशकांपासून मधमाशांचे संरक्षण (Protection of bees from pesticides) :
- पेटीतील हवा योग्य प्रकारे खेळती राहील याकडे लक्ष द्यावे .
- फारच गरज वाटल्यास ( आर्थिक नुकसान पातळी गाठल्यास ) किटकनाशकांचा योग्य त्या ठिकाणीच वापर करावा .
- फवारणी शक्यतोवर सूर्यास्था नंतर करावी .
- मधमाशांना हानी होणार नाही अश्या किटकनाशकांचा ( एन.एस.के.व्ही . ५ टके ) याचा उपयोग करावा
- पेटी जवळच्या परिसरात फवारणी करू नये .
- शक्य नसल्यास पेट्या फवारणीच्या ठिकाणापासून कमीत कमी २ ते ३ कि.मी. अंतरावर ठेवाव्यात .
संदर्भ:- डॉ . पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ , अकोला